logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था.. अंजनेरी मुळेगाव रस्त्याची बिकट अवस्था नागरिकांना रोज चिखलातूनच करावा लागतोय प्रवास आमदार हिरामण खोसकर रस्ते कामांसाठी निधी मंजूर करून आनतात पण ठेकेदारानी अर्धवट कामे टाकल्याने आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे का कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तसेच परिसरातील रस्त्यांची कामे अगदी जोमाने सुरू झाली पण काही ठेकेदारांनी कामे अर्धवट टाकून दिली आहेत या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे त्यामुळे येथे स्थानिक नागरिकांना रोजच या चिखलमेवर रस्त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय का अधिकारी ठेकेदारांची पाठराखण करतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे आमदार हिरामण कोसकर यांनी आपल्या मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मंजूर करणारे आमदार म्हणून ओळख पण प्रत्यक्ष मात्र खरोखर निधीचा उपयोग होतोय का रोज कितीतरी नागरिकांना या चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतोय प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे

5 hrs ago
user_श्री.भगवान आचारी
श्री.भगवान आचारी
त्र्यंबक, नाशिक, महाराष्ट्र•
5 hrs ago

आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था.. अंजनेरी मुळेगाव रस्त्याची बिकट अवस्था नागरिकांना रोज चिखलातूनच करावा लागतोय प्रवास आमदार हिरामण खोसकर रस्ते कामांसाठी निधी मंजूर करून आनतात पण ठेकेदारानी अर्धवट कामे टाकल्याने आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे का कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तसेच परिसरातील रस्त्यांची कामे अगदी जोमाने सुरू झाली पण काही ठेकेदारांनी कामे अर्धवट टाकून दिली आहेत या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे त्यामुळे येथे स्थानिक नागरिकांना रोजच या चिखलमेवर रस्त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय का अधिकारी ठेकेदारांची पाठराखण करतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे आमदार हिरामण कोसकर यांनी आपल्या मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मंजूर करणारे आमदार म्हणून ओळख पण प्रत्यक्ष मात्र खरोखर निधीचा उपयोग होतोय का रोज कितीतरी नागरिकांना या चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतोय प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मोखाडा येथे जाण्यासाठी मोरीचा पाडा परिसरातील खड्ड्यांमुळे प्रवाशांची कसरत मोखाडा हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी विविध कामांसाठी ये-जा करतात. मात्र, मोखाडा गावात प्रवेश करण्यापूर्वी मोरीचा पाडा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयाचे अस्तित्व असूनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर रुग्णांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मोरीचा पाडा येथील रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरून रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
    1
    मोखाडा येथे जाण्यासाठी मोरीचा पाडा परिसरातील खड्ड्यांमुळे प्रवाशांची कसरत

मोखाडा हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी विविध कामांसाठी ये-जा करतात. मात्र, मोखाडा गावात प्रवेश करण्यापूर्वी मोरीचा पाडा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयाचे अस्तित्व असूनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर रुग्णांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मोरीचा पाडा येथील रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरून रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • चांदवड तालुक्यातील वागदर्डी येथे धरण उशाला कोरड घशाला शुरून्युज : सुनिल आण्णा सोनवणे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघदर्डी या गावात धरण जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे त्याचे कारणही तसेच गेल्या महिन्यापासून गावात काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालय गाठत या ठिकाणी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करत पाणी द्या हो पाणी द्या अशा घोषणा देत पाण्यासाठी विनवणी केली मात्र या गावात गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवक नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी बोलून दाखवल्या तर गेल्या महिन्यात ते पंधरा दिवसापासून गावात पिण्यासाठी पाण्याची वणवण करावा लागत आहे त्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला असेच म्हणावे लागेल
    3
    चांदवड तालुक्यातील वागदर्डी येथे धरण उशाला कोरड घशाला 
शुरून्युज : सुनिल आण्णा सोनवणे
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघदर्डी या गावात धरण जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे त्याचे कारणही तसेच गेल्या महिन्यापासून गावात काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालय गाठत या ठिकाणी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करत पाणी द्या हो पाणी द्या अशा घोषणा देत पाण्यासाठी विनवणी केली मात्र या गावात गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवक नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी बोलून दाखवल्या तर गेल्या महिन्यात ते पंधरा दिवसापासून गावात पिण्यासाठी पाण्याची वणवण करावा लागत आहे त्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला असेच म्हणावे लागेल
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर पर राज्यातील कांदा.... नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... 20 ते 35 ट्रॅकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप... उमराणा (देवळा):- नाशिकच्या उमराणा येथील एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25 ट्रॅक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सदर ट्रॅक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जमा झाल्याने काही तणाव निर्माण झाला होता. गोडाऊन दोन संस्था साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी उतरण्यात येत असल्याने होता. एन. सी. सी. एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. दुसरीकडे नाफेड एन. सी. सी. एफ सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रॅक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी केलेले आरोप संस्थांनी फेटाळला आहे. -
    4
    नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार...
एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर पर राज्यातील कांदा....
नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार...
20 ते 35 ट्रॅकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप...
उमराणा (देवळा):-  नाशिकच्या उमराणा येथील एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25  ट्रॅक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी  सदर ट्रॅक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जमा झाल्याने काही तणाव निर्माण झाला होता. गोडाऊन दोन संस्था साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी  उतरण्यात येत असल्याने होता. एन. सी. सी. एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. दुसरीकडे नाफेड एन. सी. सी. एफ सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी  खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रॅक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी केलेले आरोप  संस्थांनी फेटाळला आहे. -
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 20 नगर सेवक, 1 आमदार और विपक्ष..फिर भी व्यवस्था फेल!अग्निवीर भर्ती हर साल, नेताओं की प्लानिंग कब? #viral #mumbaimudda #वायरल #mumbra #मुंब्रा #mumbrakausa #अग्निवीर #AgniveerRecruitment #everyonefollowers #थानेमहानगरपालिका #viralreelschallenge Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @highlight CMOMaharashtra Faisal Shaikh Kalpana Surywanshi Tauheed Shaikh 20 नगर सेवक, 1 आमदार और विपक्ष..फिर भी व्यवस्था फेल!अग्निवीर भर्ती हर साल, नेताओं की प्लानिंग कब? #viral #mumbaimudda #वायरल #mumbra #मुंब्रा #mumbrakausa #अग्निवीर #AgniveerRecruitment #everyonefollowers #थानेमहानगरपालिका #viralreelschallenge Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @highlight CMOMaharashtra Faisal Shaikh Kalpana Surywanshi Tauheed Shaikh
    1
    20 नगर सेवक, 1 आमदार और विपक्ष..फिर भी व्यवस्था फेल!अग्निवीर भर्ती हर साल, नेताओं की प्लानिंग कब?
#viral #mumbaimudda #वायरल #mumbra #मुंब्रा #mumbrakausa #अग्निवीर #AgniveerRecruitment #everyonefollowers #थानेमहानगरपालिका #viralreelschallenge 
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @highlight CMOMaharashtra Faisal Shaikh Kalpana Surywanshi Tauheed Shaikh
20 नगर सेवक, 1 आमदार और विपक्ष..फिर भी व्यवस्था फेल!अग्निवीर भर्ती हर साल, नेताओं की प्लानिंग कब?
#viral #mumbaimudda #वायरल #mumbra #मुंब्रा #mumbrakausa #अग्निवीर #AgniveerRecruitment #everyonefollowers #थानेमहानगरपालिका #viralreelschallenge 
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @highlight CMOMaharashtra Faisal Shaikh Kalpana Surywanshi Tauheed Shaikh
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुरबाड शाळा क्रमांक २ मध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ! मुरबाड /२८ जुलै २०२६, मंगळवार रोजी मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा, मुरबाड शाळा क्रमांक २ येथे सारा आकाश ट्रस्टच्या वतीने ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शालेय किटचे वाटप करण्यात आले. या शालेय किटमध्ये वह्या, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. सारा आकाश ट्रस्टचे ट्रस्टी रवि नारायणी व शितल नारायणी यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सारा आकाश ट्रस्टचे कार्यकर्ते नथू पारधी व प्रकाश मेंगाळ यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाला जि. प. शाळेचे वरिष्ठ शिक्षक विलास धुमाळ सर, काशिनाथ राऊत , नरेश माळी , योगेंद्र बांगर , वसुधा भोईर , डॉ. निळकंठ व्यापारी आणि भालचंद्र गोडांबे उपस्थित होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सारा आकाश ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
    1
    मुरबाड शाळा क्रमांक २ मध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

मुरबाड /२८ जुलै २०२६, मंगळवार रोजी मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा, मुरबाड शाळा क्रमांक २ येथे सारा आकाश ट्रस्टच्या वतीने ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शालेय किटचे वाटप करण्यात आले.
या शालेय किटमध्ये वह्या, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. सारा आकाश ट्रस्टचे ट्रस्टी रवि नारायणी  व शितल नारायणी  यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सारा आकाश ट्रस्टचे कार्यकर्ते नथू पारधी व प्रकाश मेंगाळ यांचे मोलाचे योगदान लाभले.
या कार्यक्रमाला जि. प. शाळेचे वरिष्ठ शिक्षक विलास धुमाळ सर, काशिनाथ राऊत , नरेश माळी , योगेंद्र बांगर , वसुधा भोईर , डॉ. निळकंठ व्यापारी  आणि भालचंद्र गोडांबे  उपस्थित होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सारा आकाश ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ठाणे क्राइम ब्रांच ने 3.04 करोड़ की ड्रग्स की बरामद || Islamuddin Khan ठाणे क्राइम ब्रांच ने 3.04 करोड़ की ड्रग्स की बरामद
    1
    ठाणे क्राइम ब्रांच ने 3.04 करोड़ की ड्रग्स की बरामद || Islamuddin Khan
ठाणे क्राइम ब्रांच ने 3.04 करोड़ की ड्रग्स की बरामद
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • उपनगर पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक; आरोपींची परिसरातून धिंड फर्नांडिस वाडी व सुंदरनगर परिसरात कोयते हातात घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन टोळ्यांतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढून कायद्याचा धाक दाखविण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वर्चस्वाच्या वादातून सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरात काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी पहिल्या घटनेत आजीम शेख, मोईज शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भैय्यू ढेनवळ, सोनू बेद, प्रेम ढेनवळ, साहिल नायर व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत. तपासादरम्यान आजीम शेख, इजान शेख ऊर्फ इन्नी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, राहुल उज्जेनवळ, गणेश काळे, विजय आहेर, चिम्या व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा उपनगर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, योगेश आहेर ऊर्फ काका, सचिन गावंडर ऊर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्या सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरातून पोलिस बंदोबस्तात फिरविण्यात आले. गुन्हेगारीला कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि नाशिक शहरात कायद्याचे राज्य कायम राहील, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डंबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, लोकेश पवार, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज कर्पे, योगेश जाधव, सूरज गवळी, आनंद घुगरे, महिला पोलिस शिपाई मयुरी विझेकर आदींच्या पथकाने केली. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    4
    उपनगर पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक; आरोपींची परिसरातून धिंड
फर्नांडिस वाडी व सुंदरनगर परिसरात कोयते हातात घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन टोळ्यांतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढून कायद्याचा धाक दाखविण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वर्चस्वाच्या वादातून सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरात काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
या प्रकरणी पहिल्या घटनेत आजीम शेख, मोईज शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भैय्यू ढेनवळ, सोनू बेद, प्रेम ढेनवळ, साहिल नायर व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत. तपासादरम्यान आजीम शेख, इजान शेख ऊर्फ इन्नी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, राहुल उज्जेनवळ, गणेश काळे, विजय आहेर, चिम्या व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा उपनगर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, योगेश आहेर ऊर्फ काका, सचिन गावंडर ऊर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्या सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरातून पोलिस बंदोबस्तात फिरविण्यात आले. गुन्हेगारीला कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि नाशिक शहरात कायद्याचे राज्य कायम राहील, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डंबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, लोकेश पवार, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच  संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज कर्पे, योगेश जाधव, सूरज गवळी, आनंद घुगरे, महिला पोलिस शिपाई मयुरी विझेकर आदींच्या पथकाने केली.
दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.