logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चांदवड तालुक्यातील वागदर्डी येथे धरण उशाला कोरड घशाला शुरून्युज : सुनिल आण्णा सोनवणे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघदर्डी या गावात धरण जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे त्याचे कारणही तसेच गेल्या महिन्यापासून गावात काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालय गाठत या ठिकाणी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करत पाणी द्या हो पाणी द्या अशा घोषणा देत पाण्यासाठी विनवणी केली मात्र या गावात गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवक नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी बोलून दाखवल्या तर गेल्या महिन्यात ते पंधरा दिवसापासून गावात पिण्यासाठी पाण्याची वणवण करावा लागत आहे त्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला असेच म्हणावे लागेल

9 hrs ago
user_SUNIL ANNA SONAWANE
SUNIL ANNA SONAWANE
Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
9 hrs ago

चांदवड तालुक्यातील वागदर्डी येथे धरण उशाला कोरड घशाला शुरून्युज : सुनिल आण्णा सोनवणे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघदर्डी या गावात धरण जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे त्याचे कारणही तसेच गेल्या महिन्यापासून गावात काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालय गाठत या ठिकाणी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करत पाणी द्या हो पाणी द्या अशा घोषणा देत पाण्यासाठी विनवणी केली मात्र या गावात गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवक नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी बोलून दाखवल्या तर गेल्या महिन्यात ते पंधरा दिवसापासून गावात पिण्यासाठी पाण्याची वणवण करावा लागत आहे त्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला असेच म्हणावे लागेल

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर पर राज्यातील कांदा.... नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... 20 ते 35 ट्रॅकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप... उमराणा (देवळा):- नाशिकच्या उमराणा येथील एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25 ट्रॅक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सदर ट्रॅक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जमा झाल्याने काही तणाव निर्माण झाला होता. गोडाऊन दोन संस्था साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी उतरण्यात येत असल्याने होता. एन. सी. सी. एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. दुसरीकडे नाफेड एन. सी. सी. एफ सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रॅक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी केलेले आरोप संस्थांनी फेटाळला आहे. -
    4
    नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार...
एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर पर राज्यातील कांदा....
नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार...
20 ते 35 ट्रॅकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप...
उमराणा (देवळा):-  नाशिकच्या उमराणा येथील एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25  ट्रॅक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी  सदर ट्रॅक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जमा झाल्याने काही तणाव निर्माण झाला होता. गोडाऊन दोन संस्था साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी  उतरण्यात येत असल्याने होता. एन. सी. सी. एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. दुसरीकडे नाफेड एन. सी. सी. एफ सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी  खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रॅक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी केलेले आरोप  संस्थांनी फेटाळला आहे. -
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • दीक्षांत समारंभ ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा-राज्यपाल जिष्णू देव वर्मा नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात घेतलेले ज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते तेव्हा आरोग्य शिक्षण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरते. दीक्षांत समारंभ पदवी प्रदान सोहळा नाही, तर ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या आजीवन वचनबद्धतेचा उत्सव आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ आज सकाळी विद्यापीठात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्री. वर्मा यांनी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना कर्तव्याची शपथ दिली. राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. तुमच्या सेवाकार्यामुळे रुग्णाचे दुःख कमी होऊन गरजू लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होईल. आरोग्य क्षेत्र व्यावसायिक झाल्याने समाज तुमच्याकडे विश्वास आणि आशेने पाहणार आहे. तुम्ही दिलेली औषधे रुग्ण कदाचित विसरेल. मात्र, तुमची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा तो कधीही विसरणार नाही. विकसित भारत २०४७ ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य व्यावसायिक केवळ वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान, संशोधनाची दृष्टी, नैतिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीही असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मूलभूत बाबींना बळकटी देत आहे ही समाधानाची बाब आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण, शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा, संशोधनाला प्रोत्साहन आणि विद्यापीठ प्रशासन अधिक पारदर्शक व विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब कुलगुरूंच्या अहवालात दिसून येते. पेपरलेस प्रशासन, डिजिटल प्रमाणपत्रे, ॲकेडॅमिक बँक ऑफ क्रेडीटस (Academic Bank of Credits) आणि तंत्रज्ञानाधारित सेवा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यापीठाची सुशासन आणि कार्यक्षम सार्वजनिक सेवा देण्याची बांधिलकी दिसून येते, असेही ते म्हणाले. संशोधन आणि नवोपक्रमावर दिला जाणारा भर कौतुकास्पद आहे. संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य, शिक्षक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्राची स्थापना यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक मजबूत होईल. संशोधनातून ज्ञानाची वाढ होते आणि हेच संशोधन आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन घडवून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवते, असेही राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले. आरोग्य शिक्षणातील गुणवत्ता ही थेट समाजातील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. जनुकीय संशोधन, नवजात शिशू तपासणी, आदिवासी आरोग्य, थॅलेसेमिया प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण आणि इतर स्थानिक आरोग्यविषयक समस्यांवर केले जाणारे संशोधन हे राज्यातील जनतेच्या वास्तविक आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाची बांधिलकी दर्शवते. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी कधीही शिकणे थांबवू नये. वैद्यकीय विज्ञान दररोज विकसित होत आहे आणि आजीवन शिक्षण ही प्रत्येक यशस्वी आरोग्य व्यावसायिकाची ओळख आहे. नैतिकतेची सर्वोच्च मूल्ये जपावीत. नैतिक आचरणाशिवाय केवळ व्यावसायिक कौशल्य समाजाचा विश्वास संपादन करू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल नवकल्पना ही प्रभावी साधने आहेत; मात्र उपचाराची सुरुवात सहानुभूतीतून होते, असेही राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले. डॉ. पंढरे म्हणाले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चांगली कामगिरी बजावली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. विद्यार्थ्यांनी आता अभ्यासातून समाजसेवेकडे वाटचाल करताना गरिबांची सेवा करावी. गुणवत्ता हे एकमेव साधन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे. त्यांनी मोठे ध्येय ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, १९९८ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. संशोधन, नावीण्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा विद्यापीठातर्फे स्वीकार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सरदेशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. स्वप्नील तोरणे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सदानंद सरदेशमुख यांना डी. लिट. विद्यापीठातर्फे डॉ. सदानंद सरदेशमुख यांना त्यांच्या सेवेबद्दल डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. सरदेशमुख यांनी आयुर्वेद विद्याशाखेतील शिक्षण, सेवा आणि मानव कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पुणे विद्यापीठातून आयुर्वेदातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळविणारे ते पहिले पदवीधारक आहेत. साहित्य, शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा आणि वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक सेवेसाठी समर्पित भावनेने काम केले आहे. त्यांनी १९६७ पासून आयुर्वेद सल्लागार म्हणून काम सुरू केले. १९९४ मध्ये एकात्मिक कर्करोग संशोधन प्रकल्प सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून १६ हजारांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना लाभ झाला आहे. याबरोबरच एचआयव्ही एड्स, संधीवात, महिला व बालकल्याण, हाडांच्या उपचारावर त्यांनी भरीव संशोधन केले आहे. आरोग्य सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डी. लिट. पदवी प्रदान करीत सन्मानित केले आहे. १२ हजार २६३ विद्यार्थ्यांना पदवी या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२ हजार २६३ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच २० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी), तर विविध विद्याशाखेतील ९९ विद्यार्थ्यांना १४६ सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दीक्षांत समारंभात वैद्यकीय विद्याशाखा पदवीचे ६६२१, दंत विद्याशाखा पदवीचे २१९२, आयुर्वेद व युनानी विद्याशाखा पदवीचे १३३, होमिओपॅथी विद्याशाखा पदवीचे ४०५, नर्सिंग विद्याशाखा पदवीचे ७३२, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी पदवीचे ३६९, पदव्युत्त वैद्यकीय शाखेचे २०७, दंत, बी. एससी. पॅरामेडिकलचे ३१५, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीचे १२७२, अलाईडच्या १७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
    1
    दीक्षांत समारंभ ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा-राज्यपाल जिष्णू देव वर्मा
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात घेतलेले ज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते तेव्हा आरोग्य शिक्षण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरते. दीक्षांत समारंभ पदवी प्रदान सोहळा नाही, तर ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या आजीवन वचनबद्धतेचा उत्सव आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ आज सकाळी विद्यापीठात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, 
कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपस्थित होते. 
यावेळी राज्यपाल श्री. वर्मा यांनी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना कर्तव्याची शपथ दिली.
राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. तुमच्या सेवाकार्यामुळे रुग्णाचे दुःख कमी होऊन गरजू लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होईल. आरोग्य क्षेत्र व्यावसायिक झाल्याने समाज तुमच्याकडे विश्वास आणि आशेने पाहणार आहे. तुम्ही दिलेली औषधे रुग्ण कदाचित विसरेल. मात्र, तुमची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा तो कधीही विसरणार नाही.
विकसित भारत २०४७ ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य व्यावसायिक केवळ वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान, संशोधनाची दृष्टी, नैतिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीही असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मूलभूत बाबींना बळकटी देत आहे ही समाधानाची बाब आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण, शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा, संशोधनाला प्रोत्साहन आणि विद्यापीठ प्रशासन अधिक पारदर्शक व विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब कुलगुरूंच्या अहवालात दिसून येते. पेपरलेस प्रशासन, डिजिटल प्रमाणपत्रे, ॲकेडॅमिक बँक ऑफ क्रेडीटस (Academic Bank of Credits) आणि तंत्रज्ञानाधारित सेवा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यापीठाची सुशासन आणि कार्यक्षम सार्वजनिक सेवा देण्याची बांधिलकी दिसून येते, असेही ते म्हणाले.
संशोधन आणि नवोपक्रमावर दिला जाणारा भर कौतुकास्पद आहे. संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य, शिक्षक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्राची स्थापना यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक मजबूत होईल. संशोधनातून ज्ञानाची वाढ होते आणि हेच संशोधन आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन घडवून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवते, असेही राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले. 
आरोग्य शिक्षणातील गुणवत्ता ही थेट समाजातील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. जनुकीय संशोधन, नवजात शिशू तपासणी, आदिवासी आरोग्य, थॅलेसेमिया प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण आणि इतर स्थानिक आरोग्यविषयक समस्यांवर केले जाणारे संशोधन हे राज्यातील जनतेच्या वास्तविक आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाची बांधिलकी दर्शवते. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी कधीही शिकणे थांबवू नये. वैद्यकीय विज्ञान दररोज विकसित होत आहे आणि आजीवन शिक्षण ही प्रत्येक यशस्वी आरोग्य व्यावसायिकाची ओळख आहे. नैतिकतेची सर्वोच्च मूल्ये जपावीत. नैतिक आचरणाशिवाय केवळ व्यावसायिक कौशल्य समाजाचा विश्वास संपादन करू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल नवकल्पना ही प्रभावी साधने आहेत; मात्र उपचाराची सुरुवात सहानुभूतीतून होते, असेही राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले.
डॉ. पंढरे म्हणाले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चांगली कामगिरी बजावली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. विद्यार्थ्यांनी आता अभ्यासातून समाजसेवेकडे वाटचाल करताना गरिबांची सेवा करावी. गुणवत्ता हे एकमेव साधन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे. त्यांनी मोठे ध्येय ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. 
कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, १९९८ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. संशोधन, नावीण्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा विद्यापीठातर्फे स्वीकार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.   
डॉ. सरदेशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. स्वप्नील तोरणे यांनी मानपत्राचे वाचन केले. 
डॉ. तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
डॉ. सदानंद सरदेशमुख यांना डी. लिट.
विद्यापीठातर्फे डॉ. सदानंद सरदेशमुख यांना त्यांच्या सेवेबद्दल डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. सरदेशमुख यांनी आयुर्वेद विद्याशाखेतील शिक्षण, सेवा आणि मानव कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पुणे विद्यापीठातून आयुर्वेदातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळविणारे ते पहिले पदवीधारक आहेत. साहित्य, शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा आणि वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक सेवेसाठी समर्पित भावनेने काम केले आहे. त्यांनी १९६७ पासून आयुर्वेद सल्लागार म्हणून काम सुरू केले. १९९४ मध्ये एकात्मिक कर्करोग संशोधन प्रकल्प सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून १६ हजारांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना लाभ झाला आहे. याबरोबरच एचआयव्ही एड्स, संधीवात, महिला व बालकल्याण, हाडांच्या उपचारावर त्यांनी भरीव संशोधन केले आहे. आरोग्य सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डी. लिट. पदवी प्रदान करीत सन्मानित केले आहे. 
१२ हजार २६३ विद्यार्थ्यांना पदवी
या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२ हजार २६३ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच २० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी), तर विविध विद्याशाखेतील ९९ विद्यार्थ्यांना १४६ सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 
दीक्षांत समारंभात वैद्यकीय विद्याशाखा पदवीचे ६६२१, दंत विद्याशाखा पदवीचे २१९२, आयुर्वेद व युनानी विद्याशाखा पदवीचे १३३, होमिओपॅथी विद्याशाखा पदवीचे ४०५, नर्सिंग विद्याशाखा पदवीचे ७३२, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी पदवीचे ३६९, पदव्युत्त वैद्यकीय शाखेचे २०७, दंत, बी. एससी. पॅरामेडिकलचे ३१५, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीचे १२७२, अलाईडच्या १७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • *भूकंपामुळे घाबरू नका - याला 'भूकंप-समूह' (swarm earthquake) असे म्हणतात.*
    1
    *भूकंपामुळे घाबरू नका - याला 'भूकंप-समूह' (swarm earthquake) असे म्हणतात.*
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न
    1
    पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम
पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुड अटक...... शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुडांना अटक झाली असून ते मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात.
    1
    शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुड अटक......
शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुडांना अटक झाली असून ते मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ​युवकांसाठी मोठी संधी! देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा स्पर्धा; MY Bharat पोर्टलवर नोंदणी सुरू
    1
    ​युवकांसाठी मोठी संधी! देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा स्पर्धा; MY Bharat पोर्टलवर नोंदणी सुरू
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • उपनगर पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक; आरोपींची परिसरातून धिंड फर्नांडिस वाडी व सुंदरनगर परिसरात कोयते हातात घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन टोळ्यांतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढून कायद्याचा धाक दाखविण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वर्चस्वाच्या वादातून सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरात काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी पहिल्या घटनेत आजीम शेख, मोईज शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भैय्यू ढेनवळ, सोनू बेद, प्रेम ढेनवळ, साहिल नायर व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत. तपासादरम्यान आजीम शेख, इजान शेख ऊर्फ इन्नी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, राहुल उज्जेनवळ, गणेश काळे, विजय आहेर, चिम्या व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा उपनगर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, योगेश आहेर ऊर्फ काका, सचिन गावंडर ऊर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्या सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरातून पोलिस बंदोबस्तात फिरविण्यात आले. गुन्हेगारीला कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि नाशिक शहरात कायद्याचे राज्य कायम राहील, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डंबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, लोकेश पवार, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज कर्पे, योगेश जाधव, सूरज गवळी, आनंद घुगरे, महिला पोलिस शिपाई मयुरी विझेकर आदींच्या पथकाने केली. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    4
    उपनगर पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक; आरोपींची परिसरातून धिंड
फर्नांडिस वाडी व सुंदरनगर परिसरात कोयते हातात घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन टोळ्यांतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढून कायद्याचा धाक दाखविण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वर्चस्वाच्या वादातून सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरात काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
या प्रकरणी पहिल्या घटनेत आजीम शेख, मोईज शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भैय्यू ढेनवळ, सोनू बेद, प्रेम ढेनवळ, साहिल नायर व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत. तपासादरम्यान आजीम शेख, इजान शेख ऊर्फ इन्नी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, राहुल उज्जेनवळ, गणेश काळे, विजय आहेर, चिम्या व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा उपनगर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, योगेश आहेर ऊर्फ काका, सचिन गावंडर ऊर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्या सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरातून पोलिस बंदोबस्तात फिरविण्यात आले. गुन्हेगारीला कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि नाशिक शहरात कायद्याचे राज्य कायम राहील, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डंबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, लोकेश पवार, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच  संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज कर्पे, योगेश जाधव, सूरज गवळी, आनंद घुगरे, महिला पोलिस शिपाई मयुरी विझेकर आदींच्या पथकाने केली.
दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.