Shuru
Apke Nagar Ki App…
युवकांसाठी मोठी संधी! देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा स्पर्धा; MY Bharat पोर्टलवर नोंदणी सुरू
लोखंडे संभाजी नगर पत्रकार
युवकांसाठी मोठी संधी! देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा स्पर्धा; MY Bharat पोर्टलवर नोंदणी सुरू
More news from Jalna and nearby areas
- भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली असून **तीन आरोपींना अटक** करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी बँकेतून काढलेली रक्कम पिकअप वाहनातून चोरट्यांनी लंपास केली होती. सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून **₹8.80 लाखांची रोख रक्कम** जप्त करण्यात आली असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व भोकरदन पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1
- दिवसाढवळ्या 9 लाखांची रक्कम लंपास, भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई . मध्य प्रदेशातून 8 लाख 80 हजार हस्तगत, 3 आंतरराज्य चोरटे गजाआड महिलांचा विश्वास परत मिळवला बचत गटाच्या महिलांनी पोलिसांचा केला सत्कार भोकरदन शहर आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या 9 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा भोकरदन पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील राजगड आणि गुणा जिल्ह्यातून 3 आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 8 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या धडाकेबाज कारवाईने कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिलांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी पोलिसांचा सत्कार करून आभार मानले दि. 23 जुलै 2026 रोजी दुपारी 4 ते 4.30 च्या सुमारास कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिला बबीता भागाजी इच्चे वय 40 या भारतीय स्टेट बँक भोकरदन शाखेतून बचत गटाचे 9 लाख रुपये काढून त्यांच्या पिकअप वाहन क्रमांक MH-21-BH-0504 मध्ये ठेवून भोकरदन ते जाफ्राबाद रोडवरील रत्नमाला लॉनजवळ चहा पिण्यासाठी थांबल्या. काही क्षणांतच अज्ञात चोरट्यांनी वाहनाची डावी बाजूची काच फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. या घटने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांनी विशेष पथक तयार केले. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच SBI बँक आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरटे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुलखेडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल बांगर, संतोष बनकर, पोलीस अंमलदार यांच्या पथकाने तात्काळ मध्य प्रदेशात धाव घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले. 1.राहुल उत्तम सिसोदीया वय 22, रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड 2.कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदीया, रा. कडीया, ता. पचोर, जि. राजगड 3.कल्लू उर्फ जगप्रकाश सांसी वय 25, रा. मुगावली, ता. गुणा, जि. अशोकनगर आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले पोलिसांच्या तपासात समोर आले की, हे आरोपी टोळीने काम करतात. एकजण बँकेत आणि सोन्याच्या दुकानात रेकी करतो, तर दुसरा वाहनासह बाहेर लक्ष ठेवतो. गुन्हा करून ते लगेच लॉजवर थांबत नाहीत आणि मोटारसायकलसह हेल्मेटचा वापर करतात पोलिसांनी हस्तगत केलेली रक्कम आज भोकरदन पोलीस स्टेशनच्या आवारात बचत गटाच्या महिलांना परत करण्यात आली. पैसे परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिलांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बचत गटाच्या महिला म्हणाल्या, आमची आयुष्यभराची पुंजी होती. पोलीसांनी ती परत मिळवून दिली. आमचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठी रक्कम एकट्याने घेऊन जाऊ नये. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावा. रक्कम उघडपणे दाखवू नये. बँकेतून पैसे काढल्यानंतर थेट घरी किंवा ऑफिसला जावे. निर्जन ठिकाणी वाहन थांबवू नये. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू यांनी संपूर्ण भोकरदन पोलीस टीमचे कौतुक केले आहे. इसरारखान पठाण पत्रकार भोकरदन तर्फे भोकरदन पोलिसांच्या या तत्पर आणि व्यावसायिक कामगिरीचे अभिनंदन!4
- सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील एका सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका भामट्याने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सराफा दुकानात ग्राहक असल्याचे भासवत आला. त्याने विविध दागिने पाहिल्यानंतर दीड तोळ्याची सोन्याची अंगठी पाहण्यासाठी घेतली. संधी साधत त्याने अंगठी स्वतःजवळ ठेवली आणि दुकानातून बाहेर पडत पोबारा केला. काही वेळाने अंगठी नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गंगापूरमधील सराफा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांना दागिने दाखविताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.1
- वंदे भारत एक्सप्रेस चक्क १ तास कसारा घाटात बंद पडली प्रवाशांची तारांबळ वंदे भारत एक्सप्रेस गेल्या १ तासांपासून कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली असून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नाही. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने इमर्जंसी दरवाजे उघडण्यात आले आहेत. देशच्या रेल्वे मंत्र्यांनी फक्त “रील मंत्री” बनून न राहता रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते.1
- पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न1
- संपूर्ण देश पेपर लिकने परेशान आहे तर मालेगावकर पाईप लाईन लिकने परेशान आहेत. फुटलेल्या व लिक झालेल्या मुख्य पाईप लाईनची पाहणी करताना आयुक्त रवींद्र जाधव, मुश्तकीन डिगनिटी, इंजिनिअर! ही परेशानी व कटकट कायमची केव्हा बंद होईल. सर्वजण परेशान आहेत. सेना नगरसेवक निलेश काकडे यांनी पाईप लाईन कामावर होणाऱ्या महासभेच्या बैठकीत चर्चा करणेची मागणी केली आहे.1
- शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट; नियमावलीवर न्यायालयाचा भर, सुनावणी तीन आठवड्यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली असून प्रकरणाच्या पुढील कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची चर्चा झाली. यापूर्वीच्या दोन निर्णयांमध्ये शासनाचे जीआर न्यायालयाने अमान्य केले होते, तर 12 जूनच्या आदेशात न्यायालयाने स्वतः नियमावली तयार करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शासनाने स्वतंत्र ठराव सादर करून कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले. मात्र, याचिकाकर्त्यांनी या ठरावाला नियमांशिवाय कायदेशीर वैधता नसल्याचा आक्षेप नोंदवला. या मुद्द्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर निश्चित केली आहे. पुढील सुनावणीत एसआयटीने प्रकरणाचा तपास कोणत्या पद्धतीने करावा याबाबत न्यायालय मार्गदर्शक नियमावली तयार करण्याची शक्यता आहे. दोन वर्षे उलटूनही प्रकरणात ठोस प्रगती न झाल्याने तपासाला गती देण्याची मागणीही न्यायालयासमोर करण्यात आली.1
- शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुड अटक...... शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुडांना अटक झाली असून ते मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात.1
- धुळे अपडेट: सोनगीरजवळ ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प, सहचालक गंभीर जखमी धुळे अपडेट: सोनगीरजवळ ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प, सहचालक गंभीर जखमी #DhuleNews #SongirAccident #Dhule #TruckAccident #BreakingNews1