Shuru
Apke Nagar Ki App…
शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुड अटक...... शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुडांना अटक झाली असून ते मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात.
नव दर्पण
शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुड अटक...... शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुडांना अटक झाली असून ते मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- देवळा येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आर.पी.आय. (आठवले) गटाचे पोलिसांना निवेदन देवळा: अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच यासंदर्भातील अभ्यास गट समितीचा अहवाल जाहीर करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) देवळा तालुक्याच्या वतीने देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. शासनाकडून अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून या निर्णयाला समाजाचा तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजाच्या ऐक्याला तडा जाऊन समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आर.पी.आय.ने केली आहे. निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत: अहवाल जाहीर करावा: निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गट समितीने तयार केलेला अहवाल, त्यातील निरीक्षणे व शिफारसी सार्वजनिक करण्यात याव्यात. हरकती व सूचना मागवाव्यात: अहवाल जाहीर केल्यानंतर नागरिकांना आणि सामाजिक संघटनांना त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा. अधिकारांवर गदा आणू नये: १९३२ च्या ऐतिहासिक पुणे करारामुळे अनुसूचित जातीच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीला बाधा आणणारा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये. हे निवेदन आर.पी.आय.चे देवळा तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार यांनी जिल्हा संघटक आय. यु. शांताराम पवार व जिल्हा उपाध्यक्ष कैलास जिभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनास सुपूर्द केले. याप्रसंगी महेंद्र धोंडीराम आदिले, रमेश पवार, राहुलजी शिरे, समाधान कराटे, प्रदीप अशोक पवार, सुनील वसंत पवार, चंद्रभान गोविंद आहिरे, संदीप पवार, सागर आहिरे, सनी पवार, प्रदीप पवार, शुभम आहिरे, महेश बच्छाव, मेहुल पवार, रितेश पवार यांच्यासह आर.पी.आय.चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- युवकांसाठी मोठी संधी! देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा स्पर्धा; MY Bharat पोर्टलवर नोंदणी सुरू1
- शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. शाळा मेसनरखेडे शाळेचे घवघवीत यश ! प्रतिनिधी- सुनिल आण्णा सोनवणे महाराष्ट्र आासनाकडुन रखर्थी र-४ थीआणी इयत्ता सातवी च्या स्कॉलरशीप परिक्षा घेतल्या जातात, तरि मेसनखेडे खुर्द शाळेतील इयत्ता ४धी धनश्री गणेश, थोरात, पियुष नितीन पगारे भाग्यश्री दत्तात्रय पवार हे विद्यार्थी व इयत्ता ७वीमधील साई कात्मिक ठोंबरे निकीता बाळू मार्कंड, धनश्री गणेश जाधव ह्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन गुणवत्ता यादीत स्थान मिळविले याकामी शाळेतील सर्व शिक्षकांनी सदर विद्यार्थ्यांना विषय निहाय संपुर्ण मार्गदर्शन केले, तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सर्व मागदर्शक सुचनांप्रमाणे विद्यार्थांची तयारी करुन घेतल्याने हे यश मिळाले. गावातील ग्रामपंचायत सदस्य नितीनभाऊ पगारे, दिलिप पगार तसेच शिक्षकही उपश्थित होते. बिडगर, होके, वर्षा अभोणकर वैशाली पवार, गिता माळी, सुरेखा पवार योगिता पगारे अंगणवाडी कर्मचारी देवरे मॅडम उपस्थित होते,1
- सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील एका सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका भामट्याने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सराफा दुकानात ग्राहक असल्याचे भासवत आला. त्याने विविध दागिने पाहिल्यानंतर दीड तोळ्याची सोन्याची अंगठी पाहण्यासाठी घेतली. संधी साधत त्याने अंगठी स्वतःजवळ ठेवली आणि दुकानातून बाहेर पडत पोबारा केला. काही वेळाने अंगठी नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गंगापूरमधील सराफा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांना दागिने दाखविताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.1
- नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर पर राज्यातील कांदा.... नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... 20 ते 35 ट्रॅकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप... उमराणा (देवळा):- नाशिकच्या उमराणा येथील एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25 ट्रॅक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सदर ट्रॅक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जमा झाल्याने काही तणाव निर्माण झाला होता. गोडाऊन दोन संस्था साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी उतरण्यात येत असल्याने होता. एन. सी. सी. एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. दुसरीकडे नाफेड एन. सी. सी. एफ सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रॅक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी केलेले आरोप संस्थांनी फेटाळला आहे. -4
- चांदवड तालुक्यातील वागदर्डी येथे धरण उशाला कोरड घशाला शुरून्युज : सुनिल आण्णा सोनवणे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघदर्डी या गावात धरण जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे त्याचे कारणही तसेच गेल्या महिन्यापासून गावात काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालय गाठत या ठिकाणी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करत पाणी द्या हो पाणी द्या अशा घोषणा देत पाण्यासाठी विनवणी केली मात्र या गावात गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवक नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी बोलून दाखवल्या तर गेल्या महिन्यात ते पंधरा दिवसापासून गावात पिण्यासाठी पाण्याची वणवण करावा लागत आहे त्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला असेच म्हणावे लागेल3
- भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली असून **तीन आरोपींना अटक** करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी बँकेतून काढलेली रक्कम पिकअप वाहनातून चोरट्यांनी लंपास केली होती. सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून **₹8.80 लाखांची रोख रक्कम** जप्त करण्यात आली असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व भोकरदन पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1
- धुळे ब्रेकिंग: शाळा-कॉलेज परिसरात छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा धडा, 25 उठाबश्या काढायला लावले... Dhule News | धुळे: शाळा-कॉलेज परिसरात छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा धडा, 25 उठाबश्या काढायला लावले... - विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी धुळे शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा आणि जे.आर.सिटी हायस्कूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. शाळा व महाविद्यालय परिसरात विनाकारण घुटमळणाऱ्या आणि विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. टवाळखोरांना 25 उठाबश्या काढायला लावून समज देऊन सोडण्यात आले. पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. - #dhulenews #DhulePolice #StudentSafety #VishalAnand #Tawalkhori1