logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर, महिलांवर आणि चिमुकल्या मुलांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत अमानुष व संविधानविरोधी असल्याचा आरोप करत जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गुरुवारी, 23 जुलै रोजी दुपारी सादर केलेल्या या निवेदनाद्वारे पीडितांना तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू होते. हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर करत उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलकांच्या रास्त मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांना मारहाण करण्यात आली, ही खेदाची बाब आहे. एकीकडे शासन 'बेटी बचाव, बेटी पढाओ'चा नारा देते आणि दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केली जाते, ज्यावेळी पोलिसांनी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतली असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली असून प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जंतर-मंतर येथील पीडित महिला, मुले व उपोषणकर्त्यांना शासनाने त्वरित न्याय द्यावा, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि देशातील वातावरण पूर्ववत करून कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर साद बीन मुबारक, मोईज अन्सारी, मोहसीन अफजल खान व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

3 hrs ago
user_सय्यद अबरार
सय्यद अबरार
Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
3 hrs ago

दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर, महिलांवर आणि चिमुकल्या मुलांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत अमानुष व संविधानविरोधी असल्याचा आरोप करत जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गुरुवारी, 23 जुलै रोजी दुपारी सादर केलेल्या या निवेदनाद्वारे पीडितांना तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू होते. हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर करत उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलकांच्या रास्त मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांना मारहाण करण्यात आली, ही खेदाची बाब आहे. एकीकडे शासन 'बेटी बचाव, बेटी पढाओ'चा नारा देते आणि दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केली जाते, ज्यावेळी पोलिसांनी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतली असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली असून प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जंतर-मंतर येथील पीडित महिला, मुले व उपोषणकर्त्यांना शासनाने त्वरित न्याय द्यावा, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि देशातील वातावरण पूर्ववत करून कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर साद बीन मुबारक, मोईज अन्सारी, मोहसीन अफजल खान व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर, महिलांवर आणि चिमुकल्या मुलांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत अमानुष व संविधानविरोधी असल्याचा आरोप करत जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गुरुवारी, 23 जुलै रोजी दुपारी सादर केलेल्या या निवेदनाद्वारे पीडितांना तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू होते. हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर करत उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलकांच्या रास्त मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांना मारहाण करण्यात आली, ही खेदाची बाब आहे. एकीकडे शासन 'बेटी बचाव, बेटी पढाओ'चा नारा देते आणि दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केली जाते, ज्यावेळी पोलिसांनी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतली असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली असून प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जंतर-मंतर येथील पीडित महिला, मुले व उपोषणकर्त्यांना शासनाने त्वरित न्याय द्यावा, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि देशातील वातावरण पूर्ववत करून कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर साद बीन मुबारक, मोईज अन्सारी, मोहसीन अफजल खान व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर, महिलांवर आणि चिमुकल्या मुलांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत अमानुष व संविधानविरोधी असल्याचा आरोप करत जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गुरुवारी, 23 जुलै रोजी दुपारी सादर केलेल्या या निवेदनाद्वारे पीडितांना तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू होते. हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर करत उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलकांच्या रास्त मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांना मारहाण करण्यात आली, ही खेदाची बाब आहे. एकीकडे शासन 'बेटी बचाव, बेटी पढाओ'चा नारा देते आणि दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केली जाते, ज्यावेळी पोलिसांनी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतली असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली असून प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जंतर-मंतर येथील पीडित महिला, मुले व उपोषणकर्त्यांना शासनाने त्वरित न्याय द्यावा, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि देशातील वातावरण पूर्ववत करून कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर साद बीन मुबारक, मोईज अन्सारी, मोहसीन अफजल खान व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि राहुल गांधींवरील अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले असून त्यांनी या कारवाईविरोधात जोरदार धरणे आंदोलन छेडले आहे.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि राहुल गांधींवरील अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले असून त्यांनी या कारवाईविरोधात जोरदार धरणे आंदोलन छेडले आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • बदनापूर शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यांवर व चौकांमध्ये दोरीवरची कसरत करणाऱ्या अवघ्या ५ ते ७ वर्षांच्या चिमुकलीचे दृश्य अतिशय वेदनादायक आणि वास्तववादी ठरत आहे. ही लहान मुलगी भीक न मागता आपली कला लोकांसमोर सादर करून चार पैसे कमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक नागरिक या चिमुकलीच्या कलेचे कौतुक करून तिला काही पैसे देतात आणि मिळणाऱ्या या अत्यल्प पैशांवरच तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भीक न मागता स्वतःच्या कलेच्या जोरावर चार पैसे मिळवण्याची ही धडपड असली, तरी गरिबीच्या गर्तेत अशा प्रकारे बालपण हरवून जाणे ही एक मोठी सामाजिक शोकांतिका आहे.
    1
    बदनापूर शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यांवर व चौकांमध्ये दोरीवरची कसरत करणाऱ्या अवघ्या ५ ते ७ वर्षांच्या चिमुकलीचे दृश्य अतिशय वेदनादायक आणि वास्तववादी ठरत आहे. ही लहान मुलगी भीक न मागता आपली कला लोकांसमोर सादर करून चार पैसे कमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक नागरिक या चिमुकलीच्या कलेचे कौतुक करून तिला काही पैसे देतात आणि मिळणाऱ्या या अत्यल्प पैशांवरच तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भीक न मागता स्वतःच्या कलेच्या जोरावर चार पैसे मिळवण्याची ही धडपड असली, तरी गरिबीच्या गर्तेत अशा प्रकारे बालपण हरवून जाणे ही एक मोठी सामाजिक शोकांतिका आहे.
    user_ADIL KHAN
    ADIL KHAN
    Local News Reporter Badnapur, Jalna•
    9 hrs ago
  • देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.
    1
    देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.
    user_किशोर शिंदे
    किशोर शिंदे
    पत्रकार घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भोकरदन येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अत्यंत उत्साहात पार पडले आहे. या शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या प्रश्नांचा जागीच निपटारा करण्यात आला आहे.
    1
    भोकरदन येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अत्यंत उत्साहात पार पडले आहे. या शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या प्रश्नांचा जागीच निपटारा करण्यात आला आहे.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जालन्यात अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी महापौर वंदना मगरे यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसताना महापौरांनी दबावापोटी नोटीस बजावल्याचा दावा त्यांनी केला. जालना शहरातील हॉटेल आनंदी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सभेची व्हिडिओ क्लिप पत्रकारांना दाखवली आणि महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट करत ती नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून केराच्या टोपलीत फेकून दिली. नोटीस बजावून आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असून राजकीय कोंडी करण्यासाठी व अपक्ष असल्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो, मात्र जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, स्वतः महापालिका कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ असणार, असा टोलाही त्यांनी मनपा प्रशासनाला लगावला. दरम्यान, महापौरांनी बजावलेल्या या नोटीसला कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने उत्तर देणार असल्याचे पांगारकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच महापौरांनाही कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
    1
    जालन्यात अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी महापौर वंदना मगरे यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसताना महापौरांनी दबावापोटी नोटीस बजावल्याचा दावा त्यांनी केला. जालना शहरातील हॉटेल आनंदी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सभेची व्हिडिओ क्लिप पत्रकारांना दाखवली आणि महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट करत ती नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून केराच्या टोपलीत फेकून दिली.

नोटीस बजावून आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असून राजकीय कोंडी करण्यासाठी व अपक्ष असल्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो, मात्र जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, स्वतः महापालिका कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ असणार, असा टोलाही त्यांनी मनपा प्रशासनाला लगावला.

दरम्यान, महापौरांनी बजावलेल्या या नोटीसला कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने उत्तर देणार असल्याचे पांगारकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच महापौरांनाही कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका मुंबई पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आंदोलनात पुन्हा दिसल्यास "५० ग्रॅम पावडर टाकून देईन", अशा शब्दांत या पोलिसाने आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी दिली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलीस अधिकाऱ्याने वापरलेल्या या 'पावडर' या शब्दाचा नेमका अर्थ काय, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या अशा प्रकारच्या थेट धमकीमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या व्हायरल व्हिडिओवरून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका मुंबई पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आंदोलनात पुन्हा दिसल्यास "५० ग्रॅम पावडर टाकून देईन", अशा शब्दांत या पोलिसाने आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी दिली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पोलीस अधिकाऱ्याने वापरलेल्या या 'पावडर' या शब्दाचा नेमका अर्थ काय, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या अशा प्रकारच्या थेट धमकीमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या व्हायरल व्हिडिओवरून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.