समर्थ क्रीडा संकुलात जुन्नर तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात ;४० शाळांतील मुला-मुलींच्या संघांचा सहभाग 📝 तेजस वाळुंज l पुणे जिल्हा प्रतिनिधी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना तसेच समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बांगरवाडी-बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ समर्थ क्रीडा संकुल, बेल्हे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील सुमारे ४० शाळांमधील १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तसेच सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत क्रीडाक्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके आणि संपत स्पोर्टचे संपत शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करावी, असे आवाहन केले. स्पर्धेतील विविध वयोगटांतील विजेते संघ पुढीलप्रमाणे : १४ वर्षे मुले : प्रथम क्रमांक – विद्या विकास मंदिर, राजुरी. द्वितीय क्रमांक – ब्लूमिंगडेल इंग्लिश मीडियम स्कूल, १४ नंबर. तृतीय क्रमांक – समर्थ गुरुकुल बेल्हे. १७ वर्षे मुले : प्रथम क्रमांक – ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल १४ नंबर. द्वितीय क्रमांक – ज्ञानमंदिर हायस्कूल, आळे. तृतीय क्रमांक – विद्या विकास मंदिर,राजुरी. १९ वर्षे मुले : प्रथम क्रमांक – गुरुवर्य रा. प. सबनीस ज्युनिअर कॉलेज नारायणगाव. द्वितीय क्रमांक – समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे. तृतीय क्रमांक – ज्ञानमंदिर ज्युनिअर कॉलेज,आळे. १७ वर्षे मुली : प्रथम क्रमांक – ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल, १४ नंबर. द्वितीय क्रमांक – रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा. तृतीय क्रमांक – जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल, आळेफाटा. १९ वर्षे मुली : प्रथम क्रमांक – रामकृष्ण मोरे हायस्कूल, निवृत्तीनगर. द्वितीय क्रमांक – कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल, येडगाव. तृतीय क्रमांक – समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे. विजेत्या संघांना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी आणि आश्विनी जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच सहभागी सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडूंनी दिलेल्या सहकार्यामुळे स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांच्या वतीने सर्व आयोजक, क्रीडा शिक्षक, सहभागी शाळा व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले तसेच सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा देण्यात आल्या.

- मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews1
- वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड, आयुक्त साहेब यांस, 16 Sept 2026 नमस्कार.. विषय . वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे. कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत. माझा पत्ता... पोतनीस, 51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ. पुणे 411041.3
- "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"1
- को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त1
- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- ६० वर्षांची साथ तुटली; मदन बाफनांच्या आठवणींना शरद पवारांचा उजाळा... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. गेली ६० वर्षे बाफना आपल्यासोबत होते, त्यांच्यासोबतची साथ शेवटपर्यंत लाभली, अशी आठवण पवारांनी सांगितली. सरपंच ते मंत्री असा त्यांचा कर्तृत्ववान प्रवास होता. आता त्यांचे पुत्र गणेश बाफना वडिलांचा वारसा पुढे नेतील आणि त्यांच्या पाठीशी आपण कायम राहू, असंही शरद पवार म्हणाले... : शरद पवार - राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अध्यक्ष्य #मदनबाफना #शरदपवार #मदनबाफनानिधन #पुणे #पिंपरीचिंचवड #मावळ #राष्ट्रवादीकाँग्रेस #SharadPawar #MadanBafna #MaharashtraPolitics #Thenayaknews #TheNayakNews1