उन्नत नाशिक अभियानांतर्गत ब्रह्मगिरीला हरित कवच; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसर अधिकाधिक हरित करण्याच्या उद्देशाने ‘हरित ब्रह्मगिरी’ आणि ‘उन्नत नाशिक’ अभियानाला वेग आला आहे. या अभियानांतर्गत पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मेटघर ग्रामपंचायत हद्दीतील ब्रह्मगिरी येथील गंगा-गोदावरी द्वार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ‘मिशन ग्रीन मॉन्सून’ मोहिमेच्या नवव्या टप्प्यात हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी देशी वृक्षांच्या विविध प्रजातींची लागवड करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ५० हजार २७५ वृक्षांची लागवड करण्यात आली असून, आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन सुरू ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, अभिनेता चिन्मय उदगीरकर, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, राजेश पंडित यांच्यासह वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी, मेटघर ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह परिसर हिरवाईने नटलेला दिसावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. वृक्षारोपणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे संवर्धन करण्यासाठीही नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ब्रह्मगिरी परिसराच्या पर्यावरणीय महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर या वृक्षारोपणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वृक्षारोपणासोबतच यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. सामाजिक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून ‘हरित ब्रह्मगिरी’ व ‘उन्नत नाशिक’ अभियान अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
उन्नत नाशिक अभियानांतर्गत ब्रह्मगिरीला हरित कवच; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसर अधिकाधिक हरित करण्याच्या उद्देशाने ‘हरित ब्रह्मगिरी’ आणि ‘उन्नत नाशिक’ अभियानाला वेग आला आहे. या अभियानांतर्गत पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मेटघर ग्रामपंचायत हद्दीतील ब्रह्मगिरी येथील गंगा-गोदावरी द्वार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ‘मिशन ग्रीन मॉन्सून’ मोहिमेच्या नवव्या
टप्प्यात हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी देशी वृक्षांच्या विविध प्रजातींची लागवड करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ५० हजार २७५ वृक्षांची लागवड करण्यात आली असून, आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन सुरू ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, अभिनेता चिन्मय उदगीरकर, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक
सिद्धेश सावर्डेकर, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, राजेश पंडित यांच्यासह वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी, मेटघर ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह परिसर हिरवाईने नटलेला दिसावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. वृक्षारोपणाला नागरिकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळत असून, केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे संवर्धन करण्यासाठीही नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ब्रह्मगिरी परिसराच्या पर्यावरणीय महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर या वृक्षारोपणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वृक्षारोपणासोबतच यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. सामाजिक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून ‘हरित ब्रह्मगिरी’ व ‘उन्नत नाशिक’ अभियान अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
- सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे1
- दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .1
- आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --1
- नारीशक्तीने तीन तास रोखला शहापूर-मुरबाड- खोपोली महामार्ग प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर शहापूर-मुरबाड-पाटगाव - खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी नडगाव परिसरातील संतप्त महिलांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) आक्रमक आंदोलन केले. मंगळागौरीच्या सणाच्या दिवशीच महिलांनी खड्डेमय महामार्गावर ठिय्या देत तब्बल तीन तास महामार्ग रोखून धरला. यावेळी महिलांनी पारंपरिक मंगळागौर खेळत एमएसआरडीसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.विशेष म्हणजे माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला.यावेळी संतप्त महिलांनी आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार- खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. एमएसआरडीसी अंतर्गत सन २०१८ पासून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरील जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्त्याचे काम, धुळीचे साम्राज्य,चिखल आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने, आंदोलने आणि प्रशासनाकडे मागण्या करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या महामार्गावरून शहापूर तालुक्यातील हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण दररोज प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप महिलांनी केला.शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण होत असून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेतांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. दरम्यान घरातून बाहेर पडलेला आपला माणूस सुखरूप घरी परत येईल की नाही अशी चिंता आता प्रत्येक कुटुंबाला वाटत आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून खड्डे बुजवावेत आणि वाहतुकीची समस्या दूर करावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.यापूर्वीही महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने मंगळागौरीच्या दिवशीच आंदोलन करण्यात आले.दरम्यान प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणुन नायब तहसिलदार सदानंद घुटे व पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी आंदोलक महिलांना लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.परिणामी दिलेल्या निर्धारित वेळेत काम सुरु न केल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल अशी माहिती चंद्रकला दुर्गे यांनी दिली.महिलांच्या या आंदोलनाला नडगाव,भटपाडा, साखरपाडा, शिरगाव, लेनाड, दोनघर, नेहरोली,शेंद्रूण आदी गावांमधील महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी विद्याताई वेखंडे, डॉ.अपर्णा खाडे,पुष्पा पानसरे,चंद्रकला दुर्गे,कमल रेरा,आशा मांजे, अनिता हरड,दर्शना भालके, सुनिता पवार,अनिता हरड, विजया बेलवले,हर्षला जागरे, सविता विशे,रेखा जागरे,जुही पवार,दिपिका भालके, वंदना हरड,भारती कदम,राधिका हरड,सारिका फर्डे यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या. माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. यावेळी संतप्त महिलांनी “आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार-खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.1
- टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.1
- राखी ने बदल दिया एक पल,मासूम बच्ची ने अनजान शख्स में भी देख लिया भाई सड़क पर आने-जाने वालों की भीड़ थी… हर कोई अपनी मंजिल की तरफ बढ़ रहा था। तभी एक छोटी-सी बच्ची ने रास्ते में चलते एक अनजान शख्स को देखा और अचानक उसके पास पहुंच गई। 🥹 बताया जा रहा है कि वह व्यक्ति मानसिक रूप से अस्वस्थ था, लेकिन बच्ची ने उसकी हालत देखकर डरने के बजाय उसके हाथ पर राखी बांध दी। उस मासूम के लिए सामने वाला न अजनबी था, न पराया—उसे बस एक भाई नजर आया। ❤️ बच्ची के इस छोटे से कदम ने वहां मौजूद लोगों के दिलों को छू लिया। जहां बड़े-बड़े लोग इंसान को उसकी हालत, कपड़ों और पहचान से आंक लेते हैं, वहीं इस नन्ही बच्ची ने बिना किसी भेदभाव के इंसानियत को गले लगा लिया। उस मासूम के हाथ में शायद एक छोटी-सी राखी थी, लेकिन उसने पूरे समाज को इंसानियत का बहुत बड़ा सबक दे दिया। 🙏 वीडियो के अंतिम पलों में जो दृश्य सामने आता है, वह आंखों को नम कर देने वाला है। इसे देखकर शायद आपके दिल से भी यही निकलेगा— “बेटी, तुम्हें सलाम… तुमने आज इंसानियत को राखी बांधी है।” 🙏❤️ कभी-कभी बड़े-बड़े भाषण नहीं, एक मासूम बच्ची का छोटा-सा प्यार दुनिया को बता देता है कि इंसानियत अभी जिंदा है। 🥹💔 बच्ची को दिल से सल्यूट। 🙋♀️❤️ वीडियो का अंतिम दृश्य बिल्कुल मिस मत कीजिएगा… आंखें नम होना तय है।1
- RTO च्या दंडात्मक कारवाई विरोधात उ बा ठा शिवसेनेचा एल्गार; स्कूल व्हॅन चालकांचा rto कार्यालयावर धडक मोर्चा आरटीओ प्रशासनाकडून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईचा निषेध आणि प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेने मंगळवारी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वाहतूकदार आणि खासगी स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरटीओ प्रशासनाकडून स्कूल व्हॅन चालकांवर होत असलेल्या कथित आर्थिक दंडात्मक कारवाईला तीव्र विरोध केला. फिटनेस नियमांचे पालन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही चालकांनी दिला आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शालेय वाहनांसाठी ‘७+१’ सीटिंग क्षमता मंजूर करावी आणि वाहनांमध्ये लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. लेडी कंडक्टरच्या पगाराचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत असून, त्यातून पालक आणि चालकांमध्ये विनाकारण वाद निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला. तसेच आरटीओकडून स्कूल व्हॅन चालकांवर सुरू असलेली कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली. शहरातील अनेक शाळा एकाच वेळेत सुटत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शाळांच्या सुटण्याच्या वेळेत किमान १५ मिनिटांचे अंतर ठेवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या परिवहन समित्यांमध्ये खासगी वाहन चालकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. चालकांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि वाहतूक व्यवस्थेतील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मोठ्या संख्येने चालक आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्याने प्रशासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले गेले. आता आरटीओ प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे स्कूल व्हॅन चालकांसह पालकांचे लक्ष लागले आहे.4
- खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे. महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही. महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.4