तालुक्यातील किवत येथे नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात ऐन उन्हाळ्यात गढूळ पाणी पुरवठा भोर दि.६ किवत (ता.भोर )येथे मागील काही दिवसांपासून नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबत नागरिकांनी तक्रार केली असून शुध्द पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.किवत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी भोलावडे येथील पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो.मात्र मागील काही दिवसांपासून नळाला पिण्यासाठी गाळ मिश्रित गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नळांद्वारे माती आणि गाळ मिश्रित पाणी येत असल्याने पिण्यासाठी तसेच दैनंदिन वापरण्यासाठी पाणी योग्य नसल्याचे नागरीक सांगत आहेत.घरगुती उपाय योजना करून देखील पाणी स्वच्छ करता येत नसल्याने नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.याबाबत सरपंच तानाजी चंदनशिव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ,भोलावडे येथील एका वीट भट्टी व्यावसायिकाच्या हद्दीतून पाईपलाईन येते दरम्यान व्यवसायानिमित्याने खोदकाम करताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाण्यामध्ये माती गेल्याने गाळ मिश्रित पाणी येत आहे .मात्र पाईपलाईनची दुरुस्ती केल्याने लवकरच शुध्द पाणी पुरवठा होईल.

- पिंपरी चिंचवड : - शहरातील वेताळ नगर परिसरात काही तरुणांनी टोकाचे खोडसाळ कृत्य करत एका बांधकाम साईटवर साहित्याची मोठी तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, वेताळ नगरमधील एका नियोजित इमारतीच्या बांधकाम साईटवर ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास काही तरुणांच्या टोळक्याने परिसरात प्रवेश केला. कोणत्याही कारणाशिवाय या तरुणांनी तिथे असलेले बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री आणि इतर साधनांची तोडफोड केली. यामध्ये विकासकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिंचवड परिसरात तरुणांच्या टोळक्यांकडून अशा प्रकारचे उपद्रव वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. भरवस्तीत अशा प्रकारे तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या या तरुणांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.या प्रकारामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्येही अस्वस्थता असून, संबंधित समाजकंटकांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत... #चिंचवड #वेताळनगर #पिंपरीचिंचवड #गुंडागर्दी #तोडफोड #बांधकामसाईट #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #स्थानिकबातम्या #सुरक्षा #सीसीटीव्ही #नागरिकसंताप #महाराष्ट्रन्यूज #Chinchwad #VetalNagar #PimpriChinchwad #Vandalism #Hooliganism #ConstructionSite #CrimeNews #PoliceAction #LocalNews #PublicSafety #CCTV #ResidentsAngry #MaharashtraNews1
- पुणे: न-हे गावातील ‘स्वर्ग’ लॉजवर पोलिसांचा छापा; ४ महिलांची सुटका, ३ आरोपी अटकेत. लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे उघड.1
- पुणे : सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांनी अनुभविले. लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल ५१ लाख फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य दिल्याचा भास यावेळी होत होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे देखील परिधान करण्यात आली होती. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये मोगरा, गुलाब, लिली, झेंडू, शेवंती, गुलछडी, चाफा, गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. फोटो ओळ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी केलेली ५१ लाख फुलांची आकर्षक सजावट.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- 1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा नामांकन अर्ज भरणे पूर्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी स्व. अजित पवार यांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेतले1
- चाकण पुणे : - पुण्याच्या चाकणमध्ये बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.... कार विक्रीनंतर दिलेल्या पैशांच्या बंडलमध्ये वर-खाली खऱ्या आणि मधोमध बनावट नोटा ठेवून फसवणूक करण्यात आली. प्रकार लक्षात येताच चाकण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. या कारवाईत ४२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून गणेश ठाकरे आणि समीर महल्ले यांच्यासह कार व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे... #चाकण #पुणे #बनावटनोटा #फसवणूक #कारविक्री #गुन्हेगारी #पोलिसकारवाई #रॅकेटउघड #अटक #ब्रेकिंगन्यूज #Chakan #Pune #FakeCurrency #Fraud #CarSaleScam #CrimeNews #PoliceAction #RacketBusted #Arrested #BreakingNews1
- प्रशासकीय भवन परिसरात लावण्यात आलेल्या फलकांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या फलकांवर “अजितदादांचे नावच पुरेसे आहे,” घातकी तटकरे-पटेलची गरज नाही समस्त दादा प्रेमी..! असा उल्लेख करण्यात आला असून तटकरे-पटेल यांचा अप्रत्यक्ष निषेध करण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच हे फलक झळकल्याने या घडामोडींना अधिकच राजकीय रंग चढला आहे. दादा समर्थकांनी या माध्यमातून बारामतीत या तटकरे-पटेलची गरज नसल्याचा स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- इचलकरंजीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत चौतीस आरोपींना पकडण्यात आले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा संपूर्ण बातमी.1