उदगीर रोटरी क्लब चा शानदार पदग्रहण सोहळा प्रांतपाल जयेश पटेल यांच्या उपस्थितीत साजरा सामाजिक गरजा ओळखून रोटरीचे कार्य : प्रांतपाल जयेश पटेल उदगीर (प्रतिनिधी) समाजाच्या अनेक गरजा असतात, त्या गरजा ओळखुन त्याची पूर्तता करण्याचे कार्य जागतिक पातळीवर रोटरी क्लबकडून केले जाते असे प्रतिपादन रोटरी क्लब 3132 चे प्रांतपाल जयेश पटेल यांनी केले. रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी दि. 31 जुलै रोजी मोरया मंगल कार्यालयात पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी जयेश पटेल बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा उदगीरचे सुपुत्र अमोल पाटील कौळखेडकर यांचा रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने उदगीर भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे 2026-27 चे अध्यक्ष म्हणून ऍड. विक्रम संकाये, उपाध्यक्ष म्हणून विजयकुमार पारसेवार, व सचिव म्हणून डॉ. सुधीर जाधव यांच्यासह रोटरी क्लबच्या सर्व संचालक मंडळाने आपला पदभार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर रो. पारुल पटेल, सहायक प्रांतपाल नागनाथ आगावणे, नगराध्यक्षा स्वाती हुडे, रोट्रॅक्ट क्लबचे प्रांत प्रमुख अमित भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे मावळते अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन संतोष फुलारी व गजानन चिद्रेवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जयेश पटेल म्हणाले की, समाजात बेरोजगारी, आरोग्य, गरिबी व अज्ञान अशा अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. अशा समस्याची सोडवणूक करण्याच्या कामात रोटरी क्लबने सातत्याने हातभार लावला आहे. आगामी वर्षभराच्या काळात रोटरी क्लबने घालून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम करावे असे आवाहन केले. सत्काराला उत्तर देताना अमोल पाटील कौळखेडकर यांनी रोटरी क्लबने उदगीर भूषण पुरस्काराने गौरव करून पुढील कामासाठी प्रेरणा दिली आहे. आपल्याला जिथं काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचा उपयोग आपल्या भागाच्या विकासासाठी करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी आपल्या वाटचालीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. यावेळी मावळते सचिव विक्रम हलकीकर यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला. मावळते अध्यक्ष प्रशांत मांगुळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष ऍड. विक्रम संकाये यांनी पुढील वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली, यावेळी रोटरी बुलेटिनचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जैन व ज्योती स्वामी यांनी केले. आभार नूतन सचिव डॉ. सुधीर जाधव यांनी मानले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल सुधीर लातुरे, संगीता लातुरे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा1
- लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.4
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले. महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.2