सांगली फाटा परिसरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी पुलाची शिरोली/ प्रतिनिधी पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा परिसरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथील हॉटेल पार्वतीसमोर हा अपघात घडला. मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने मागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात अमित चोगुले (वय ४६) आणि प्रथनेश सोने (वय २१) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघे पुण्याहून कोल्हापूरकडे मोटारसायकलवरून जात होते. दरम्यान शिरोली पुलाची परिसरातील हॉटेल पार्वतीसमोर त्यांच्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना १०३३ रुग्णवाहिकेच्या मदतीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अपघातानंतर मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा चक्काचूर झाल्याने अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत दरम्यान, या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत शिरोली पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून अपघात नेमका कसा घडला याचा तपास केला जात आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संबंधित वाहनाचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.1
- आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेतला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी आशीर्वाद दिला आणि मी कायम राहुल तुझ्यासोबत आहे हे शब्द साहेबांचे ऊर्जा देतात एवढ्या व्यस्त वेळेतून राहुलला भेटायचे हे साहेबांच्या लक्षात राहतं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या पोलिसांची मदत करेल आणि प्रामाणिक काम करेल तुमची साथ आणि आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर राहू द्या ही विनंती महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व त्या परिवाराला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य1
- बारामती विधानसभा पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आ. रोहित पवार यांनी घोंगडी बैठका घेतल्या1
- सातारा वाई. वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागचा ढिसाळ कारभार समोर येत आहे मात्र पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे कडून जाणीव पूर्वक डोळे केली जात फआहे.पाणी शुद्धीकरणासाठी वाई नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करत आहे आणि तेच हजारों लिटर पाणी रोज अशा पद्धतीने गटारित सोडले जात आहे एकी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या बैठका चालू आणि एकीकडे वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार याची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रम शिंदे /भोर दि.16 नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील भोर येथील रांजे येथे दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.2
- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.1