logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साकोली तालुक्यातील गडकुंभली येथे पाण्याची भीषण टंचाई महिलांना पाण्यासाठी दूरवर करावी लागत आहे भटकंती साकोली तालुक्यातील गडकुंभली येथे केल्या महिनाभरापासून भीषण पाण्याची टंचाई आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भर उन्हात महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकावे लागत आहे.येथील कुटुंबांची परिस्थिती आर्थिक बेताची असल्याने महिलांना देखील मजुरीवर जावे लागते परंतु दिवसभर पाण्यासाठी फिरावे लागत असल्याने महिलांना मजुरीवर जाणे देखील शक्य होत नाही ग्रामपंचायतला अनेक वेळा तक्रार Branch पाण्याची समस्या सोडवली जात नाही आहे गावातील सौर उर्जेचे नळ योजना तसेच बोरवेल पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत त्यामुळे गावातील महिलांनी साकोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन त्वरित पाणीटंचाईची समस्या सोडवावी अन्यथा पंचायत समितीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा देखील निवेदनातून दिला आहे

20 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
20 hrs ago
a63b92f9-381a-4495-90ec-73fe725c68e9

साकोली तालुक्यातील गडकुंभली येथे पाण्याची भीषण टंचाई महिलांना पाण्यासाठी दूरवर करावी लागत आहे भटकंती साकोली तालुक्यातील गडकुंभली येथे केल्या महिनाभरापासून भीषण पाण्याची टंचाई आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भर उन्हात महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकावे लागत आहे.येथील कुटुंबांची परिस्थिती आर्थिक बेताची असल्याने महिलांना देखील मजुरीवर जावे लागते परंतु दिवसभर पाण्यासाठी फिरावे लागत असल्याने महिलांना मजुरीवर जाणे देखील शक्य होत नाही ग्रामपंचायतला अनेक वेळा तक्रार Branch पाण्याची समस्या सोडवली जात नाही आहे गावातील सौर उर्जेचे नळ योजना तसेच बोरवेल पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत त्यामुळे गावातील महिलांनी साकोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन त्वरित पाणीटंचाईची समस्या सोडवावी अन्यथा पंचायत समितीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा देखील निवेदनातून दिला आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • यंदा तेंदुपाने आणि मोहफुल संकलनाचे काम मृत्यूच्या सावटात सडक अर्जुनी एप्रिल महिन्यात मोहफुले आणि तेंदुपाने संकलनाचा हंगाम परिसरातील आदिवासी व जंगलालगतच्या गावकऱ्यांसाठी रोजगाराचे मुख्य साधन बनला आहे, परंतु यंदा हा हंगाम मृत्यूच्या सावटाखाली सुरू झाला आहे. तालुक्यात मागील महिन्याभरात वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी गेल्याने मोहफुले आणि तेंदुपाने वेचण्यासाठी जंगलात जाणारे मजूर प्रचंड भीतीच्या वातावरणात आहेत. नवेगाव नागझिरा माहुली परिसरात वन्य प्राण्यांची भीती : वन्यप्राण्यांमुळे मजूर धास्तावले व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोसमतोंडी, मालिजुंगा, मुरपार, पुतळी, माहुली, दोडके, जांभळी, खोबा, सिंधीपार, चिरचाडी, मनेरी, बकी, मेंडकी आदी परिसरांतील जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल व रानडुकराचा वावर वाढला आहे. ३० जानेवारी रोजी माहुली गावातील लक्ष्मी सयाम (६०) या वृद्धेचा शेतशिवारात वाघाने जीव घेतल्याने परिसरात दहशत अधिकच वाढली आहे. मोहफुले वेचण्यासाठी गोरगरीब नागरिकांना पहाटे ३ ते ६ वाजण्याच्या सुमारास जंगलात जावे लागते. हिच वेळ हिंस्त्र प्राण्यांची भक्ष्य शोधण्याची वेळ असल्याने अधिक धोका वाढला आहे. जंगलातील नैसर्गिक स्रोत, पाणवठे आटल्याने वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढला आहे. जंगला लगतच्या गावातील महिला-पुरुषांना पोटासाठी जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागते. जंगलात जाताना मजुरांनी समूहाने जाणे, ढोल थाळी वाजवणे असे उपाय सुरू केले आहेत. मात्र, तरीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम आहे. यंदा वन्य प्राण्यांच्या भीतीने नागरिक जंगलात जात नसल्याने तेंदुपाने आणि मोहफुलाचे संकलन ४० टक्के घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा तेंदुपत्ता हंगाम मजूर व ठेकेदारांसाठी तोट्याचा राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोहफुले आणि तेंदुपाने हे अनेक कुटुंबाचे जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांच्या मागण्या तेंदुपाने संकलनाच्या काळात प्रत्येक बीटमध्ये वनरक्षकाची गस्त पहाटेच्या वेळी करावी, वन्यजीव विभागाच्या माध्यमातून मजुरांचा सामूहिक विमा उतरवावा आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांची मदत तत्काळ जाहीर करावी, जंगलात ठिकठिकाणी मनोरे उभारून निरीक्षण व्यवस्था करावी. मोहफुले व तेंदुपाने संकलन करून करून दिवसाला २०० ते ३०० रुपये मिळतात, पण जीव गेला तर कुटुंबाचे काय, अशी भीती मनात आजही कायम आहे. नंदराज पंधरे, कोसमघाट वर्षभराचे आर्थिक नियोजनाचे आधार आहेत. मात्र, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे यंदाचा हंगाम जीव वाचला, तर कमाई, अशा अवस्थेत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून वन्य प्राणी आणि मानव संघर्ष कसा कमी होईल, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.
    1
    यंदा तेंदुपाने आणि मोहफुल संकलनाचे काम मृत्यूच्या सावटात
सडक अर्जुनी
एप्रिल महिन्यात मोहफुले आणि तेंदुपाने संकलनाचा हंगाम परिसरातील आदिवासी व जंगलालगतच्या गावकऱ्यांसाठी रोजगाराचे मुख्य साधन बनला आहे, परंतु यंदा हा हंगाम मृत्यूच्या सावटाखाली सुरू झाला आहे. तालुक्यात मागील महिन्याभरात वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी गेल्याने मोहफुले आणि तेंदुपाने वेचण्यासाठी जंगलात जाणारे मजूर प्रचंड भीतीच्या वातावरणात आहेत. नवेगाव नागझिरा माहुली परिसरात वन्य प्राण्यांची भीती : वन्यप्राण्यांमुळे मजूर धास्तावले
व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोसमतोंडी, मालिजुंगा, मुरपार, पुतळी, माहुली, दोडके, जांभळी, खोबा, सिंधीपार, चिरचाडी, मनेरी, बकी, मेंडकी आदी परिसरांतील जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल व रानडुकराचा वावर वाढला आहे. ३० जानेवारी रोजी माहुली गावातील लक्ष्मी सयाम (६०) या वृद्धेचा शेतशिवारात वाघाने जीव घेतल्याने परिसरात दहशत अधिकच वाढली आहे.
मोहफुले वेचण्यासाठी गोरगरीब नागरिकांना पहाटे ३ ते ६ वाजण्याच्या सुमारास जंगलात जावे लागते. हिच वेळ
हिंस्त्र प्राण्यांची भक्ष्य शोधण्याची वेळ असल्याने अधिक धोका वाढला आहे. जंगलातील नैसर्गिक स्रोत, पाणवठे आटल्याने वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढला आहे. जंगला लगतच्या गावातील महिला-पुरुषांना पोटासाठी जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागते. जंगलात जाताना मजुरांनी समूहाने जाणे, ढोल थाळी वाजवणे असे उपाय सुरू केले आहेत. मात्र, तरीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम आहे. यंदा वन्य प्राण्यांच्या भीतीने नागरिक जंगलात जात नसल्याने तेंदुपाने आणि मोहफुलाचे संकलन ४० टक्के घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा तेंदुपत्ता हंगाम मजूर व ठेकेदारांसाठी तोट्याचा राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोहफुले आणि तेंदुपाने हे अनेक कुटुंबाचे जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांच्या मागण्या
तेंदुपाने संकलनाच्या काळात प्रत्येक बीटमध्ये वनरक्षकाची गस्त पहाटेच्या वेळी करावी, वन्यजीव विभागाच्या माध्यमातून मजुरांचा सामूहिक विमा उतरवावा आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांची मदत तत्काळ जाहीर करावी, जंगलात ठिकठिकाणी मनोरे उभारून निरीक्षण व्यवस्था करावी.
मोहफुले व तेंदुपाने संकलन करून करून दिवसाला २०० ते ३०० रुपये मिळतात, पण जीव गेला तर कुटुंबाचे काय, अशी भीती मनात आजही कायम आहे. नंदराज पंधरे, कोसमघाट
वर्षभराचे आर्थिक नियोजनाचे आधार आहेत. मात्र, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे यंदाचा हंगाम जीव वाचला, तर कमाई, अशा अवस्थेत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून वन्य प्राणी आणि मानव संघर्ष कसा कमी होईल, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    Sadak-Arjuni, Gondia•
    5 hrs ago
  • पेट्रोल पंपावर जबरी चोरी प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक, महागांव पोलीस ठाणे हद्दीतील फुलसावंगी रोडवरील पेट्रोल पंपावर झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.19 एप्रिल रोजी पेट्रोल भरण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदाराला मारहाण करून 11 हजार रुपये हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून खडका हायवे ब्रिज परिसरातून विकास ऊर्फ विक्की सुभाष देवकर, अजय ऊर्फ जिवा बळीराम बोक्से,रामदास ऊर्फ रामू सिन्नना पवार सर्व रा. काळी टेंभी ता. महागांव यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास महागांव पोलीस करत आहेत.
    1
    पेट्रोल पंपावर जबरी चोरी प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक,
महागांव पोलीस ठाणे हद्दीतील फुलसावंगी रोडवरील पेट्रोल पंपावर झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.19 एप्रिल रोजी पेट्रोल भरण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदाराला मारहाण करून 11 हजार रुपये हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून खडका हायवे ब्रिज परिसरातून विकास ऊर्फ विक्की सुभाष देवकर, अजय ऊर्फ जिवा बळीराम बोक्से,रामदास ऊर्फ रामू सिन्नना पवार सर्व रा. काळी टेंभी ता. महागांव यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास महागांव पोलीस करत आहेत.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Lakhandur, Bhandara•
    8 hrs ago
  • -नेत्याने दोनदा या गावात अंधारात साजरा केला होता वाढदिवस - भिवापूर । उमरेड भिवापूर पासून ३५ किमी अंतरावर थुटानबोरी गाव आहे. यांच गट ग्रामपंचायती मध्ये तुकूमबोरी (रिठी ) हे गाव पण येते. थुटानबोरी चे पुर्नवसन झाले परंतु तुकूमबोरीचे पुर्नवसन झाले नाही. घराचा भुखंड, शेतजमीनी मोबदला, पुर्नवसन जागी भुखंड मिळाला नाही. त्यामुळे ३०० नागरीक प्राथमिक सुविधा नसलेल्या व विद्युत पुरवठा बंद असलेल्या ठिकाणी अंधारांच्या साम्राज्यात जिवन जगत असून माजी सरपंच डुबराज गुरपुडे यांच्या नेतृत्वात शासनाशी विविध प्रश्नावर लढा देत आहे आहे. मात्र शासना प्रमाणे राजकीय नेत्यांनी त्याचा वापर व्होट बॅक म्हणून वापर केला परंतु त्यांच्या समस्या जैसे थे आहे. उमरेड विधान सभा क्षेत्रातील एका नेत्याने दोन वर्षे आपला वाढदिवस येथील नागरीक सोबत अंधारात साजरा करून गावातील प्रकल्पग्रस्ता च्या समस्या व योग्य न्याय देण्याच्या आश्वासनाचे गाजर त्यांना त्यावेळी दिले होते. परंतू हा नेता २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर जुने गावठाण थुटानबोरी गावाचा विसर पडल्याचा आरोप माजी सरपंच डुबराज गुरपुडे, गणेश घोशीकर, गिता रावसाहेब घोशीकर, नामदेव जागोजी फटे, विजय सहादेव शेंडे यांनी प्रतिनिधी बोलतांना हा आरोप केला असल्याने हा नेता कोई मिल गया या हिंदी चित्रपटातील जादु सारखा गायब झाल्याची चर्चा गावात रंगत आहे. त्यामुळे या नेत्याच्या कार्यपद्धतीवर या नागरीकांचा कमालीचा रोष असून त्यांनी दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा च्या निवडणूकीत गाकऱ्यांनी एकत्र येत निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. तुकूमबोरी (रिठी ) गाव पुन्हा चर्चेत तालुक्यातील जुने थुटानबोरी गावठाणातील प्रकल्पग्रस्ताच्या समस्या करीता प्रहार जनशक्ती पक्षाचे सदस्य इजाज अली सय्यद यांनी तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय निर्जला रोजा आमरण उपोषण सुरू करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधल्याने जुने थुटानबोरी हे गाव चर्चेत आले आहे. सदरचे उपोषणाची माहिती मिळताच कामात सुस्त असलेला हा गोसेखुर्द पुर्नवसन विभाग खळबळून जागा झाला. उपविभागीय अभियंता प्रमोद वैरागडे, रेशमा निकम यांच्या नेतृत्वात उपोषण कर्त्याशी गावातील विविध समस्यावर चर्चा केली. व जुने गावठाण थुटानबोरी येथे जावून माजी सरपंच डुबराज गुरपुडे व इतराशी चर्चा केली. गावातील समस्या शासकीय स्तरावर मांडण्याचे आश्वासन वरीष्ट अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर उपोषणकर्ते इजाज अली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले आहे. शासन व प्रशासन सुस्त ! जुन्या थुटानबोरी गावालगत गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी गावालगत आल्याने काही मंडळी या तलावात मासेमारी करीत असतात. मागील सात वर्षापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या अरविंद लेकुरवाडे हा युवक या तलावात बेपत्ता झाला होता. मात्र बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेतला शोध लागला नाही. मात्र या युवकाचे मृत्युचे प्रमाणपत्र व शासकीय मोबादला अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. अशाच ५ एप्रिल म मासेमारी करीता गेलेल्या अमृत लेकुरवाडे हा पाण्यात तोल गेल्याने मृत्यु झाल्याच्या दोन घटना होवूनही पिडित परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणतीही मदत प्राप्त न झाल्याने शासन व प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
    1
    -नेत्याने दोनदा या गावात अंधारात साजरा केला होता वाढदिवस -
भिवापूर । उमरेड
भिवापूर पासून ३५ किमी अंतरावर  थुटानबोरी गाव आहे. यांच गट ग्रामपंचायती मध्ये तुकूमबोरी (रिठी ) हे गाव पण येते. थुटानबोरी चे पुर्नवसन झाले परंतु तुकूमबोरीचे पुर्नवसन झाले नाही. घराचा भुखंड, शेतजमीनी मोबदला, पुर्नवसन जागी भुखंड मिळाला नाही. त्यामुळे ३०० नागरीक प्राथमिक सुविधा नसलेल्या व विद्युत पुरवठा बंद असलेल्या ठिकाणी अंधारांच्या साम्राज्यात जिवन जगत असून माजी सरपंच डुबराज गुरपुडे यांच्या नेतृत्वात शासनाशी विविध प्रश्नावर लढा देत आहे आहे. मात्र शासना प्रमाणे राजकीय नेत्यांनी त्याचा वापर व्होट बॅक म्हणून वापर केला परंतु त्यांच्या समस्या जैसे थे आहे. उमरेड विधान सभा क्षेत्रातील एका नेत्याने दोन वर्षे  आपला वाढदिवस येथील नागरीक सोबत  अंधारात साजरा करून गावातील प्रकल्पग्रस्ता च्या समस्या व योग्य न्याय देण्याच्या आश्वासनाचे गाजर त्यांना त्यावेळी दिले होते. परंतू हा नेता २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर जुने गावठाण थुटानबोरी गावाचा विसर पडल्याचा आरोप माजी सरपंच डुबराज गुरपुडे, गणेश घोशीकर, गिता रावसाहेब घोशीकर, नामदेव जागोजी फटे, विजय सहादेव शेंडे यांनी प्रतिनिधी बोलतांना हा आरोप केला असल्याने हा नेता कोई मिल गया या हिंदी चित्रपटातील जादु सारखा  गायब झाल्याची चर्चा गावात रंगत आहे. त्यामुळे या नेत्याच्या कार्यपद्धतीवर या नागरीकांचा कमालीचा रोष असून त्यांनी दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा च्या निवडणूकीत गाकऱ्यांनी एकत्र येत निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता.                                  
तुकूमबोरी (रिठी ) गाव पुन्हा चर्चेत
तालुक्यातील जुने थुटानबोरी गावठाणातील प्रकल्पग्रस्ताच्या समस्या करीता प्रहार जनशक्ती पक्षाचे सदस्य इजाज अली सय्यद यांनी तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय निर्जला रोजा आमरण उपोषण सुरू करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधल्याने जुने थुटानबोरी हे गाव चर्चेत आले आहे.
सदरचे उपोषणाची माहिती मिळताच  कामात सुस्त असलेला हा गोसेखुर्द पुर्नवसन विभाग खळबळून जागा झाला. उपविभागीय अभियंता प्रमोद वैरागडे, रेशमा निकम यांच्या नेतृत्वात उपोषण कर्त्याशी गावातील विविध समस्यावर चर्चा केली. व जुने गावठाण थुटानबोरी येथे जावून माजी सरपंच डुबराज गुरपुडे व इतराशी चर्चा केली. गावातील समस्या शासकीय स्तरावर मांडण्याचे आश्वासन वरीष्ट अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर उपोषणकर्ते इजाज अली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले आहे.
शासन व प्रशासन सुस्त !
जुन्या थुटानबोरी गावालगत गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी गावालगत आल्याने काही मंडळी या तलावात मासेमारी करीत असतात. मागील सात वर्षापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या अरविंद लेकुरवाडे हा युवक या तलावात बेपत्ता झाला होता. मात्र बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेतला शोध लागला नाही. मात्र या युवकाचे मृत्युचे प्रमाणपत्र व शासकीय मोबादला अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. अशाच ५ एप्रिल म मासेमारी करीता गेलेल्या अमृत लेकुरवाडे हा पाण्यात तोल गेल्याने  मृत्यु झाल्याच्या दोन घटना होवूनही पिडित परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणतीही मदत प्राप्त न झाल्याने शासन व प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    3 hrs ago
  • हळदीच्या वाटेवर मृत्यूची धडक! आनंदाचा कार्यक्रम बनला मातम! नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना तीन तरुणींच्या स्कुटीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 23 वर्षीय रश्मी बागडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर कन्हान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
    1
    हळदीच्या वाटेवर मृत्यूची धडक! आनंदाचा कार्यक्रम बनला मातम!
नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना तीन तरुणींच्या स्कुटीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 23 वर्षीय रश्मी बागडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर कन्हान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.