मंत्रालयातील धाडप्रकरणावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. १२ तारखेला झालेल्या धाडीमध्ये संबंधित क्लार्क रंगेहात पकडला गेल्याचं सर्वांनाच माहीत असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी पोलीस उपयुक्तांच्या मार्फत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.मला या प्रकाराची कोणतीही कल्पना नव्हती.कार्यालय जवळ असूनही तिथे कधी पाहणी करण्याची वेळ आली नाही.मात्र सत्य हे सत्य असतं आणि कुणीही दोषी असेल तर त्याला कारवाईला सामोरं जावंच लागेल असं झिरवळ यांनी ठामपणे नमूद केलं.राजू नावाच्या व्यक्तीची चौकशी सुरू असून जी कारवाई आहे ती त्या ठिकाणीच केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुनावणीनंतर स्टे देणं आणि कागदपत्रांची पूर्तता ही रुटीन प्रक्रिया असल्याचं सांगत कोणताही दबाव किंवा गैरप्रकार सहन केला जाणार नाही असा इशारा दिला.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीबाबत बोलताना झिरवळ म्हणाले नाराजीचा प्रश्न नाही मलाही असा प्रकार खपवून घेण्यासारखा नाही. सखोल चौकशी करा, काही चुकीचं आढळल्यास कठोर कारवाई करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की अधिकार काढणं किंवा देणं हा त्यांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या मनात माझ्या कामाबद्दल कोणताही किंतु नाही. मात्र अद्याप थेट संवाद झालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. टीकेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.टीका करा पण माणूस मारणारी भाषा नको. जाताना काहीतरी चांगलं लिहिलं पाहिजे असं सूचक विधान त्यांनी केलं. डाग लागतो तेव्हा आत्मा दुखतो. मंत्रालयात असे प्रकार होत असतील तर डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. कोणाचाही संबंध आढळल्यास त्यालाही भोगावं लागेल असा कडक संदेश देत झिरवळ यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. राज्यसभा,विलिनीकरण,पार्थ पवार, अल्पसंख्यांक शाळा या मुद्द्यांवर अद्याप चर्चा नसल्याचं सांगत वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रालयातील भ्रष्टाचार, चौकशीचे आदेश आणि राजकीय प्रतिक्रियांनी राज्याचं राजकारण तापलं असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- ४० दिवसांनंतर हॉटेलमध्ये नॉनव्हेजला निरोप👍❤️Please Subscribe My Channel SM News 26271
- दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला- मुक्त ठेवण्यासाठी,मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून संयुक्त पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणाखाली हे पथक कार्यरत असून परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.या संयुक्त पथकाकडून दररोज किमान ३ वेळा दादर परिसरात मार्चिंग व गस्त घालण्यात येते.फेरीवाले पुन्हा रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करणार नाहीत यासाठी सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. गस्तीसाठी आवश्यक वाहने,मनुष्यबळ,कामगारवर्ग उपलब्ध करून देण्यात आला असून कारवाई अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत राहावी,पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवावेत या उद्देशाने ही संयुक्त मोहीम सुरू असून पुढील काळातही ती सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.1
- Post by Shailesh Karande1
- मुंबई क्लाइमेट वीक और ग्लोबल इकोनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फ्रेंस के संबंध में मीडिया से संवाद...1
- महाराष्ट्र के बीड में भीषण हादसा : सोलापुर-घुले नेशनल हाईवे पर पेट्रोल टैंकर पलटा, ज़ोरदार विस्फोट के बाद 100 - 150 मीटर तक फैली आग #viral #beed #dhule #maharashtra1
- जी हां दोस्तो हम लोग इनसे मिल चुके है टैलेंटेड लडका है सपोर्ट करे आप सब मस्त लडका है #viralmithun▶️▶️▶️1
- ठाण्यातील श्री आमदार संजय केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांना *अतिशय आनंदाची बातमी* गेली १५ ते १७ वर्षे प्रलंबित असलेले अनेक महत्त्वाचे विषय महापालिकेच्या दप्तरी लाल फितीत गुंडाळून ठेवण्यात आले होते. परंतु *कामगार मित्र, कर्मचारी हृदयसम्राट जनसेवक आमदार संजय केळकर साहेब* यांच्या पुढाकारामुळे आज ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागत आहेत, ही कामगार वर्गासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव साहेब, साहेबांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अत्यंत सकारात्मक घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली. याबद्दल कामगार वर्गाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर बैठकीस सन्माननीय उपमहापौर श्री. कृष्णा पाटील साहेब, गटनेते श्री. मुकेश मोकाशी साहेब, नगरसेवक विकास पाटील साहेब, नगरसेवक सिताराम राणे साहेब, नगरसेवक श्री. अमितजी सराय्या साहेब, नगरसेविका अनिता ठाकूर मॅडम, नगरसेविका उषाताई वाघ, श्री. सचिन पाटील साहेब, श्री. सुरेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. अधिकारी वर्गातून अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब, मुख्यालय उपआयुक्त गोदापुरे साहेब, उपआयुक्त (आरोग्य) उमेश बिरारी साहेब, उपायुक्त (घनकचरा) बोडके साहेब, उपायुक्त (शिक्षण) संचिती मॅडम, पाणी खाते विभाग प्रमुख पवार साहेब तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. *बैठकीत खालील विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ते लवकरच मार्गी लावण्याबाबत प्रशासनाने आश्वासन दिले —* १) शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू अथवा अपघात झाल्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे (मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत तसेच शासन निर्णयानुसार व नवी मुंबई व अकोला महानगरपालिका प्रमाणे) २) सर्व कंत्राटी कामगारांना कामगार कायद्यानुसार विमा संरक्षण लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे (पुणे महानगरपालिका प्रमाणे) ३) फायलेरिया विभागातील कामगारांना वारस हक्क लागू करणे (शासन निर्णयानुसार व पुणे महानगरपालिका प्रमाणे) ४) कंत्राटी तत्वावर कार्यरत परिचारिका व डॉक्टरांना कोविड काळात नियुक्त कंत्राटी परिचारिका व डॉक्टरांप्रमाणे समान वेतन देणे ५) कंत्राटी शिक्षकांना महापालिका सेवेत सामावून घेणे (औरंगाबाद व नवी मुंबई महानगरपालिका प्रमाणे तसेच ठाणे महानगरपालिकेतील आपत्ती प्रतिसाद दल (TDRF), समाज विकास विभागातील कर्मचारी, NUHM – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व RCH – प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समावेशनाच्या धर्तीवर) कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय आमदार संजयजी केळकर साहेबांनी घेतलेला पुढाकार निश्चितच स्तुत्य असून, कामगार वर्ग त्यांच्या या प्रयत्नांबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. लवकरच पुढील पंधरा दिवसानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध विषयावर मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे. आणि सविस्तर इतर विषयावर सन्माननीय आयुक्त महोदयांनी येत्या आठवड्यामध्ये संघटनेसाठी स्वतंत्र वेळ देण्याचे मान्य केलेले आहे. यावेळी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री. अजित मोरे, श्री. सुधाकर शिंदे, श्री. नितीन मडके, श्री. हरिचंद्र देशमुख, श्री. अजित नांगरे, श्री. कैलास जाधव, श्री. हेमंत पुजारी, श्री. केरबा झिंजे, श्री. किशोर गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. *आपला* *दत्ता घुगे* *अध्यक्ष*- *महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, ठाणे.*4
- Post by Shailesh Karande1