शेतातील कचरा पेटवणे पडले महागात; सुटाळा खुर्द येथे आगीत घरातील साहित्य जळून खाक खामगाव : शेतातील कचरा पेटवण्याची एक छोटीशी चूक एका कुटुंबासाठी अत्यंत भयानक ठरली आहे. सुटाळा खुर्द येथे रात्रीच्या सुमारास शेतातील कचऱ्याला लावलेली आग वाऱ्यामुळे पसरली आणि आज सकाळी 11 वाजता सुमारास आगीने रौद्र रूप धारण करत शेतातील घराला कचाट्यात घेतले. यामध्ये उत्तम कानोजी घाटे यांचे घर जळाले असून संसाराची मोठी राखरांगोळी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुटाळा खुर्द शिवारात रात्रीच्या वेळी शेतातील कचरा (काडीकचरा) पेटवण्यात आला होता. मात्र, रात्रीच्या वाऱ्यामुळे या आगीच्या ठिणग्या उडून शेतातच असलेल्या घरालगतच्या कुटार जळाले काही क्षणातच आगीने घराला विळखा घातला. या भीषण आगीत घरातील फ्रीज, कुलर, कपाट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अंगावरील कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. घराचा संपूर्ण संसार डोळ्यादेखत जळत असताना घाटे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते, मात्र कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी सुटाळा खुर्द चे तलाठी सुमित गवई , ग्रामपंचायत ग्रामसेवक कांबळे, दाखल होऊन पाहणी केली.
शेतातील कचरा पेटवणे पडले महागात; सुटाळा खुर्द येथे आगीत घरातील साहित्य जळून खाक खामगाव : शेतातील कचरा पेटवण्याची एक छोटीशी चूक एका कुटुंबासाठी अत्यंत भयानक ठरली आहे. सुटाळा खुर्द येथे रात्रीच्या सुमारास शेतातील कचऱ्याला लावलेली आग वाऱ्यामुळे पसरली आणि आज सकाळी 11 वाजता सुमारास आगीने रौद्र रूप धारण करत शेतातील घराला कचाट्यात घेतले. यामध्ये उत्तम कानोजी घाटे यांचे घर जळाले असून संसाराची मोठी राखरांगोळी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुटाळा खुर्द शिवारात रात्रीच्या वेळी शेतातील कचरा (काडीकचरा) पेटवण्यात आला होता. मात्र, रात्रीच्या वाऱ्यामुळे या आगीच्या ठिणग्या उडून शेतातच असलेल्या घरालगतच्या कुटार जळाले काही क्षणातच आगीने घराला विळखा घातला. या भीषण आगीत घरातील फ्रीज, कुलर, कपाट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अंगावरील कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. घराचा संपूर्ण संसार डोळ्यादेखत जळत असताना घाटे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते, मात्र कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी सुटाळा खुर्द चे तलाठी सुमित गवई , ग्रामपंचायत ग्रामसेवक कांबळे, दाखल होऊन पाहणी केली.
- खामगाव : शेतातील कचरा पेटवण्याची एक छोटीशी चूक एका कुटुंबासाठी अत्यंत भयानक ठरली आहे. सुटाळा खुर्द येथे रात्रीच्या सुमारास शेतातील कचऱ्याला लावलेली आग वाऱ्यामुळे पसरली आणि आज सकाळी 11 वाजता सुमारास आगीने रौद्र रूप धारण करत शेतातील घराला कचाट्यात घेतले. यामध्ये उत्तम कानोजी घाटे यांचे घर जळाले असून संसाराची मोठी राखरांगोळी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुटाळा खुर्द शिवारात रात्रीच्या वेळी शेतातील कचरा (काडीकचरा) पेटवण्यात आला होता. मात्र, रात्रीच्या वाऱ्यामुळे या आगीच्या ठिणग्या उडून शेतातच असलेल्या घरालगतच्या कुटार जळाले काही क्षणातच आगीने घराला विळखा घातला. या भीषण आगीत घरातील फ्रीज, कुलर, कपाट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अंगावरील कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. घराचा संपूर्ण संसार डोळ्यादेखत जळत असताना घाटे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते, मात्र कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी सुटाळा खुर्द चे तलाठी सुमित गवई , ग्रामपंचायत ग्रामसेवक कांबळे, दाखल होऊन पाहणी केली.1
- Post by Sachin kadukar1
- अकोला: सध्या उन्हाचा तडाखा वाढत असतानाच आगीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. पातूर तालुक्यातील उमरा येथे आज घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार डोळ्यादेखत जळून खाक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असताना उमरा येथील एका घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांबूनही दिसत होते. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे, रोकड आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळून कोळसा झाल्या होत्या. दैव बलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ऐन उन्हाळ्यात या गरीब कुटुंबावर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. शासनाने या घटनेचा त्वरित पंचनामा करून पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.1
- मतदार संघाच्या विकासासाठी डॉक्टर किशोर केला यांचे भरी योगदान.आ.डॉ.संजय कुटे.1
- शेगाव हादरले! वाटिका चौकात भीषण आग; सिलिंडर स्फोटात ७ दुकाने भस्मसात1
- पुन्हा एकदा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड चर्चेत आले आहेत, पण यावेळी कारण ठरलंय एक पुस्तक. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत आमदार संजय गायकवाडांनी थेट पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन करून शिवीगाळ केल्याचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नक्की काय आहे हे प्रकरण आणि हा वाद नेमका का उफाळून आलाय? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये."घटना अशी आहे की, नुकत्याच एका लग्नसमारंभात आ. संजय गायकवाड यांच्या पत्नी आणि बुलढाण्याच्या नगराध्यक्ष सौ. पूजाताई गायकवाड यांना भेट म्हणून 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक देण्यात आलं. घरी आल्यावर जेव्हा त्यांनी हे पुस्तक वाचलं, तेव्हा त्यांना पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप आला. शीर्षकात 'छत्रपती शिवाजी महाराज' असा उल्लेख का नाही? आणि हे नाव एकेरी का? असा सवाल करत आ. गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना रात्री उशिरा फोन लावला."सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार गायकवाड अत्यंत आक्रमक भाषेत बोलताना ऐकू येत आहेत. त्यांनी केवळ शीर्षकावर आक्षेप घेतला नाही, तर प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या ऑडिओवरून स्पष्ट होतेय. एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे भाषेचा वापर करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- नमस्कार मित्रांनो... बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नाव जोरदार चर्चेत आले आहे... ते नाव म्हणजे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा! जनतेशी थेट नाळ जोडणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून सानंदा यांची ओळख निर्माण झाली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामांची चर्चा आजही नागरिकांमध्ये होताना दिसते. गरीब, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सानंदा यांची कार्यशैली ही शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध मानली जाते. वेळेचे महत्त्व, संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हे त्यांच्या नेतृत्वाचे मुख्य गुण मानले जातात. अलीकडच्या काळात त्यांच्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची भूमिका चर्चेत राहिली. सध्या ते बारामती येथे सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षात त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही... आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांचे नावही चर्चेत असून, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समर्थक काय म्हणतात? सानंदा म्हणजे गरीबांचा आधार... कार्यकर्त्यांची ताकद... आणि बुलढाणा जिल्ह्याचा दमदार आवाज! एकूणच काय तर... राणा दिलीपकुमार सानंदा यांची राजकीय गाडी आता पुन्हा वेगाने धावताना दिसत आहे... आणि आगामी काळात ते मोठी भूमिका बजावतील, अशी चर्चा रंगली आहे.1
- मूर्तिजापूर: विज्ञानाच्या युगात आजही समाजाला अंधश्रद्धेचा विळखा असल्याचे एक संतापजनक उदाहरण अकोला जिल्ह्यातील निंभा (ता. मूर्तिजापूर) येथे समोर आले आहे. एका भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळ मांडल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. निंभा गावातील मधु महाराज आणि चेतन महाराज यांच्याकडून हा अघोरी प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक भोंदू बाबा चक्क एका लहान बाळाला आपल्या दातांनी धरून हवेत फिरवताना दिसत आहे. उपचाराच्या नावाखाली सुरू असलेला हा अघोरी प्रकार अत्यंत जीवघेणा असून, यामुळे त्या चिमुरड्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. कायद्याचा भंग या संदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 'जादू-टोणा विरोधी कायदा' अस्तित्वात आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धेचा प्रसार करणे आणि अघोरी प्रथांचे पालन करणे हा या कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. तसेच, ज्या व्यक्तीकडे अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नाही, अशी व्यक्ती उपचार करत असेल तर तो ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज ॲक्ट' अंतर्गतही गुन्हा ठरतो. नागरिकांमध्ये संताप निंभा गावातील या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. "आजच्या काळातही अशा प्रकारे लहान मुलांच्या जिवाशी खेळ खेळला जाणे दुर्दैवी आहे," अशी भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहनही सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे.1