Shuru
Apke Nagar Ki App…
शेगाव हादरले! वाटिका चौकात भीषण आग; सिलिंडर स्फोटात ७ दुकाने भस्मसात
बुलढाणा माझा न्युज
शेगाव हादरले! वाटिका चौकात भीषण आग; सिलिंडर स्फोटात ७ दुकाने भस्मसात
More news from महाराष्ट्र and nearby areas
- शेगाव हादरले! वाटिका चौकात भीषण आग; सिलिंडर स्फोटात ७ दुकाने भस्मसात1
- पुन्हा एकदा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड चर्चेत आले आहेत, पण यावेळी कारण ठरलंय एक पुस्तक. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत आमदार संजय गायकवाडांनी थेट पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन करून शिवीगाळ केल्याचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नक्की काय आहे हे प्रकरण आणि हा वाद नेमका का उफाळून आलाय? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये."घटना अशी आहे की, नुकत्याच एका लग्नसमारंभात आ. संजय गायकवाड यांच्या पत्नी आणि बुलढाण्याच्या नगराध्यक्ष सौ. पूजाताई गायकवाड यांना भेट म्हणून 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक देण्यात आलं. घरी आल्यावर जेव्हा त्यांनी हे पुस्तक वाचलं, तेव्हा त्यांना पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप आला. शीर्षकात 'छत्रपती शिवाजी महाराज' असा उल्लेख का नाही? आणि हे नाव एकेरी का? असा सवाल करत आ. गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना रात्री उशिरा फोन लावला."सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार गायकवाड अत्यंत आक्रमक भाषेत बोलताना ऐकू येत आहेत. त्यांनी केवळ शीर्षकावर आक्षेप घेतला नाही, तर प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या ऑडिओवरून स्पष्ट होतेय. एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे भाषेचा वापर करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- नमस्कार मित्रांनो... बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नाव जोरदार चर्चेत आले आहे... ते नाव म्हणजे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा! जनतेशी थेट नाळ जोडणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून सानंदा यांची ओळख निर्माण झाली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामांची चर्चा आजही नागरिकांमध्ये होताना दिसते. गरीब, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सानंदा यांची कार्यशैली ही शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध मानली जाते. वेळेचे महत्त्व, संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हे त्यांच्या नेतृत्वाचे मुख्य गुण मानले जातात. अलीकडच्या काळात त्यांच्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची भूमिका चर्चेत राहिली. सध्या ते बारामती येथे सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षात त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही... आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांचे नावही चर्चेत असून, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समर्थक काय म्हणतात? सानंदा म्हणजे गरीबांचा आधार... कार्यकर्त्यांची ताकद... आणि बुलढाणा जिल्ह्याचा दमदार आवाज! एकूणच काय तर... राणा दिलीपकुमार सानंदा यांची राजकीय गाडी आता पुन्हा वेगाने धावताना दिसत आहे... आणि आगामी काळात ते मोठी भूमिका बजावतील, अशी चर्चा रंगली आहे.1
- खामगाव : शेतातील कचरा पेटवण्याची एक छोटीशी चूक एका कुटुंबासाठी अत्यंत भयानक ठरली आहे. सुटाळा खुर्द येथे रात्रीच्या सुमारास शेतातील कचऱ्याला लावलेली आग वाऱ्यामुळे पसरली आणि आज सकाळी 11 वाजता सुमारास आगीने रौद्र रूप धारण करत शेतातील घराला कचाट्यात घेतले. यामध्ये उत्तम कानोजी घाटे यांचे घर जळाले असून संसाराची मोठी राखरांगोळी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुटाळा खुर्द शिवारात रात्रीच्या वेळी शेतातील कचरा (काडीकचरा) पेटवण्यात आला होता. मात्र, रात्रीच्या वाऱ्यामुळे या आगीच्या ठिणग्या उडून शेतातच असलेल्या घरालगतच्या कुटार जळाले काही क्षणातच आगीने घराला विळखा घातला. या भीषण आगीत घरातील फ्रीज, कुलर, कपाट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अंगावरील कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. घराचा संपूर्ण संसार डोळ्यादेखत जळत असताना घाटे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते, मात्र कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी सुटाळा खुर्द चे तलाठी सुमित गवई , ग्रामपंचायत ग्रामसेवक कांबळे, दाखल होऊन पाहणी केली.1
- आ. संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल… राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड!1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- सिल्लोड येथे शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात अपशब्द वापरून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे यांच्या विरोधात आज रोजी सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन देत वारकरी संप्रदायाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस विविध वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती1
- जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.1