महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वाचनविषयक दृष्टिकोन आणि जीवनप्रवास.. विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ एक कायदेतज्ज्ञ किंवा राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर ते अफाट ज्ञानाचे महामेरू होते. त्यांच्या अथांग ज्ञानाच्या मुळाशी होते त्यांचे 'वाचनवेड'. डॉ. बाबासाहेब 'वाचन' या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना अत्यंत मौलिक विचार मांडतात, जे त्यांच्या विद्वत्तेची व्याप्ती स्पष्ट करतात. वाचनाची व्याप्ती आणि प्रक्रिया.. डॉ.बाबासाहेबांच्या मते, "वाचन म्हणजे केवळ डोळ्याखालून अक्षरे घालणे नव्हे, तर वाचन म्हणजे बोलणे आणि निर्जीव शब्दांना बोलते करणे होय." ते म्हणतात की, अक्षरे आणि शब्द मुक असतात; जो माणूस त्या मूक शब्दांना बोलते करतो, तोच खरा वाचक असतो. हे सामर्थ्य आणि ही पात्रता ज्याच्या अंगी असते, त्याच्याशीच अक्षरे, शब्द आणि ग्रंथ संवाद साधू लागतात. अशा वाचकाला शब्दांचे इंगित उमजते आणि ग्रंथांतून ग्रंथकाराचे नेमके विचार समजतात. विचारांची मशाल आणि चिंतनाचे महत्त्व.. वाचनाची प्रक्रिया केवळ विचार समजण्यावर संपत नाही. डॉ.बाबासाहेब स्पष्ट करतात की, "एका मशालीने दुसरी मशाल पेटवली जाते, तसाच एक विचार दुसरा विचार जागृत करतो." वाचनाची परिमिती म्हणजेच अंतिम टप्पा हा चिंतनात व्हायला हवा. केवळ वाचलेला शब्द सार्थ आहे की नाही, आणि त्यातून व्यक्त होणारा विचार सत्य व साधार आहे का, हे त्यावर सखोल चिंतन केल्याशिवाय कळू शकत नाही. बुद्धीची प्रगल्भता आणि वाचन.. डॉ. बाबासाहेब वाचनाची तुलना अन्नाशी करतात. त्यांच्या शब्दात सांगायचे तर, "वाचन मनाला अन्न पुरवते; पण या अन्नाचे जसे चर्वण (चावून खाणे) केले तरच ते पचते, तसेच वाचनाचे आहे. वाचन पचले तरच बुद्धी प्रगल्भ होऊ शकते." बुद्धीच्या विकासासाठी आणि ज्ञानाच्या परिपक्वतेसाठी केवळ माहिती गोळा करणे पुरेसे नाही, तर ती माहिती आत्मसात करून त्यावर विचार करणे आवश्यक आहे. अनुभवाचे बोल आणि ग्रंथप्रेम.. डॉ.बाबासाहेबांचे हे वाचनविषयक विचार पाहिले म्हणजे, ग्रंथवाचन, व्यासंग आणि चिंतन या गोष्टींना ते किती सर्वोच्च महत्त्व देत होते, हे प्रकर्षाने जाणवते. हा केवळ एक उपदेश नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवाचा निष्कर्ष होता. असे होते ग्रंथप्रेमी डॉ. आंबेडकर! "ग्रंथ हेच त्यांचे जीवनसर्वस्व होते आणि वाचन हे त्यांचे व्यसन होते. त्यांच्या कार्याचा आणि संघर्षाचा आधार हे त्यांचे प्रचंड वाचनच होते." अशा या महामानवाच्या विचारांच्या वाटेवर चालणारा मी एक छोटासा वाटसरू आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! डॉ.बळीराम पांडे अर्थशास्त्र विभाग, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर Mo.No.87886 69426
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वाचनविषयक दृष्टिकोन आणि जीवनप्रवास.. विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ एक कायदेतज्ज्ञ किंवा राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर ते अफाट ज्ञानाचे महामेरू होते. त्यांच्या अथांग ज्ञानाच्या मुळाशी होते त्यांचे 'वाचनवेड'. डॉ. बाबासाहेब 'वाचन' या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना अत्यंत मौलिक विचार मांडतात, जे त्यांच्या विद्वत्तेची व्याप्ती स्पष्ट करतात. वाचनाची व्याप्ती आणि प्रक्रिया.. डॉ.बाबासाहेबांच्या मते, "वाचन म्हणजे केवळ डोळ्याखालून अक्षरे घालणे नव्हे, तर वाचन म्हणजे बोलणे आणि निर्जीव शब्दांना बोलते करणे होय." ते म्हणतात की, अक्षरे आणि शब्द मुक असतात; जो माणूस त्या मूक शब्दांना बोलते करतो, तोच खरा वाचक असतो. हे सामर्थ्य आणि ही पात्रता ज्याच्या अंगी असते, त्याच्याशीच अक्षरे, शब्द आणि ग्रंथ संवाद साधू लागतात. अशा वाचकाला शब्दांचे इंगित उमजते आणि ग्रंथांतून ग्रंथकाराचे नेमके विचार समजतात. विचारांची मशाल आणि चिंतनाचे महत्त्व.. वाचनाची प्रक्रिया केवळ विचार समजण्यावर संपत नाही. डॉ.बाबासाहेब स्पष्ट करतात की, "एका मशालीने दुसरी मशाल पेटवली जाते, तसाच एक विचार दुसरा विचार जागृत करतो." वाचनाची परिमिती म्हणजेच अंतिम टप्पा हा चिंतनात व्हायला हवा. केवळ वाचलेला शब्द सार्थ आहे की नाही, आणि त्यातून व्यक्त होणारा
विचार सत्य व साधार आहे का, हे त्यावर सखोल चिंतन केल्याशिवाय कळू शकत नाही. बुद्धीची प्रगल्भता आणि वाचन.. डॉ. बाबासाहेब वाचनाची तुलना अन्नाशी करतात. त्यांच्या शब्दात सांगायचे तर, "वाचन मनाला अन्न पुरवते; पण या अन्नाचे जसे चर्वण (चावून खाणे) केले तरच ते पचते, तसेच वाचनाचे आहे. वाचन पचले तरच बुद्धी प्रगल्भ होऊ शकते." बुद्धीच्या विकासासाठी आणि ज्ञानाच्या परिपक्वतेसाठी केवळ माहिती गोळा करणे पुरेसे नाही, तर ती माहिती आत्मसात करून त्यावर विचार करणे आवश्यक आहे. अनुभवाचे बोल आणि ग्रंथप्रेम.. डॉ.बाबासाहेबांचे हे वाचनविषयक विचार पाहिले म्हणजे, ग्रंथवाचन, व्यासंग आणि चिंतन या गोष्टींना ते किती सर्वोच्च महत्त्व देत होते, हे प्रकर्षाने जाणवते. हा केवळ एक उपदेश नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवाचा निष्कर्ष होता. असे होते ग्रंथप्रेमी डॉ. आंबेडकर! "ग्रंथ हेच त्यांचे जीवनसर्वस्व होते आणि वाचन हे त्यांचे व्यसन होते. त्यांच्या कार्याचा आणि संघर्षाचा आधार हे त्यांचे प्रचंड वाचनच होते." अशा या महामानवाच्या विचारांच्या वाटेवर चालणारा मी एक छोटासा वाटसरू आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! डॉ.बळीराम पांडे अर्थशास्त्र विभाग, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर Mo.No.87886 69426
- विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. एका बाजूला आंबेडकर अनुयायांनी, भीम सैनिकांनी समतेचा संदेश देत लातूर शहरातून अनेक भागातून मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांना शांततेचा संदेश देत भीम आर्मीचे रणधीर सुरवसे यांनी मिरवणुकीतील अध्यक्षांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष रणधीर सुरवसे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिका संघर्ष करा परंतु आपला समाज संघटित झाला नाही तो झाला पाहिजे, संघटन करा असे समाजाला संदेश देत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भीम आर्मीने उत्साहात साजरी केली. याप्रसंगी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- 🙏 मी तुम्हाला एका खास उपक्रमासाठी आमंत्रित करत आहे… 🌍 आज जगात ताण, भीती आणि अस्थिरता वाढत आहे… पण एक सुंदर सत्य आहे - 👉 समाजातील फक्त 1% लोक जर नियमित ध्यान करू लागले, तर त्यांचा शांत आणि सकारात्मक प्रभाव हळूहळू संपूर्ण समाजात पसरतो 💫 🧘♂️14 दिवसांची विनामूल्य मेडिटेशन सिरीज 🗓 20 एप्रिलपासून ⏰ Batch Timings: 👉 7:00 AM | 11:00 AM | 7:00 PM ✨ प्राणायाम • ध्यान • सकारात्मक ऊर्जा आताच विनामूल्य नोंदणी करा आणि त्या 1% चा भाग बनन्यासाठी व्हॉटसअप करा 9422366147 🌿 शांत मनातूनच शांत जग निर्माण होतं 🌍1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- Post by Ramesh Mulgir1
- जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली1