भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू ! वेदनादायी घटना भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू नांदेड शहराजवळील मुगाट रोडवर झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात सिडको परिसरातील युवा उद्योजक दत्ता मोटभरे तसेच बोरगाव येथील रहिवासी स्वप्नील घोरबांड यांचा जागीच मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे नांदेड शहरासह परिसरात शोककळा पसरली असून दोघेही मित्र सामाजिक व मित्रपरिवारात अत्यंत लोकप्रिय होते. दत्ता मोटभरे हे सिडको परिसरातील उदयोन्मुख युवा उद्योजक म्हणून परिचित होते, तर स्वप्नील घोरबांड हे बोरगाव येथील रहिवासी असून त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नसून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. दोघांच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही श्रद्धांजलीचा वर्षाव होत असून “जिवलग मित्रांची साथ एका क्षणात तुटली” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

- डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- कीर्तनकार आणि संतांविरोधातील आरोपांनंतर पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध; जाहीर माफी व अटकेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित “प्रतिगामी विचारांची घुसखोरी” झाल्याचा आरोप करत काही कीर्तनकार आणि संत-महंतांची नावे सार्वजनिक केल्याने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, लवांडे यांच्या विधानाने संत परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपूर, आळंदी यांसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी लवांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अटकेची मागणी केली. दरम्यान, संबंधित संत आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- बिडकीन बस स्टॅन्ड ता. पैठण.जि. औरंगाबाद एस टी महामंडळ पैठण बिडकीन एमआयडीसी बिडकीन बस स्टॅन्ड काम सहा महिन्यापासून बंद आहे. बिडकीन बस स्टँड काम बंद आहे. एसटी बाहेरून जाऊ लागले. बस स्टॅन्ड प्रवाशांना उन्हाळ्यामुळे लय हाल होत आहे. बस स्टॅन्ड मध्ये छत नाही.1
- पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.1
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.1
- जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.1
- धाराशिव-उजनी राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात बीएलओचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, राज्यमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.1