भिगवण-बारामती राज्यमार्गावर पिकअपच्या धडकेत ८१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; भिगवण-बारामती राज्यमार्गावर पिकअपच्या धडकेत ८१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; **भिगवण:** भिगवण-बारामती राज्यमार्गावर मदनवाडी गावाच्या हद्दीत मालवाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने दिलेल्या अपघातात एका ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर चालकाने वाहनासह पळ काढला होता, मात्र पोलिसांनी तातडीने तपास करत वाहन आणि चालकाचा शोध घेतला आहे. भिगवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ३० तारखेला सकाळी ढवळे वस्तीजवळ हा अपघात घडला. **गणपत नारायण नरुटे** (वय ८१, रा. मदनवाडी) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या तातडीच्या तपासामुळे MH 12 GT 3116 या पिकअप वाहनाचा चालक **अशोक बाळू राऊत** (वय ३५, रा. भांडेवाडी, कर्जत) याला निष्पन्न करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन न करता हलगर्जीपणाने वाहन चालवून निष्पाप नागरिकाचा बळी घेतल्याप्रकरणी आणि अपघाताची माहिती न देता पळ काढल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद मृत गणपत नरुटे यांचे पुतणे **मगण विठ्ठल नरुटे** यांनी दिली आहे.

- दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी1
- श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.3
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर1
- थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.1
- लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.4
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1