Shuru
Apke Nagar Ki App…
सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित पुण्यातील यांना जामीन मंजूर महाराष्ट्रात गाजलेली विशेष केस संतोष पंडित यांना अखेर न्यायालयाचा जामीन मंजूर
प्रताप शेळके
सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित पुण्यातील यांना जामीन मंजूर महाराष्ट्रात गाजलेली विशेष केस संतोष पंडित यांना अखेर न्यायालयाचा जामीन मंजूर
More news from महाराष्ट्र and nearby areas
- १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.4
- विरोधकांनी संविधानाचा अपमान केला; नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पल हार घालून २५ हजार कर्जतकरांचा अपमान - सुनील शेलार यांचा हल्लाबोल कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून विरोधी नगरसेवकांनी केवळ नगराध्यक्षांचाच नव्हे तर संविधानाचा, घटनेचा आणि कर्जतच्या २५ हजार जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात भाजप नेते व नगराध्यक्षा पती सुनील शेलार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी दलित वस्ती निधी दिला नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी विरोधकांनी दिली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. निधी वाटप सर्वानुमते झाले - सुनील शेलार यावेळी बोलताना सुनील शेलार म्हणाले की, "दलित वस्ती निधी वाटपाचा विषय हा एकट्या नगराध्यक्षांचा विषय नाही. या संदर्भात सर्व नगरसेवकांनी एकत्रित विशेष सभा घेऊन सर्वानुमते निधीचे वाटप केलेले आहे. प्रभाग क्रमांक १५ ला यापूर्वीच सर्वात जास्त निधीचे वाटप झालेले आहे. कर्जत शहरातील इतर प्रभागात देखील मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय बांधव राहतात. त्यांनाही विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे त्या प्रभागात देखील निधी दिला पाहिजे, या सर्व समावेशक भावनेने हा निधी देण्यात आला आहे. यात कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबाह्यता झालेली नाही." "मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी मुद्दामहून या विषयाला वेगळे वळण देऊन नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केला. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे," असेही शेलार म्हणाले. या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.1
- दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना1
- यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांनी उजनी धरणातून कॅनल द्वारे तुळशी गावाला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे1
- नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार; गुन्हा दाखल करण्याची नगराध्यक्षा छाया शेलार यांची मागणी हा माझा नव्हे, संविधान, लोकशाही आणि कर्जतकरांचा अपमान”; पत्रकार परिषदेत छाया शेलार आक्रमक कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा प्रकार हा केवळ व्यक्तीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेचा, संविधानाने प्रदान केलेल्या पदाचा आणि समस्त कर्जतकर जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. छाया सुनील शेलार यांनी केली. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. निधीच्या विषयाला राजकीय रंग दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राप्त निधी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या वस्ती तसेच राखीव प्रभागासाठी खर्च करण्यात येत आहे. मात्र, या विषयाला जाणूनबुजून राजकीय रंग देऊन नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मला कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. माझ्याकडे या विषयाची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून अवमान करण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग असताना अशा प्रकारे पदाचा अवमान करणे योग्य नाही,” असे शेलार यांनी सांगितले. “खुर्चीचा अवमान म्हणजे पदाचा अवमान” “नगराध्यक्षा हे शहराचे प्रथम नागरिक पद आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान हा केवळ माझा वैयक्तिक अपमान म्हणून पाहता येणार नाही. हा संविधानिक लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेलार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गटनेते सतिश पाटील, नगरसेविका अश्विनी दळवी,लालासाहेब शेळके, दत्ता पिसाळ, रवी सुपेकर,नंदकुमार भैलुमे, सुनील शेलार उपस्थित होते.3
- बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार1
- लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.1