logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची ‘उद्योग-पोलीस समन्वय’ बैठक संपन्न; सुरक्षित उद्योग संकल्पनेवर भर खंडणी, धमकी आणि बळजबरीने वर्गणी मागणाऱ्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईचा पोलीस अधीक्षकांचा इशारा ढोरकीन/प्रतिनिधी पैठण व गंगापूर औद्योगिक परिसरात देश-विदेशातील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून विविध राज्यांमधून हजारो कामगार रोजगारासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने बुधवार (दि.१६) ‘उद्योग-पोलीस समन्वय’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एमआयडीसी पैठण येथील अजिंता फार्मा कंपनीच्या मीटिंग हॉलमध्ये झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी गंगापूर व पैठण एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक, सीईओ, प्लांट हेड, सुरक्षा प्रमुख, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, एमआयडीसी अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव म्हणाले, "औद्योगिक विकास आणि कायदा व सुव्यवस्था या एकमेकांना पूरक बाबी आहेत. उद्योगांसाठी Reactive Policing पेक्षा Preventive Policing वर आमचा भर असणार आहे. संभाव्य गुन्हे आधीच ओळखून त्यांना प्रतिबंध करणे, उद्योग व्यवस्थापनाशी सातत्यपूर्ण संवाद ठेवणे ही आमची भूमिका राहील. उद्योग सुरक्षित, कामगार सुरक्षित आणि गुंतवणूकदारांचा पोलिसांवर विश्वास असेल तरच या परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होईल." खंडणी-धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीबाबत भूमिका स्पष्ट करताना पोलीस अधीक्षकांनी कठोर इशारा दिला. कोणत्याही कंपनीकडे बळजबरीने वर्गणी मागणे, खंडणी मागणे, धमकी देणे, व्यवस्थापनावर दबाव आणणे, कामात अडथळा निर्माण करणे किंवा कामगारांना त्रास देणे या प्रकारांची गंभीर दखल घेतली जाईल. अशा प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः जयंती व उत्सव काळात बळजबरीने वर्गणी मागण्यास कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार...) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. उद्योजकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीतील प्रमुख निर्णय व सूचना १) सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा: प्रत्येक उद्योगात १०० टक्के उच्च प्रतीचे सीसीटीव्ही, पुरेसा डेटा बॅकअप आणि आवश्यकतेनुसार संबंधित पोलीस ठाण्याला लाइव्ह अक्सेस द्यावा. आर एफ आय डी आधारित प्रवेश नियंत्रण, भंगाराची चोरी आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. डार्क स्पॉट्स व बंद उद्योगांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष द्यावे. २)कामगार पडताळणी: राज्य व परराज्यातून येणाऱ्या सर्व कामगारांचे चारित्र्य पडताळणी तातडीने पूर्ण करून माहिती स्थानिक पोलीस ठाण्याशी शेअर करावी. ३) महिला सुरक्षा: रात्रीच्या शिफ्टमध्ये विशेष पोलीस गस्त, महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मदत आणि महिला कर्मचाऱ्यांसंदर्भात कोणतीही घटना घडल्यास तात्काळ एफआयआर व कायदेशीर कारवाई केली जाईल. ४) इतर विषय: सायबर गुन्हे, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी संयुक्त कृती आराखडा, बंद उद्योगांची सुरक्षा आणि स्थानिक शेतकरी-उद्योजक समन्वय यावरही सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपस्थित उद्योग प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाच्या विकासाभिमुख व उद्योगपूरक भूमिकेचे स्वागत करीत वाहतूक, सुरक्षा, महिला संरक्षण, सायबर गुन्हे प्रतिबंध आणि कामगार पडताळणीसाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, प्रभारी अधिकारी एमआयडीसी पैठण भरत मोरे यांच्यासह संबंधित अधिकारी व उद्योग व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘सुरक्षित उद्योग’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पोलीस-उद्योग समन्वय अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

2 hrs ago
user_विलास लाटे
विलास लाटे
Local News Reporter पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago
682cb061-be53-485c-a2bf-def3e92ace3e

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची ‘उद्योग-पोलीस समन्वय’ बैठक संपन्न; सुरक्षित उद्योग संकल्पनेवर भर खंडणी, धमकी आणि बळजबरीने वर्गणी मागणाऱ्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईचा पोलीस अधीक्षकांचा इशारा ढोरकीन/प्रतिनिधी पैठण व गंगापूर औद्योगिक परिसरात देश-विदेशातील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून विविध राज्यांमधून हजारो कामगार रोजगारासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने बुधवार (दि.१६) ‘उद्योग-पोलीस समन्वय’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एमआयडीसी पैठण येथील अजिंता फार्मा कंपनीच्या मीटिंग हॉलमध्ये झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी गंगापूर व पैठण एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक, सीईओ, प्लांट हेड, सुरक्षा प्रमुख, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, एमआयडीसी अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव म्हणाले, "औद्योगिक विकास आणि कायदा व सुव्यवस्था या एकमेकांना पूरक बाबी आहेत. उद्योगांसाठी Reactive Policing पेक्षा Preventive Policing वर आमचा भर असणार आहे. संभाव्य गुन्हे आधीच ओळखून त्यांना प्रतिबंध करणे, उद्योग व्यवस्थापनाशी सातत्यपूर्ण संवाद ठेवणे ही आमची भूमिका राहील. उद्योग सुरक्षित, कामगार सुरक्षित आणि गुंतवणूकदारांचा पोलिसांवर विश्वास असेल तरच या परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होईल." खंडणी-धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीबाबत भूमिका स्पष्ट करताना पोलीस अधीक्षकांनी कठोर इशारा दिला. कोणत्याही कंपनीकडे बळजबरीने वर्गणी मागणे, खंडणी मागणे, धमकी देणे, व्यवस्थापनावर दबाव आणणे, कामात अडथळा निर्माण करणे किंवा कामगारांना त्रास देणे या प्रकारांची गंभीर दखल घेतली जाईल. अशा प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः जयंती व

bcddaaae-81b7-41e4-8019-fbd78b349981

उत्सव काळात बळजबरीने वर्गणी मागण्यास कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार...) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. उद्योजकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीतील प्रमुख निर्णय व सूचना १) सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा: प्रत्येक उद्योगात १०० टक्के उच्च प्रतीचे सीसीटीव्ही, पुरेसा डेटा बॅकअप आणि आवश्यकतेनुसार संबंधित पोलीस ठाण्याला लाइव्ह अक्सेस द्यावा. आर एफ आय डी आधारित प्रवेश नियंत्रण, भंगाराची चोरी आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. डार्क स्पॉट्स व बंद उद्योगांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष द्यावे. २)कामगार पडताळणी: राज्य व परराज्यातून येणाऱ्या सर्व कामगारांचे चारित्र्य पडताळणी तातडीने पूर्ण करून माहिती स्थानिक पोलीस ठाण्याशी शेअर करावी. ३) महिला सुरक्षा: रात्रीच्या शिफ्टमध्ये विशेष पोलीस गस्त, महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मदत आणि महिला कर्मचाऱ्यांसंदर्भात कोणतीही घटना घडल्यास तात्काळ एफआयआर व कायदेशीर कारवाई केली जाईल. ४) इतर विषय: सायबर गुन्हे, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी संयुक्त कृती आराखडा, बंद उद्योगांची सुरक्षा आणि स्थानिक शेतकरी-उद्योजक समन्वय यावरही सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपस्थित उद्योग प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाच्या विकासाभिमुख व उद्योगपूरक भूमिकेचे स्वागत करीत वाहतूक, सुरक्षा, महिला संरक्षण, सायबर गुन्हे प्रतिबंध आणि कामगार पडताळणीसाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, प्रभारी अधिकारी एमआयडीसी पैठण भरत मोरे यांच्यासह संबंधित अधिकारी व उद्योग व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘सुरक्षित उद्योग’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पोलीस-उद्योग समन्वय अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

More news from Pune and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दीर्घकाळ सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विविध वैद्यकीय तपासण्या पुन्हा करण्यात येणार आहेत. सध्या जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात आहे. त्यांची सध्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे मराठा समाजासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर 

उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष
छत्रपती संभाजीनगर 
उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दीर्घकाळ सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विविध वैद्यकीय तपासण्या पुन्हा करण्यात येणार आहेत.
सध्या जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात आहे. त्यांची सध्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे मराठा समाजासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    53 min ago
  • मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.
    1
    मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध
निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।
    1
    SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।
SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    12 hrs ago
  • निफाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच भटके कुत्रे! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल निफाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात चक्क भटक्या कुत्र्यांना सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
    1
    निफाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच भटके कुत्रे! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
निफाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात चक्क भटक्या कुत्र्यांना सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    1
    सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..

दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..


सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..
दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..
दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी निघाले गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर.
    1
    मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी निघाले गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    1
    आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात

आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता.
१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.