*राजकन्या ताई शेगोकार यांनी केले मरणोपरांत नेत्रदान* (पादुका संस्थान मुंडगाव च्या अभियाना अंतर्गत श्रींचे चरणी नेत्रदान) *राजकन्या ताई शेगोकार यांनी केले मरणोपरांत नेत्रदान* (पादुका संस्थान मुंडगाव च्या अभियाना अंतर्गत श्रींचे चरणी नेत्रदान) अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे स्व. राजकन्याताई र. शेगोकार यांचे मरणोत्तर नेत्रदान करून कुटुंबीयांनी समाजाला प्रेरणादायी संदेश दिला आहे. श्री गजानन महाराज पादुका संस्थान, श्रीक्षेत्र मुंडगाव यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नेत्रदान व मरणोत्तर देहदान अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत यात्रा चौक अकोट येथे राहणाऱ्या सौ. राजकन्याताई रवींद्र शेगोकार (वय ७० वर्षे) यांचे दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदानाचा संकल्प पूर्ण केला. राजकन्याबाई यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या डोळ्यांमधून मिळणाऱ्या नेत्रदानामुळे दोन गरजू व्यक्तींच्या जीवनात पुन्हा प्रकाश येण्यास मदत झाली आहे. श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव यांच्या माध्यमातून सन २००७ पासून नेत्रदान व मरणोत्तर देहदान अभियान राबविले जात आहे. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादातून आतापर्यंत शेकडो नागरिकांनी नेत्रदान व देहदानाचे संकल्प नोंदविले आहेत. संस्थानच्या या उपक्रमाचा उद्देश समाजात देहदान व नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण करून मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडण्याची भावना रुजविणे हा आहे. “मृत्यूनंतरही आपले नेत्र एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतात,” या मानवतावादी विचाराला कृतीची जोड देत शेगोकार कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.स्व. राजकन्याताई यांच्या नेत्रदानातून “माणूस जातो, पण त्याचे डोळे कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश देऊन जातात” हा मानवतेचा संदेश अधोरेखित झाला आहे. दिशा फाउंडेशन अमरावतीच्या वतीने शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. नेत्रदानाच्या या पवित्र कार्याला नेत्र कमलांजली हॉस्पिटल अकोला चे डॉ. पनपालीया, चंदू पाटील अकोला, व शेजारी राहणारे गजानन मेहरे, अकोट तसेच पादुका संस्थान च्या वतीने विजय ढोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्व. सौ राजकन्या रवींद्र शेगोकार यांच्या पश्चात त्यांचा मुलगा विशाल शेगोकार, सचिन शेगोकार, व मुलगी सौ. सीमा गजानन पिंपळे, पती रवींद्र शेगोकार या कुटुंबीयांनी दाखविलेल्या या सामाजिक संवेदनशीलतेबद्दल संस्थानच्या वतीने संस्थानाचे अध्यक्ष गणेश ढोले, विश्वस्थ विलास बहादुरे, विजय ढोरे, महेश गाढे, गणेश कळसकर, शरद सोनटक्के, ज्वारसिंग आसोले यांनी संस्थान तर्फे शेगोकार कुटुंबीयाचे घरी जाऊन त्यांची सांत्वन पर भेट घेतली व कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.

- तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात सामनेरी शांतशिला आर्याजी व वैशाली आर्याजी यांना चिवर देऊन केले प्रजावत तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात सामनेरी शांतशिला आर्याजी व वैशाली आर्याजी यांना चिवर देऊन केले प्रजावत अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात भिक्षुणी शिलरक्षीता, सामनेरी भिक्षुणी संघमित्रा यांच्या हस्ते सामनेरी शांतशिला आर्याजी व सामनेरी वैशाली आर्याजी यांना चिवर देऊन त्यांना प्रवजित करण्यात आले.या वेळी बुध्द वंदना,त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.यासाठी येथील विद्याताई रायबोले, शिलाताई हातोले, नर्मदाबाई रायबोले, आशाबाई रायबोले, संध्याताई पाखरे, सुमित्राताई इंगळे, सुर्यकांताताई आठवले, ललीताताई गवारगुरु, कांताबाई रायबोले, शेंगाबाई रायबोले, बेबीबाई रायबोले, नंदाताई गायकवाड, प्रभाताई रायबोले, कमलाबाई रायबोले, ज्योतीताई रायबोले, पुजाताई पाखरे, रजनीताई पाखरे, संगीताताई वानखडे, विद्याताई रायबोले, मैनाबाई रायबोले, मंगलाताई चऱ्हाटे, दुर्गाबाई रायबोले, अनुष्काताई रायबोले,तर कावसा बु येथील उषाताई वानखडे, सुशिलाताई पोहरकार, पदमाताई वानखडे, बेबीताई वानखडे, नर्मदाताई वानखडे, माधुरीताई वानखडे, बेबीताई वानखडे, यमुनाबाई वानखडे, अल्काताई वानखडे, इंदुबाई वानखडे, तसेच वारुळा येथील प्रमिलाबाई वानखडे, व राजु रायबोले, गौतम पाखरे,जिवन रायबोले, माणीकराव रायबोले,डॉ आठवले,पत्रकार राजकुमार वानखडे, सह असंख्य करुणा बुध्द विहार समिती व महिला संघाच्या महिला व येथील ग्रामस्थ उपस्थित होते.भोजन दानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.4
- वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.1
- दुष्काळाच्या छायेत जळगाव जामोद मतदारसंघ; काँग्रेसचा आमदार निवासस्थानी बैठा सत्याग्रह! जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी... दुष्काळाच्या छायेत जळगाव जामोद मतदारसंघ; काँग्रेसचा आमदार निवासस्थानी बैठा सत्याग्रह! जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : गेल्या सुमारे ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यांतील खरीप पिके संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी बैठा सत्याग्रह करण्यात आला. आमदार डॉ. कुटे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.प्रत्येक गावात पिकांचे तातडीने पंचनामे, पीक नुकसानभरपाई, वीजबिलात सवलत, सुरळीत वीजपुरवठा, पिण्याचे व जनावरांसाठी पाणी, चारा व्यवस्था, कर्जवसुलीस स्थगिती तसेच विशेष दुष्काळी मदत पॅकेज देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी काँग्रेस पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले, पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष अविनाश उमरकर, शैलेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, प्रकाश बाप्पू देशमुख, तेजराव मारोडे, दादा पाटील करमोडा, कलदार पाटील, समाधान दामधर, शेख नासीर, शहराध्यक्ष अमर पाचपोर, ज्ञानेश्वर शेजोळे, प्रमोद पाटील, श्याम पालीवाल, सतीश टाकळकर, जुबेर पटेल, जुनेद शेख, वैभव सारोकार, अजहर देशमुख, अंबादास बाठे, ॲड. रतन इंगळे, डॉ. शाकीर, डॉ. प्रशांत राजपूत, अजय राजपूत, अर्जुन घोलप, कैलास बोडखे, तुकाराम गटमणे पाटील, विनोद भिवटे, प्रकाश साबे, प्रमोद गोळे, सय्यद अफ्रोज, अर्शद जमदार यांच्यासह तालुका काँग्रेस समितीचे पदाधिकारी, शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा चिमुकली काढला लकी ड्रॉ खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती , तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, व राणा गणेश मंडळ असतात तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉ नुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असून अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघणार आहे.यामध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशन तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अशा एकूण 28 गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ,शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार मंदार पुरी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रिश अनुपकुमार छतवाणी वय 3 व आर्यन संतोष श्रीनाथ वय या लहान मूल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी ने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली.4
- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन1
- अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था1
- धारणी में अवैध रेत माफियाओं की दबंगई: विरोध करने पर आदिवासी नेता पर ट्रैक्टर चढ़ाने का प्रयास, वीडियो वायरल1