दुचाकीची इलेक्ट्रिक खांबाला धडक; २० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू सिंदीबिरी ते मसूरभावडा रस्त्यावरील घटना.. चिचगड पोलीस ठाणे अंतर्गत दि. २९ मार्च २०२६ रोज रविवारला सायं. अंदाजे ४:०० वाजेच्या सुमारास सिंदिबीरी ते मसूरभावडा रस्त्यावरील मौजा मसूरभावडा परिसरातील रस्त्याचा कडेला असलेल्या इलेक्ट्रिक खांबाला दुचाकीची धडक झाल्याने २० वर्षीय युवकाची जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतकाचे नाव, मोहन शिवलाल कुंभरे (वय २० रा. मुरमाडीटोला / शेरपार ता. देवरी) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक मोहन कुंभरे हा दुचाकी क्र. सी जी ०८ ए आर ६१२५ एच एफ डीलक्स हिरो कंपनीच्या गाडी घेऊन घरून म्हणजेच मुरमाडीटोला येथून कोंबडा बाजार बिचालपुर करिता निघाला होता. मृतकाने आपल्या ताब्यातील दुचाकी हयगयीने व वेगाने चालवून मसूरभावडा परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक खांबाला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, मोहन या २० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद चिचगड पोलीसात केली असून, पुढील तपास सपोनि हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा देसाई करीत आहे.

- Post by Ashlesh Made1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by मनिषा विजय काशीवार2