पाण्यासाठी पाणीटंकीवर चढून महिलांची 'विरूगीरी' खैरलांजी ( साकोली ) येथील प्रकार ; घटनास्थळी ग्रामस्थांनी केला टाकी बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप ; पोलीसांची समयसूचकता साकोली : दोन वर्षांपासून बांधून ठेवलेल्या पाणीपुरवठा टाकीत अद्यापही पाणी नाही. करीता काल ( सोम. ३० मार्च ) ला गटग्रामपंचायत खैरलांजीतील सुमारे ३५ ते ४० महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगीरी करीत आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती होताच साकोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर येथे ग्रामस्थांनी टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला व त्या प्रत्येक बांधकामांचे फोटो व्हिडिओ पुरावा असल्याचा दावा केला आहे. शेवटी सरपंचांना येथे पाचारण करण्यात आले. साकोली जवळील १ कि.मी. खैरलांजी येथे ग्रामपंचायत व सा. बां. उपविभाग जिल्हा परिषद तर्फे २०२३ - २४ ला जि. प. प्राथ. शाळेच्या आवारात अं. ४० फूट उंच कोणतीही सुरक्षा आवरण न करता पाणी टाकी निर्माण केली. येथे पाचदा बोअरवेल करून निष्क्रिय ठरली. तेव्हापासून पाण्याचा हाहाकार होता. या भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई लक्षात घेऊन गावातील सुमारे ३५ ते ४० महिला हातात फलक घेऊन थेट पाणीटंकीवर चढून आंदोलन सुरू केले. पोलीस पाटील मेश्राम यांनी पोलीस ठाणे येथे माहिती दिली. लगेच पोलीस नायक चंद्रकांत थेर व स्वप्निल गोस्वामी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. येथे अनेक ग्रामस्थांनी आरोप केला की, सदर टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला, नियमाने २० एमएम सळाखी असता १० एमएम लावणे, फाऊंडेशन खड्डा कमी खोल करणे व मागे बांधकाम वेळी टाकीला भेगा पडल्या त्यांचे फोटो व्हिडिओ पुरावे जनतेने मोबाईल मध्ये रिकॉर्डिंग करून ठेवले आहेत असा दावा केला. विभागाला अनेकदा याचे अंदाजपत्रक मागितले पण ते सुद्धा दाखविले नाही असा संतापजनक आरोप करीत या संपूर्ण बांधकामाची चौकशी करा अशी मागणी केली. महिलांनी येथे सरपंच येईपर्यंत टाकीवरून न उतरण्याचा पवित्रा घेतला. शेवटी सरपंच पुजा देशमुख हे आले व लवकरच पाण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले व पोलीसांच्या मदतीने महिलांना पाणी टाकीवरून उतरविण्यात यश आले. या आंदोलनात चित्रा मेश्राम, कल्पना सुर्यवंशी, दिव्या हुमणे, शशिकला मुरकुटे, ललिता कुंभरे, सुधा बोरकर, भिमा वालदे, वंदना चंद्रीकापूरे, शशिकला शिवणकर, करिश्मा उके, ममता गजभिये, मनिषा रूखमोडे, वर्षा चचाने, शिला पुरामकर, कांचन उके, डिलेश्वरी बोरकर, सत्यफुला कोल्हे, शारदा मेश्राम, किरण मेश्राम, वैशाली मेश्राम, निर्मला चंद्रीकापूरे, आस्था दिनकर, किरण गजभिये, चारूशिला मेश्राम, आशा राहुले यांसह गावातील सुमारे ४० ते ४५ महिलांनी हे "विरूगीरी" आंदोलन केले होते. "खैरलांजी येथील पाणीटंचाई सोडविण्यासाठी पाच बोअरवेल खोदणयात आल्या परंतु त्या अयशस्वी ठरल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी पाण्यासाठी संताप व्यक्त केला परंतु ग्रामपंचायततर्फे गावकऱ्यांना पाणी देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. पाण्यासाठी पक्की योजना तयार करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्वांसोबत संपर्क करण्यात आला आहे परंतु उद्यापासूनच ५ हजार लिटर पाण्याचा टँकर गावकऱ्यांना पुरविण्यात येत आहे. या सोबतच बाराही महिने पाणी पुरेल यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून संपर्क करून पाणी देण्यात येईल" -- पुजा देशमुख "सरपंच" गटग्रामपंचायत पाथरी खैरलांजी जमनापूर
पाण्यासाठी पाणीटंकीवर चढून महिलांची 'विरूगीरी' खैरलांजी ( साकोली ) येथील प्रकार ; घटनास्थळी ग्रामस्थांनी केला टाकी बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप ; पोलीसांची समयसूचकता साकोली : दोन वर्षांपासून बांधून ठेवलेल्या पाणीपुरवठा टाकीत अद्यापही पाणी नाही. करीता काल ( सोम. ३० मार्च ) ला गटग्रामपंचायत खैरलांजीतील सुमारे ३५ ते ४० महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगीरी करीत आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती होताच साकोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर येथे ग्रामस्थांनी टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला व त्या प्रत्येक बांधकामांचे फोटो व्हिडिओ पुरावा असल्याचा दावा केला आहे. शेवटी सरपंचांना येथे पाचारण करण्यात आले. साकोली जवळील १ कि.मी. खैरलांजी येथे ग्रामपंचायत व सा. बां. उपविभाग
जिल्हा परिषद तर्फे २०२३ - २४ ला जि. प. प्राथ. शाळेच्या आवारात अं. ४० फूट उंच कोणतीही सुरक्षा आवरण न करता पाणी टाकी निर्माण केली. येथे पाचदा बोअरवेल करून निष्क्रिय ठरली. तेव्हापासून पाण्याचा हाहाकार होता. या भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई लक्षात घेऊन गावातील सुमारे ३५ ते ४० महिला हातात फलक घेऊन थेट पाणीटंकीवर चढून आंदोलन सुरू केले. पोलीस पाटील मेश्राम यांनी पोलीस ठाणे येथे माहिती दिली. लगेच पोलीस नायक चंद्रकांत थेर व स्वप्निल गोस्वामी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. येथे अनेक ग्रामस्थांनी आरोप केला की, सदर टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला, नियमाने २० एमएम सळाखी असता १० एमएम लावणे, फाऊंडेशन खड्डा कमी खोल करणे व मागे बांधकाम वेळी टाकीला भेगा पडल्या त्यांचे फोटो
व्हिडिओ पुरावे जनतेने मोबाईल मध्ये रिकॉर्डिंग करून ठेवले आहेत असा दावा केला. विभागाला अनेकदा याचे अंदाजपत्रक मागितले पण ते सुद्धा दाखविले नाही असा संतापजनक आरोप करीत या संपूर्ण बांधकामाची चौकशी करा अशी मागणी केली. महिलांनी येथे सरपंच येईपर्यंत टाकीवरून न उतरण्याचा पवित्रा घेतला. शेवटी सरपंच पुजा देशमुख हे आले व लवकरच पाण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले व पोलीसांच्या मदतीने महिलांना पाणी टाकीवरून उतरविण्यात यश आले. या आंदोलनात चित्रा मेश्राम, कल्पना सुर्यवंशी, दिव्या हुमणे, शशिकला मुरकुटे, ललिता कुंभरे, सुधा बोरकर, भिमा वालदे, वंदना चंद्रीकापूरे, शशिकला शिवणकर, करिश्मा उके, ममता गजभिये, मनिषा रूखमोडे, वर्षा चचाने, शिला पुरामकर, कांचन उके,
डिलेश्वरी बोरकर, सत्यफुला कोल्हे, शारदा मेश्राम, किरण मेश्राम, वैशाली मेश्राम, निर्मला चंद्रीकापूरे, आस्था दिनकर, किरण गजभिये, चारूशिला मेश्राम, आशा राहुले यांसह गावातील सुमारे ४० ते ४५ महिलांनी हे "विरूगीरी" आंदोलन केले होते. "खैरलांजी येथील पाणीटंचाई सोडविण्यासाठी पाच बोअरवेल खोदणयात आल्या परंतु त्या अयशस्वी ठरल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी पाण्यासाठी संताप व्यक्त केला परंतु ग्रामपंचायततर्फे गावकऱ्यांना पाणी देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. पाण्यासाठी पक्की योजना तयार करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्वांसोबत संपर्क करण्यात आला आहे परंतु उद्यापासूनच ५ हजार लिटर पाण्याचा टँकर गावकऱ्यांना पुरविण्यात येत आहे. या सोबतच बाराही महिने पाणी पुरेल यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून संपर्क करून पाणी देण्यात येईल" -- पुजा देशमुख "सरपंच" गटग्रामपंचायत पाथरी खैरलांजी जमनापूर
- Post by मनिषा विजय काशीवार4
- Post by Ashlesh Made1
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Samachar king digital1
- भीषण अपघात! रेती डोजर आणि पिकअपची जोरदार धडक – चालकाचा जागीच मृत्यू नागपूर :- हिंगणा ते किन्ही रोडवरील लक्ष बियर बार समोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. मौदा कडून हिंगणा किन्ही दिशेने जाणारा रेतीचा डोजर (MH 40 CT 9153) आणि जुनेवणी कडून हिंगणा दिशेने येणारी कंपनीची पिकअप (MH 31 FC 3056) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की पिकअप चालक गाडी रस्त्यावर घासत गेल्याने गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मृत चालक हा खापरखेडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशन, अग्निशमन दल व शिवगर्जना ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी श्री.राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, परिसरात संताप व्यक्त केला जात असून शनिवार-रविवारी महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने रेती, गिट्टी व मुरुम वाहतूक करणारी वाहने बेधडक वेगात धावत असल्याची चर्चा रंगली आहे. याच निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंगणात भेट दिली होती, त्यामुळे आता तहसील प्रशासनाच्या कारभारावर लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.1
- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- Post by मनिषा विजय काशीवार2