येवला शहरातून अवजड वाहतूक दिवसा बंद करा; भाजप युवा मोर्चाची मागणी येवला शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेली वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी जड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांनी केली. या संदर्भात त्यांनी शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. येवला शहरात अवजड वाहनांमुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या समस्येचे गांभीर्य ओळखून समीर समदडीया, नाना लहरे, बापू गाडेकर ,राजुसिंग परदेशी यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळवावीत किंवा त्यांच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
येवला शहरातून अवजड वाहतूक दिवसा बंद करा; भाजप युवा मोर्चाची मागणी येवला शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेली वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी जड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांनी केली. या संदर्भात त्यांनी शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. येवला शहरात अवजड वाहनांमुळे शालेय विद्यार्थी
व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या समस्येचे गांभीर्य ओळखून समीर समदडीया, नाना लहरे, बापू गाडेकर ,राजुसिंग परदेशी यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळवावीत किंवा त्यांच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
- वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.1
- *चांदवड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; काजी सांगवी, हिवरखेडे व निमगव्हाण परिसरात नुकसान* *बळीराजा पुन्हा एकदा संकटात;* चांदवड (प्रतिनिधी) :चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाने रौद्र रूप धारण केले. विशेषतः तालुक्यातील काजी सांगवी, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. दुपारपासूनच परिसरात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता. चांदवड शहरातही धुळीचे लोट उसळून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या तालुक्यात गव्हाची कापणी आणि कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काजीसांगवी व निमगव्हाण, हिवरखेडे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतातच ठेवला होता, तर काहींचा उभा गहू काढणीला आलेला होता. मात्र, वादळी पावसामुळे उभा गहू जमिनीदोस्त झाला असून कापून ठेवलेला गहू भिजल्याने त्याला मोड फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून शेतातच साठवून ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मशागत, बी-बियाणे आणि खतांचा खर्चही निघणे आता कठीण झाल्याने शेतकरी डोळ्यात पाणी आणून उघड्यावर पडलेले आपले पीक पाहत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.4
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...1
- नाशिकमधील आरोग्य सेवांतील त्रुटींवर खासदार राजू वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करत ट्रॉमा सेंटरच्या अभावावर लक्ष वेधले. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचे सांगत प्रस्ताव आल्यासच केंद्र मंजुरी देते, असे स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यात ३३४ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा अपुऱ्या असल्याचेही समोर आले.1
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- Sanjay Shirsat Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- सीएम नीतीश कुमार के इस्तीफ़ा देने के बाद फूट-फूट कर रोने लगे मंत्री अशोक चौधरी !!1