खातगुण येथे १२ मार्चपासून 'श्री पीरसाहेब राजे' जंगी उरूस सोहळ्याचे आयोजन मायणी :- प्रतिनिधी खटाव तालुक्यातील मौजे खातगुण येथील ग्रामदैवत श्री पीरसाहेब राजे (बागसवार) यांचा सन २०२६ चा वार्षिक जंगी उरूस सोहळा गुरुवार, दि. १२ मार्चपासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पीरसाहेब देवस्थान कमिटी व समस्त ग्रामस्थांनी दिली आहे. उत्सवाचे मुख्य कार्यक्रम: निमंत्रण पत्रिकेनुसार उरूस सोहळ्याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल: * गुरुवार, दि. १२/०३/२०२६: चुना कार्यक्रम. * शुक्रवार, दि. १३/०३/२०२६: संदल सोहळा. * शनिवार, दि. १४/०३/२०२६: मुख्य जंगी उरूस. * रविवार, दि. १५/०३/२०२६: झेंडा व पालखी सोहळा. * बुधवार, दि. १८/०३/२०२६: पाकळणी कार्यक्रम. पालखी पूजन सोहळा: यावर्षी पालखी पूजनासाठी प्रमुख उपस्थिती कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. ना. श्री. महेशदादा शिंदे (उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांची लाभणार आहे. तसेच पालखी पूजन समारंभ निवृत्त कक्ष अधिकारी प्रवीण लावडं, सुनील लावडं आणि सुलतान मुल्ला यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. मनोरंजनाची मेजवानी: उरुसाच्या निमित्ताने भाविकांच्या मनोरंजनासाठी सिनेमा, तमाशा, नाटके आणि इतर सांस्कृतिक साधनांची मोठी सोय करण्यात आली आहे. या काळात परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने आणि पाळणेही थाटले जाणार आहेत. देवस्थानचे विश्वस्त भानुदास लावडं, संपत लावडं, रमेश लावडं आणि पंढरी लावडं यांनी सर्व भाविकांना या उरूस सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याची आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांची तयारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

- वारंवार होणारी वीज रोहित्र (डीपी) चोरी आणि त्यामुळे अंधारात जाणारी शेती यावर अखेर चितळीच्या शेतकऱ्यांनी स्वतःच 'इलाज' शोधला आहे. टेंभू कॅनॉल जलसेतू परिसरातील जंगल डीपीवर पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि बसवलेल्या सीसीटीव्ही सायरनमुळे फसला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून आता 'मायणी पोलीस' त्यांना कधी गजाआड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चितळी येथील टेंभू कॅनॉल नजीक असलेला 'जंगल डीपी' चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनला होता. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते आणि पिकांना पाणी देणेही कठीण झाले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी एकत्र येत एक अनोखा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन डीपी बसवताना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा केली आणि या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे व हाय-डेसिबल सायरन बसवला. तंत्रज्ञानाचा हा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. सायरन वाजला अन् चोरट्यांनी पळ काढला! ५ मार्च २०२६ च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा या डीपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीपीला हात लावताच कार्यान्वित झालेल्या सायरनने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. सायरनच्या आवाजाने धास्तावलेल्या चोरट्यांनी सामानासह तिथून पोबारा केला. या धावपळीत चोरट्यांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे चितळीकर शेतकरी हैराण आहेत. आतापर्यंत या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, आता शेतकऱ्यांनी चोरट्याचा थेट 'फोटो'च उपलब्ध करून दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी याठिकाणचे शेतकरी राजू पाटील,लालासो पाटील, दादासो पवार , विश्वजित पवार,लक्ष्मण कदम,गणेश मदने,सचिन पाटील,प्रशांत पवार,सुरेश सूर्यवशी,इंद्रजीत पवार,विकास पवार व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. चौकट - "शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांच्या प्रश्नाकडे पोलिस विभागाने आजवर दुर्लक्ष केल्यानेच चोरट्याचे धाडस वाढले आहे. आता स्थानिक शेतकऱ्यांनी पैसे जमवून स्वतःच सुरक्षा यंत्रणा बसवली. आता चोरट्याचा पुरावाही त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. पोलिस प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलून या टोळीचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी सुखाची झोप घेऊ शकेल." - सौ,अनिता संभाजी कोळी, सदस्या,पंचायत समिती. (चितळी) चौकट - चितळीत वाळू चोरी, शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारी, डिपी , केबल चोरी,अवैध दारू विक्री,शालेय वस्तूंची चोरी ,अवैध धंदे असा लहान मोठ्या चोऱ्यां आणि प्रकरणाचा सिलसिला सुरूच आहे. याची पोलिस प्रशासनात दफ्तरी नोंद होते आणि प्रकरण विसरून टाकले जाते. काही बाबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही केले जाते . लोकांनी आता आपल्या चोऱ्यांची माहितीही पोलिसांना देणेही टाळले आहे. सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांच्या घटनांचा बीमोड करण्यासाठी मायणी पोलिसांना आपल्या धडक मोहिमेच्या कारभारातून आपली प्रतिमा उंचावून जनतेत आपली विश्वासार्हता वाढवण्याची गरज आहे. फोटो ओळी - १) चितळी येथील डीपी चोरीच्या प्रकरणात शेतकऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला चोर. २) डिपी चोरी आणि हतबल शेतकरी यांचे काल्पनिक चित्र2
- Post by LOKSHAKATI RAKASHAK1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- विक्रम शिंदे/ भोर दि.9 भोर पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.9 प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्या मार्गदर्शकसूचने नुसार पंचायत समिती भोर येथे पार पडली.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाचे समसमान उमेदवार निवडून आल्याने अखेर चिट्ठीवर सभापती आणि उपसभापती निवडनुकीत नशिबाची साथ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाली आणि दोन्ही पदे मिळाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.यावेळी जिप माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे , विक्रम खुटवड ,भालचंद्र जगताप आदी उपस्थित होते.1
- इचलकरंजी जवळील तारदाळ येथे जुन्या वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली. जावेद मुजावर वय अंदाजे बावीस वर्षे राहणार तारदाळ याच्यावर यश गायकवाड राहणार जावई वाडी याने चाकूने जीवघेणा वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या जावेद मुजावर याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. शहापूर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.1
- आळंदि पुणे : - पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे... : माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद #आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या #Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1