logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एका रात्रीत ८ दुकाने फोडणारी टोळी १२ तासांत जेरबंद मिरजगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

4 hrs ago
user_Malave subhash
Malave subhash
कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
4 hrs ago
e6e2d17b-b483-4ebd-b5e2-4be65b31a272

एका रात्रीत ८ दुकाने फोडणारी टोळी १२ तासांत जेरबंद मिरजगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ------- (प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    1
    -------
(प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी  मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Dattatray Funde
    1
    Post by Dattatray Funde
    user_Dattatray Funde
    Dattatray Funde
    Shevgaon, Ahmednagar•
    14 hrs ago
  • मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    1
    मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    1
    राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था
राहुरी (प्रतिनिधी):
राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली.
ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली.
या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    18 hrs ago
  • मोहोळ :- आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष किशोरराजे पवार आणि ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष किशोर पवार म्हणाले की, मोहोळ शहरातील महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे व प्रेरणादायी आहे. भविष्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राजवर्धिनी राजन घाडगे या विद्यार्थिनीने आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित महिलांची मने जिंकली. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे, रिल स्टार मोहिनी मस्के, नेत्र तंत्रज्ञ मंजिरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नंदा गोरे, शिवसेना शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मुक्ता खंदारे, दिक्षा मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष केरप्पा गाढवे मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शालन मोहन पवार, किसान सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष दाजी साहेब कोकाटे, संभाजी ब्रिगेडच्या चव्हाण, प्रहार संघटनेच्या अध्यक्षा अनिता बळवंतकर, कोषागार विभागातील महिला अधिकारी छबुताई वाघमोडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा खिलारे, आशा वर्कर अर्चना सुतार, काँग्रेसच्या उपाध्यक्ष यशोदा कांबळे, तसेच करमुद्दीन पठाण, समरीन शेख, छाया पवार, कमळा माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होते.
    2
    मोहोळ :-  आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष किशोरराजे पवार आणि ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष किशोर पवार म्हणाले की, मोहोळ शहरातील महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे व प्रेरणादायी आहे. भविष्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राजवर्धिनी राजन घाडगे या विद्यार्थिनीने आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित महिलांची मने जिंकली.
यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे, रिल स्टार  मोहिनी मस्के, नेत्र तंत्रज्ञ मंजिरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नंदा गोरे, शिवसेना शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मुक्ता खंदारे, दिक्षा मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष केरप्पा गाढवे मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शालन मोहन पवार,  किसान सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष दाजी साहेब कोकाटे, संभाजी ब्रिगेडच्या चव्हाण, प्रहार संघटनेच्या अध्यक्षा अनिता बळवंतकर, कोषागार विभागातील महिला अधिकारी छबुताई वाघमोडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा खिलारे, आशा वर्कर अर्चना सुतार, काँग्रेसच्या उपाध्यक्ष यशोदा कांबळे, तसेच करमुद्दीन पठाण, समरीन शेख, छाया पवार, कमळा माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होते.
    user_गो.रा.  कुंभार
    गो.रा. कुंभार
    मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    1 day ago
  • जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.
    1
    जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.
    user_वरद महाराष्ट्र वार्ता
    वरद महाराष्ट्र वार्ता
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 min ago
  • आळंदि पुणे : - पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे... : माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद #आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या #Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews
    1
    आळंदि पुणे : -
पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे...
: माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद
#आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या
#Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.