Shuru
Apke Nagar Ki App…
बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धार्मिक कार्यक्रम की आर्थिक घोटाळा? वारकऱ्यांचा महाराजांवर गंभीर आरोप ! उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा, लातूर मधील या धार्मिक कार्यक्रमात कोट्यावधीचा अपहार ? किशोर महाराज शिवनीकर या महाराजांने कोट्यावधी रुपये लुटले? वारकऱ्याचा आरोप, वारकरी संप्रदाय मध्ये खळबळ. लातूरच्या खंडापूर येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा, या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात, देणगी स्वरूपात साडेपाच ते सहा कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे, दरम्यान जमा झालेल्या देणगी मधून अडीच ते तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप वारकऱ्यांनी केलाय, या कार्यक्रमामधील मुख्य असणाऱ्या किशोर महाराज शिवनीकरांनी हा पार केल्याचा आरोप वारकरी करत आहेत, मागच्या दीड महिन्यापासून हा महाराज फरार आहे, जमा झालेल्या देणगीचा हिशोब न देताच महाराज पसार झाल्याचा वारकरी सांगत आहेत, या प्रकरणाचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहेत लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी वारकऱ्यांची मागणी आहे.1
- प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाबाबत दिलेल्या तक्रारीकडे तहसील प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक भूमिका घेतली. दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला. तक्रारदारांचे म्हणणे आहे की, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. याबाबत यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, दोषी अधिकारी व संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, ड्रोनद्वारे सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी, तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ गरम वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने मात्र आंदोलनाची दखल घेऊन प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल का अशी अशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.1
- नाम और धर्म पूछा, फिर कहा- कलमा पढ़ो, मुंबई में गार्ड्स पर चाकू से हमला मीरा रोड के नया नगर में गार्ड्स पर चाकू से हमला हुआ. आरोपी ने पहले नाम और धर्म पूछकर वार किया. एक गार्ड गंभीर रूप से घायल हुआ. पुलिस ने सीसीटीवी के आधार पर आरोपी जैब अंसारी को डेढ़ घंटे में गिरफ्तार कर लिया. मामले की जांच एटीएस के साथ मिलकर की जा रही है. मुंबई के पास मीरा रोड के नया नगर इलाके में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक शख्स ने सुरक्षा गार्ड्स पर चाकू से हमला कर दिया. बताया जा रहा है कि आरोपी ने पहले दोनों से उनका नाम और धर्म पूछा और यह भी पूछा कि क्या वे कलमा पढ़ सकते हैं. इसके बाद उसने उन पर हमला कर दिया. यह घटना 27 अप्रैल 2026 की सुबह करीब 4 बजे की है. उस समय राजकुमार मिश्रा और सुब्रतो रमेश सेन मीरा रोड ईस्ट स्थित वॉकहार्ट अस्पताल के पीछे बन रही अस्मिता ग्रैंड बिल्डिंग के निर्माण स्थल पर सुरक्षा ड्यूटी पर तैनात थे. जानकारी के अनुसार, 31 वर्षीय जैब जुबैर अंसारी नाम का आरोपी वहां पहुंचा. उसने दोनों गार्ड्स से उनका नाम और धर्म पूछा. जब दोनों ने जवाब दिया तो आरोपी ने उनसे पूछा कि क्या वो कलमा पढ़ सकते हैं. दोनों के मना करने पर आरोपी ने अचानक चाकू निकाल लिया और हमला कर दिया. हमले में राजकुमार मिश्रा को गंभीर चोटें आईं. बताया जा रहा है कि उनके पेट के अंदरूनी हिस्सों तक चोट पहुंची है. वहीं सुब्रतो सेन को पीठ में हल्की चोटें आईं और वह हमले के दौरान किसी तरह केबिन में छिप गए.1
- मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- फटाफट खबरें: 2 मिनट में 20 बड़ी खबरें | 28 अप्रैल 2026 | आज की ताजा खबरें #TodayNews #2Minute20News1
- बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.1
- व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून दोन मित्रांची आत्महत्या ANC - पैठण तालुक्यातील बिडकीन येथे दोन जिवलग मित्रांनी विष प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश झिरपे आणि सचिन आरगडे अशी मृतांची नावे आहेत. गणेशने मृत्यूपूर्वी आईला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून जीवन संपवत असल्याचे सांगितले होते. दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात ठरवून आत्महत्या केल्याचे समोर आले.1
- सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.28. कृषी विभागाने प्रमाणित बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच खतांची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. तसेच चढ्या दराने खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर आणि बोगस साहित्य विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स तयार करावे, पात्र शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पीक कर्ज देवून शेतकऱ्यांची कोठेही अडवणूक - पिळवणूक होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्या अशा स्पष्ट सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. येथील नगर परिषदेच्या सभागृहात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व तालुकास्तरीय नियोजन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना संबोधित करतांना आमदार अब्दुल सत्तार यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीस नगराध्यक्ष अब्दुल समीर , उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अंकिता ताकभाते ,उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव ,गटविकास अधिकारी रत्नाकर पगार ,न.प.चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, पोलीस निरीक्षक शेषराव उदार ,शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे ,उपसभापती संदीप राऊत ,जि.प.सदस्य देविदास पालोदकर ,सय्यद नासिर हुसेन, राजू बाबा काळे, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे ,जयराम चिंचपुरे ,नानासाहेब रहाटे, भावराव पा. लोखंडे, पं.स.सदस्य शेख सलीम, समी चाउस, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, शंकरराव खांडवे ,सयाजीराव वाघ, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, माजी सभापती रामदास पालोदकर, संजय डमाळे , दुर्गाबाई पवार, सुदर्शन अग्रवाल, मनोज झंवर, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे ,जि प सिंचन विभागाच्या उपविभागीय अभियंता रुचिका घोगरे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अभय शेळके यांच्यासह न.प.तील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर ,आसिफ बागवान , शेख इम्रान, अशोक बनसोड, सत्तार हुसेन, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फेरोज खान, बबलू पठाण, शेख सलीम हुसेन आदिंसह शासनाच्या विविध विभागाचे विभागप्रमुख,कर्मचारी - शेतकरी उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार अब्दुल सत्तार यांनी खतांचा अवाजवी साठा व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश देत नॅनो युरियाच्या वापरावर भर देण्यासह शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्याचे सांगितले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत कमी खर्चिक शेती पद्धतींचा विस्तार करण्यावरही त्यांनी भर दिला. पीक कर्जाच्या बाबतीत बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक किंवा पिळवणूक करू नये, त्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. अतिवृष्टी, दुष्काळ यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पिकांचा आराखडा तयार ठेवण्यास सांगितले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू ठेवावी, कृषी सहाय्यकांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व शासनाच्या विविध योजनांची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या तक्रारींना प्राधान्याने व तात्काळ प्रतिसाद देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. पिकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी आपापला कृती आराखडा पुढील सात दिवसांत सादर करावा व ठराविक जबाबदाऱ्या निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे त्यांनी बजावले. “नियोजनातील कसूर शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्ष वाया घालवू शकते. त्यामुळे सर्वांनी सूचनांचे गांभीर्याने पालन करून प्रभावी नियोजन करावे,” असे स्पष्ट मत आमदार सत्तार यांनी व्यक्त केले. याशिवाय “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेअंतर्गत कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पशुधन विकासासाठी सुयोग्य नियोजन करून शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. पोखरा टप्पा १ व २ अंतर्गत मंजूर गावांमध्ये योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्याचे तसेच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. ------------- “शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करताना नेहमीच अधिकृत व ओरिजिनल पावती घ्यावी, जेणेकरून फसवणुकीपासून संरक्षण मिळेल,” असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. बोगस बियाणे, चढ्या दराने विक्री आणि खतांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनीही जागरूक राहणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ------------1