logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, अन्यथा २ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन - रिपाइं (आठवले) चा प्रशासनाला इशारा* *जत / प्रतिनिधी(अरुण कोळी)* जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन निरंतर सुरू ठेवावे, या प्रमुख मागण्यांसाठी दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. जत तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावली असून जत पूर्व व दक्षिण भागात १००० फूट विंधन विहिरी खोदूनही पाणी लागत नसल्याची वस्तुस्थिती आहे. बहुतांशी साठवण तलाव कोरडे पडले आहेत. शेतीला व जनावरांना चारा-पाणी मिळणे दुरापास्त झाले असून पाणी व चाऱ्याअभावी पशुधन तडफडत आहे. पशुपालक व शेतकरी आपली जनावरे खाटकाच्या दावणीला जाऊ नयेत म्हणून चारा-पाण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत. माडग्याळ येथे तालुक्यातील पहिला चारा डेपो सुरू करण्यात आला असून यावरून दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून मजूर रोजगारासाठी अन्य राज्यात स्थलांतरित होत आहेत. *प्रमुख मागण्या :* १. जत तालुका त्वरित दुष्काळी म्हणून जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात. २. म्हैसाळ योजनेचे आवर्तन कायमस्वरूपी सुरू ठेवावे व बंदिस्त पाईपलाईनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. ३. गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे, वृक्ष लागवडीची कामे सुरू करावीत. ४. गरज असलेल्या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. ५. तालुक्यात सुरू असलेली बेकायदेशीर वृक्षतोड त्वरित थांबवावी. साळमळगेवाडी, जिरग्याळ रस्त्यावरील सुझलॉन कंपनीने केलेल्या मोठ्या झाडांच्या बेकायदेशीर वृक्षतोडीची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी. दररोज ४० ट्रक लाकूड तालुक्याबाहेर जात असून याचीही चौकशी व्हावी. शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले साहेब, जिल्हाधिकारी सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, पोलीस निरीक्षक जत, वनक्षेत्रपाल अधिकारी जत, तहसीलदार जत व गटविकास अधिकारी जत यांना पाठविण्यात आल्या आहेत.

4 hrs ago
user_सारथी महाराष्ट्राचा न्यूज
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
Voice of people जत, सांगली, महाराष्ट्र•
4 hrs ago

*जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, अन्यथा २ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन - रिपाइं (आठवले) चा प्रशासनाला इशारा* *जत / प्रतिनिधी(अरुण कोळी)* जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन निरंतर सुरू ठेवावे, या प्रमुख मागण्यांसाठी दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. जत तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावली असून जत पूर्व व दक्षिण भागात १००० फूट विंधन विहिरी खोदूनही पाणी लागत नसल्याची वस्तुस्थिती आहे. बहुतांशी साठवण तलाव कोरडे पडले आहेत. शेतीला व जनावरांना चारा-पाणी मिळणे दुरापास्त झाले असून पाणी व चाऱ्याअभावी पशुधन तडफडत आहे. पशुपालक व शेतकरी आपली जनावरे खाटकाच्या दावणीला जाऊ नयेत म्हणून चारा-पाण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत. माडग्याळ येथे तालुक्यातील पहिला चारा डेपो सुरू करण्यात आला असून यावरून दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून मजूर रोजगारासाठी अन्य राज्यात स्थलांतरित होत आहेत. *प्रमुख मागण्या :* १. जत तालुका त्वरित दुष्काळी म्हणून जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात. २. म्हैसाळ योजनेचे आवर्तन कायमस्वरूपी सुरू ठेवावे व बंदिस्त पाईपलाईनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. ३. गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे, वृक्ष लागवडीची कामे सुरू करावीत. ४. गरज असलेल्या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. ५. तालुक्यात सुरू असलेली बेकायदेशीर वृक्षतोड त्वरित थांबवावी. साळमळगेवाडी, जिरग्याळ रस्त्यावरील सुझलॉन कंपनीने केलेल्या मोठ्या झाडांच्या बेकायदेशीर वृक्षतोडीची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी. दररोज ४० ट्रक लाकूड तालुक्याबाहेर जात असून याचीही चौकशी व्हावी. शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले साहेब, जिल्हाधिकारी सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, पोलीस निरीक्षक जत, वनक्षेत्रपाल अधिकारी जत, तहसीलदार जत व गटविकास अधिकारी जत यांना पाठविण्यात आल्या आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    1
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    1
    विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे 
इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिवसेना नेते तथा अक्कलकोट तालुक्याचे दानशूर नेतृत्व मा. शंकर (मालक) म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुबारक कोरबू, आझम शेख, जी. अशपाक मुजावर, मजीद कोरबू आदी उपस्थित होते.
    1
    शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 
शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  करण्यात आला आहे.
शिवसेना नेते तथा अक्कलकोट तालुक्याचे दानशूर नेतृत्व मा. शंकर (मालक) म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मुबारक कोरबू, आझम शेख, जी. अशपाक मुजावर, मजीद कोरबू आदी उपस्थित होते.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद विक्रम शिंदे /भोर दि. 26 भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.
    1
    भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद 
विक्रम शिंदे /भोर दि. 26
भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
    1
    निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन.
निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. 
स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.
रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन
    1
    बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    1
    अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  पत्रकार परिषद..
बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना 
तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — ५ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवर इचलकरंजी पोलिसांची अरेरावी? खाकीच्या दादागिरीवर संताप! इचलकरंजीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत कथितरित्या झालेल्या ‘घाणेरड्या स्पर्शा’च्या गंभीर प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा, यासाठी आई पोलीस ठाण्यात धाव घेते; मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून कथितरित्या “आम्ही दखल घेणार नाही, कोर्टात जा” असे सांगण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या सुरक्षेचा आणि लैंगिक अत्याचाराच्या संशयाचा प्रश्न असताना, तक्रारदार महिलेची व्यथा ऐकून घेणे आणि कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करणे अपेक्षित असताना तिला थेट न्यायालयाचा मार्ग दाखवण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे. POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज असते. अशा संवेदनशील प्रकरणात पीडित बालक आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर पोलीस अधिकाऱ्याकडून अरेरावी झाली असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते. आई आपल्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर केवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीची सुरक्षितता आणि न्याय असतो. अशा वेळी खाकी वर्दीकडून तिला धीर, कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षणाची अपेक्षा असते. मात्र, तक्रारच ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप खरा असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्याने नेमके काय म्हटले, तक्रार घेण्यास नकार देण्यात आला का, घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया का सुरू झाली नाही आणि पीडित बालिकेच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलण्यात आली, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होईल; मात्र तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्या भूमिकेचीही चौकशी झालीच पाहिजे. बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा अरेरावी खपवून घेतली जाऊ नये. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी! विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चिमुकलीच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मदत मिळवून द्यावी. पाच वर्षांच्या लेकराच्या न्यायाचा प्रश्न आहे. हा प्रश्न दाबण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा आहे! खाकीचा मान राखायचा असेल तर आधी खाकीवरचा विश्वास कायम ठेवावा लागेल. #IchalkaranjiPolice #KolhapurPolice #JusticeForChild #POCSO #PoliceAccountability #KolhapurSP #IGPKolhapur #MaharashtraPolice #JusticeForVictim #ChildSafety
    1
    दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप
झुंजार S C 37 NEWS OSMANABAD
“दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप
झुंजार S C 37 NEWS OSMANABAD
“दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — ५ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवर इचलकरंजी पोलिसांची अरेरावी? खाकीच्या दादागिरीवर संताप!
इचलकरंजीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत कथितरित्या झालेल्या ‘घाणेरड्या स्पर्शा’च्या गंभीर प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा, यासाठी आई पोलीस ठाण्यात धाव घेते; मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून कथितरित्या “आम्ही दखल घेणार नाही, कोर्टात जा” असे सांगण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.
या कथित प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या सुरक्षेचा आणि लैंगिक अत्याचाराच्या संशयाचा प्रश्न असताना, तक्रारदार महिलेची व्यथा ऐकून घेणे आणि कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करणे अपेक्षित असताना तिला थेट न्यायालयाचा मार्ग दाखवण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे.
POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज असते. अशा संवेदनशील प्रकरणात पीडित बालक आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर पोलीस अधिकाऱ्याकडून अरेरावी झाली असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते.
आई आपल्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर केवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीची सुरक्षितता आणि न्याय असतो. अशा वेळी खाकी वर्दीकडून तिला धीर, कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षणाची अपेक्षा असते. मात्र, तक्रारच ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप खरा असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होतो.
या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्याने नेमके काय म्हटले, तक्रार घेण्यास नकार देण्यात आला का, घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया का सुरू झाली नाही आणि पीडित बालिकेच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलण्यात आली, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होईल; मात्र तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्या भूमिकेचीही चौकशी झालीच पाहिजे. बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा अरेरावी खपवून घेतली जाऊ नये.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी!
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चिमुकलीच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मदत मिळवून द्यावी.
पाच वर्षांच्या लेकराच्या न्यायाचा प्रश्न आहे. हा प्रश्न दाबण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा आहे!
खाकीचा मान राखायचा असेल तर आधी खाकीवरचा विश्वास कायम ठेवावा लागेल.
#IchalkaranjiPolice #KolhapurPolice #JusticeForChild #POCSO #PoliceAccountability #KolhapurSP #IGPKolhapur #MaharashtraPolice #JusticeForVictim #ChildSafety
    user_आप्पा भगवान सिरसाठे
    आप्पा भगवान सिरसाठे
    Newspaper publisher उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.