logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वाधार योजना अंतर्गत'सेंड बॅक अर्ज दुरुस्त करण्यासाठी शेवटची संधी.16 मार्चपर्यंत त्रुटी पूर्तता करा नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की स्वाधार योजना २०२५-२६ अंतर्गत मध्ये ज्या कोणाचे अर्ज सेंडबॅक मध्ये आले असतील तर १६ मार्चपूर्वी त्रुटींची पूर्तता करा, अन्यथा लाभमिळण्यात अडचण येईल ! " शिवानंद मीनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांची माहिती

1 day ago
user_Shuddhodhan Dhawale
Shuddhodhan Dhawale
Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
1 day ago

स्वाधार योजना अंतर्गत'सेंड बॅक अर्ज दुरुस्त करण्यासाठी शेवटची संधी.16 मार्चपर्यंत त्रुटी पूर्तता करा नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की स्वाधार योजना २०२५-२६ अंतर्गत मध्ये ज्या कोणाचे अर्ज सेंडबॅक मध्ये आले असतील तर १६ मार्चपूर्वी त्रुटींची पूर्तता करा, अन्यथा लाभमिळण्यात अडचण येईल ! " शिवानंद मीनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांची माहिती

More news from Maharashtra and nearby areas
  • नांदेड : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानने न्यूझीलंडला चारीमुंड्या चित करत विजेतेपद पटकावल्याचा आनंद नांदेडकरांनी जल्लोषात साजरा केला. अमरनाथ राजुरकर आणि धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून कुसुम सभागृहात मोठ्या पडद्यावर लावण्यात आलेला सामना पाहण्यासाठी शेकडो क्रीडारसिकांनी गर्दी केली होती. यावेळी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा नांदेड महानगरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मोफत अनुभवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मोठ्या पडद्यावरील प्रक्षेपणाची सुरुवात नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविण साले होते.यावेळी कुबेरनगरीचे सतीश सुगनचंदजी शर्मा, डॉ. सचिन उमरेकर, व्यंकटेश जिंदम, नगरसेवक आशिष नेरलकर व राजू यन्नम, बागड्या यादव, शिवप्रसाद राठी, धीरज स्वामी, तौसिफ अहमद, धनंजय नलबलवार, निलेश कुंटूरकर, चंचलसिंघ जट, राजन जोजारे, कर्मचारी नेते रामेश्वर वाघमारे, तहसीलदार रघुनाथसिंह चौहान, रुपेश व्यास, महेंद्र तरटे, राजेश देशमुख ,हरजिंदरसिंघ संधू,संतोष मानधनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक दिलीप ठाकूर, सुरेश लोट, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, प्रकाश उंटवाले, अरुण काबरा, सुरेश निल्लावार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सविता काबरा, स्नेहलता जायस्वाल, शिला जांभळे व रागिणी जोशी, सुषमा हुरणे यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित सर्व महिलांचे स्वागत माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन शीतल खांडील व लक्ष्मण खाडे यांनी केले. या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेल्या नांदेडच्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. नंदू कुलकर्णी यांच्या हस्ते आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये नांदेड भूषण ॲड. मिलिंद एकताटे, राजीव किवळेकर, सुधाकर पाढरे, शिवाजी डहाळे, रतन साडेगावकर, मंगेश कामतीकर, श्याम आडे, बालाजी गिरगावकर, रणजितसिंघ चिरागिया, परविंदरसिंघ रामगडीया,मोहनसिंघ रोडगी,राजू जाधव,रवी पाटील, शंकर नांदेडकर, शैलेश देशमुख, नरेंद्र पटवारी, राजा गायकवाड, प्रसन्न घोगरे, राम शेळके, सचिन चौहान, संतोष औंढेकर, वसंत साबळे यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश होता. अश्या प्रकारचा गौरव पहिल्यांदाच झाल्या मुळे खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. रमेश मेगदे यांनी पाठविलेला कृतज्ञता संदेशही यावेळी वाचून दाखविण्यात आला. तसेच कमलाकर बिरादार, नरेश दंडवते, करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, धनंजय कुलकर्णी, नकुल जैन,श्रीराम मोटरगे यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.तसेच दिलीप ठाकूर यांच्या विविध नव्वद उपक्रमात सहकार्य करणारे अन्नदाते व देणगीदारांच्या गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे १९९५ पासून ॲड. दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सामने नांदेडमध्ये मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्याची परंपरा सातत्याने जपत आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकाचे आठ आणि ट्वेंटी-२० विश्वचषकाचे दहा असे एकूण अठरा विश्वचषक स्पर्धांचे सामने त्यांनी मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित केले आहेत. २००७ व २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर तसेच २००७, २०२४ व २०२५ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी शहरात भव्य विजय रॅलीचे आयोजनही केले होते. रोमहर्षक अंतिम सामना पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्याने कुसुम सभागृह खचाखच भरले होते. भव्य आणि स्पष्ट प्रक्षेपणामुळे उपस्थितांना स्टेडियममध्ये बसल्याचा अनुभव मिळत होता. भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक चौकार-षटकाराला जोरदार दाद मिळत होती, तर न्यूझीलंडचे खेळाडू बाद होताच घोषणांनी सभागृह दणाणून जात होते. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी भांगडा करत आनंद साजरा केला. उपस्थितांनी दिलीप ठाकूर यांना खांद्यावर उचलून घोषणाबाजी केली. सामना संपल्यानंतर महेश देबडवार यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि शहरातून दुचाकी रॅली काढून तिरंगा हातात घेऊन उत्साहात जल्लोष करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, प्रभुदास वाडेकर, जगतसिंह ठाकूर, उमेश बडगे,गोपीचंद पांडागळे, सागर कळसकर,संभाजी बस्वदे यांनी परिश्रम घेतले. १९९५ पासून क्रीडारसिकांसाठी मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामने पाहण्याची मोफत सोय उपलब्ध करून देत असल्याबद्दल ॲड. दिलीप ठाकूर तसेच यावेळी पुढाकार घेतल्याबद्दल अमर राजुरकर यांचे क्रिकेटप्रेमींनी विशेष कौतुक केले.
    1
    नांदेड : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानने न्यूझीलंडला चारीमुंड्या चित करत विजेतेपद पटकावल्याचा आनंद नांदेडकरांनी जल्लोषात साजरा केला. अमरनाथ राजुरकर आणि धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून कुसुम सभागृहात मोठ्या पडद्यावर लावण्यात आलेला सामना पाहण्यासाठी शेकडो क्रीडारसिकांनी गर्दी केली होती. यावेळी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपा नांदेड महानगरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मोफत अनुभवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मोठ्या पडद्यावरील प्रक्षेपणाची सुरुवात नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविण साले होते.यावेळी कुबेरनगरीचे सतीश सुगनचंदजी शर्मा, डॉ. सचिन उमरेकर, व्यंकटेश जिंदम, नगरसेवक आशिष नेरलकर व राजू यन्नम, बागड्या यादव, शिवप्रसाद राठी, धीरज स्वामी, तौसिफ अहमद, धनंजय नलबलवार, निलेश कुंटूरकर, चंचलसिंघ जट, राजन जोजारे, कर्मचारी नेते रामेश्वर वाघमारे, तहसीलदार रघुनाथसिंह चौहान, रुपेश व्यास, महेंद्र तरटे, राजेश देशमुख ,हरजिंदरसिंघ संधू,संतोष मानधनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक दिलीप ठाकूर, सुरेश लोट, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, प्रकाश उंटवाले, अरुण काबरा, सुरेश निल्लावार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सविता काबरा, स्नेहलता जायस्वाल, शिला जांभळे व रागिणी जोशी, सुषमा हुरणे यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित सर्व महिलांचे स्वागत माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन शीतल खांडील व लक्ष्मण खाडे यांनी केले.
या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेल्या नांदेडच्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. नंदू कुलकर्णी यांच्या हस्ते आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये नांदेड भूषण ॲड. मिलिंद एकताटे, राजीव किवळेकर, सुधाकर पाढरे, शिवाजी डहाळे, रतन साडेगावकर, मंगेश कामतीकर, श्याम आडे, बालाजी गिरगावकर, रणजितसिंघ चिरागिया, परविंदरसिंघ रामगडीया,मोहनसिंघ  रोडगी,राजू जाधव,रवी पाटील, शंकर नांदेडकर, शैलेश देशमुख, नरेंद्र पटवारी, राजा गायकवाड, प्रसन्न घोगरे, राम शेळके, सचिन चौहान, संतोष औंढेकर, वसंत साबळे यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश होता. अश्या प्रकारचा गौरव पहिल्यांदाच झाल्या मुळे खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. रमेश मेगदे यांनी पाठविलेला कृतज्ञता संदेशही यावेळी वाचून दाखविण्यात आला. तसेच कमलाकर बिरादार, नरेश दंडवते, करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, धनंजय कुलकर्णी, नकुल जैन,श्रीराम मोटरगे यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.तसेच दिलीप ठाकूर यांच्या विविध नव्वद उपक्रमात सहकार्य करणारे अन्नदाते व देणगीदारांच्या गौरव करण्यात आला. 
विशेष म्हणजे १९९५ पासून ॲड. दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सामने नांदेडमध्ये मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्याची परंपरा सातत्याने जपत आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकाचे आठ आणि ट्वेंटी-२० विश्वचषकाचे दहा असे एकूण अठरा विश्वचषक स्पर्धांचे सामने त्यांनी मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित केले आहेत. २००७ व २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर तसेच २००७, २०२४ व २०२५ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी शहरात भव्य विजय रॅलीचे आयोजनही केले होते.
रोमहर्षक अंतिम सामना पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्याने कुसुम सभागृह खचाखच भरले होते. भव्य आणि स्पष्ट प्रक्षेपणामुळे उपस्थितांना स्टेडियममध्ये बसल्याचा अनुभव मिळत होता. भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक चौकार-षटकाराला जोरदार दाद मिळत होती, तर न्यूझीलंडचे खेळाडू बाद होताच घोषणांनी सभागृह दणाणून जात होते. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी भांगडा करत आनंद साजरा केला. उपस्थितांनी दिलीप ठाकूर यांना खांद्यावर उचलून घोषणाबाजी केली. सामना संपल्यानंतर महेश देबडवार यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि शहरातून दुचाकी रॅली काढून तिरंगा हातात घेऊन उत्साहात जल्लोष करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, प्रभुदास वाडेकर, जगतसिंह ठाकूर, उमेश बडगे,गोपीचंद पांडागळे, सागर कळसकर,संभाजी बस्वदे यांनी परिश्रम घेतले. १९९५ पासून क्रीडारसिकांसाठी मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामने पाहण्याची मोफत सोय उपलब्ध करून देत असल्याबद्दल ॲड. दिलीप ठाकूर तसेच यावेळी पुढाकार घेतल्याबद्दल अमर राजुरकर यांचे क्रिकेटप्रेमींनी विशेष कौतुक केले.
    user_Info news
    Info news
    Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • 🚩 पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिरात भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, भोकर, हदगांव तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव येथे २० मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान भव्य श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णाजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार असून विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन तसेच महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे. 🙏 #Himayatnagar #RamKatha #DattYagya #NamSankirtan #ReligiousEvent #Maharashtra #SpiritualProgram #Bhakti #SanatanDharma 🚩🙏
    1
    🚩 पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिरात भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩
हिमायतनगर, भोकर, हदगांव तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव येथे २० मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान भव्य श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णाजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार असून विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे.
भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन तसेच महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे. 🙏
#Himayatnagar #RamKatha #DattYagya #NamSankirtan #ReligiousEvent #Maharashtra #SpiritualProgram #Bhakti #SanatanDharma 🚩🙏
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • विश्वासघात ग्रस्त शेतकऱ्यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण उमरखेड :-PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने मुळावा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करून काढता पाय घेतला असल्यामुळे न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ९ मार्च २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मुळावा येथील रहिवासी शेतकरी १) शहाजी गंगाराम खडसे,२) भागोराव गंगाराम खडसे, ३) सुदाम गंगाराम खडसे या तिघा वयोवृद्ध भावांची मौजा हातला शिवारातील शेत सर्वे नंबर ६५ क्षेत्रफळ ४ हे ८६ आर या शेतजमिनीतून वरीलउल्लेख केलेल्या कंपनीने मुरूम (खडक) रेल्वे रस्त्याचे कामाकरिता उत्खनन करून नेण्याचा आणि त्या ऐवजी सदर शेतामध्ये २.५ ते ३ फुट काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला, करारनाम्याप्रमाणे कंपनीने सदर शेतातून मुरूम खडक नेला परंतु करारानुसार सदर शेत जमिनीमध्ये काळी माती टाकून देण्याचे टाळून काम अर्धवट सोडून दिनांक १८/०२/२०२६ चे मध्यरात्री कामावरची मशीन इत्यादी साहित्य घेऊन पळून गेला याबाबतीत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी तसेच महाराष्ट्र राज्याचे वि. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले असून अद्याप पर्यंत आमच्यावर झालेल्या विश्वासघाताची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याने न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या विकास कार्यात मदत करणाऱ्या वर होणाऱ्या अन्यायाला अधिकारी वाचा फोडतील का? विश्वासघात करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही होईल का? याकडे उपोषणकर्त्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
    2
    विश्वासघात ग्रस्त शेतकऱ्यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण 
उमरखेड :-PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने मुळावा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करून  काढता पाय घेतला असल्यामुळे न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ९ मार्च २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मुळावा येथील रहिवासी शेतकरी १) शहाजी गंगाराम खडसे,२) भागोराव गंगाराम खडसे, ३) सुदाम गंगाराम खडसे या तिघा वयोवृद्ध भावांची मौजा हातला शिवारातील शेत सर्वे नंबर ६५ क्षेत्रफळ ४ हे ८६ आर या शेतजमिनीतून वरीलउल्लेख केलेल्या कंपनीने मुरूम (खडक) रेल्वे रस्त्याचे कामाकरिता उत्खनन करून नेण्याचा आणि त्या ऐवजी सदर शेतामध्ये २.५ ते ३ फुट काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला, करारनाम्याप्रमाणे कंपनीने सदर शेतातून मुरूम खडक नेला परंतु करारानुसार सदर शेत जमिनीमध्ये काळी माती टाकून देण्याचे टाळून काम अर्धवट सोडून दिनांक १८/०२/२०२६ चे मध्यरात्री कामावरची मशीन इत्यादी साहित्य घेऊन पळून गेला याबाबतीत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी तसेच महाराष्ट्र राज्याचे वि. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले असून अद्याप पर्यंत आमच्यावर झालेल्या विश्वासघाताची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याने न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या विकास कार्यात मदत करणाऱ्या वर होणाऱ्या अन्यायाला अधिकारी वाचा फोडतील का? विश्वासघात करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही होईल का? याकडे उपोषणकर्त्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद
    1
    महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    1
    शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन; गणवेश,भत्ते व वेळेवर पगाराची मागणी
    1
    जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन; गणवेश,भत्ते व वेळेवर पगाराची मागणी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर
    1
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.