logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भारतीय हवामान खात्याच्या (#IMD) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे 📢नागरिकांसाठी सूचना : 🔶विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. 🔶झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. 🔶मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. 🔶निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे. 🔶शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. 🔶बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. 🔶यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करावे. 🔶नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे. प्रशासनासाठी उपाययोजना : 🔷ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी. 🔷रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. 🔷शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात. 🔷हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.

9 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
9 hrs ago
ecd87456-7858-429b-a3b6-04459e08d044

भारतीय हवामान खात्याच्या (#IMD) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे 📢नागरिकांसाठी सूचना : 🔶विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. 🔶झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. 🔶मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. 🔶निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे. 🔶शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. 🔶बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. 🔶यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करावे. 🔶नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे. प्रशासनासाठी उपाययोजना : 🔷ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी. 🔷रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. 🔷शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात. 🔷हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.

More news from Nashik and nearby areas
  • Post by Anand Gangurde
    4
    Post by Anand Gangurde
    user_Anand Gangurde
    Anand Gangurde
    Nashik, Nashik•
    7 hrs ago
  • नाशिक: दिंडोरी-निफाड येथे खासदार भास्कर भगरे यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून केंद्र सरकारवर टीका केली. २०२३ मध्ये मंजूर झालेला ‘नारीशक्ती वंदन’ कायदा अद्याप लागू न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध असल्याचा आरोप त्यांनी फेटाळत, “आमचा कधीच विरोध नव्हता; केंद्राने तातडीने कायदा लागू करावा, आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ,” असे स्पष्ट केले. जनगणना व मतदारसंघ फेररचनेशी अंमलबजावणी जोडून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
    1
    नाशिक: दिंडोरी-निफाड येथे खासदार भास्कर भगरे यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून केंद्र सरकारवर टीका केली. २०२३ मध्ये मंजूर झालेला ‘नारीशक्ती वंदन’ कायदा अद्याप लागू न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध असल्याचा आरोप त्यांनी फेटाळत, “आमचा कधीच विरोध नव्हता; केंद्राने तातडीने कायदा लागू करावा, आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ,” असे स्पष्ट केले. जनगणना व मतदारसंघ फेररचनेशी अंमलबजावणी जोडून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 👉में निधि कुमारी ; हम अपने होश हवास में बोल रही हूँ की मेरे गार्जियन मेरे मर्जी बगैर कही और एक उम्रदराज लड़का के साथ शादी करवा रही थी जिसके वजह से हम अपने मर्जी से घर से निकल कर इस लड़का के साथ खुशहाल शादी कर लिए है और हम जहां भी है इसके साथ खुश है और इसके बारे में हम अपने गार्जियन को कुछ दिन पहले जानकारी भी दिए थे अगर इस लड़का को या इसके परिवार को किसी भी प्रकार के दबाव दिया जाता है तो इसका जिम्मेवार मेरे परिवार और इसमें शामिल मेरे रिश्तेदार होगे !!
    1
    👉में निधि कुमारी ; हम अपने होश हवास में बोल रही हूँ की मेरे गार्जियन मेरे मर्जी बगैर कही और एक उम्रदराज लड़का के साथ शादी करवा रही थी जिसके वजह से हम अपने मर्जी से घर से निकल कर  इस लड़का के साथ खुशहाल शादी कर लिए है और हम जहां भी है इसके साथ खुश है और इसके बारे में हम अपने गार्जियन को कुछ दिन पहले जानकारी भी दिए थे अगर इस लड़का को या इसके परिवार को  किसी भी प्रकार के दबाव  दिया जाता है तो इसका जिम्मेवार  मेरे परिवार और इसमें शामिल मेरे रिश्तेदार होगे !!
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • लवकर पोहोचावे आणि वेळ वाचावा या अनुशंगाने विमानाने प्रवास करणं सोयीचं म्हणून लोक हा प्रवास करणं पसंत करतात. मात्र हाच विमान प्रवास जीवावर बेततो की काय ही अशी भीती प्रवाशांना होती. ४ तासांचा थरार प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तुम्ही विमानात बसला आहात आणि अचानक वैमानिक सांगतो की विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान खाली उतरू शकत नाही. तासनतास आकाशातच घिरट्या घालत आहे. ऐकूनच प्रवाशांचा अंगावर काटा आला. विमानात गोंधळाचं वातावरण होतं. Fly91 एअरलाईन्सच्या प्रवाशांनी विमानातच आरडाओरडा सुरू केला. काहींना तर अक्षरश: रडू कोसळलं. तब्बल ४ तास हे विमान आकाशात फिरत होतं आणि आत बसलेले प्रवासी जीवाच्या आकांताने रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३ वाजता Fly91 च्या IC3401 या विमानाने हुबळीसाठी उड्डाण केलं. सर्व काही सुरळीत होतं, संध्याकाळी ४:३० वाजता विमान लँड होणार होतं. पण लँडिंगच्या काही मिनिटं आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जातंय असं वैमानिकाला वाटलं आणि त्यामुशे त्याने लॅण्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन नाही तर 4 तास विमान आकाशात फिरत होतं. विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि इंधनही संपवायचं होतं. यामुळे तब्बल ४ तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागांत आकाशातच घिरट्या घालत राहिलं. विमानातील इंधन कमी करून सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिक प्रयत्न करत होते. खूप मोठी रिस्क होती पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. विमानातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता काही खरं नाही असं वाटत असल्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते. काही प्रवासी ढसाढसा रडत होते, काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. ४ तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही? हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी प्रार्थना करत होते. अखेर वैमानिकांनी मोठ्या शिताफीने विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवलं. तिथे संध्याकाळी ७:३० वाजता विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. धावपट्टीवर विमान टेकताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काहींनी तर जमिनीला स्पर्श करताच ढसाढसा रडायला सुरुवात केली. एकीकडे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, एअरलाईन्सने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संवाद नसणे आणि माहिती लपवणे यामुळे प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. विमानात काय तांत्रिक बिघाड झाला याचा तपास केला जात आहे. याशिवाय वैमानिकांची देखील चौकशी केली जाणार आहे. वैमानिकाने कौशल्य दाखवून सुरक्षित लॅण्डिंग केलं. मात्र एक चुकीचा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे वैमानिकाचं कौतुक होत आहे. पण हे नेमकं कशामुळे घडलं, यामागे कारण काय होतं याचा तपास केला जात आहे.
    1
    लवकर पोहोचावे आणि वेळ वाचावा या अनुशंगाने विमानाने प्रवास करणं सोयीचं म्हणून लोक हा प्रवास करणं पसंत करतात. मात्र हाच विमान प्रवास जीवावर बेततो की काय ही अशी भीती प्रवाशांना होती.
४ तासांचा थरार प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तुम्ही विमानात बसला आहात आणि अचानक वैमानिक सांगतो की विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान खाली उतरू शकत नाही. तासनतास आकाशातच घिरट्या घालत आहे. ऐकूनच प्रवाशांचा अंगावर काटा आला. विमानात गोंधळाचं वातावरण होतं.
Fly91 एअरलाईन्सच्या प्रवाशांनी विमानातच आरडाओरडा सुरू केला. काहींना तर अक्षरश: रडू कोसळलं. तब्बल ४ तास हे विमान आकाशात फिरत होतं आणि आत बसलेले प्रवासी जीवाच्या आकांताने रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३ वाजता Fly91 च्या IC3401 या विमानाने हुबळीसाठी उड्डाण केलं. सर्व काही सुरळीत होतं, संध्याकाळी ४:३० वाजता विमान लँड होणार होतं. पण लँडिंगच्या काही मिनिटं आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जातंय असं वैमानिकाला वाटलं आणि त्यामुशे त्याने लॅण्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन नाही तर 4 तास विमान आकाशात फिरत होतं.
विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि इंधनही संपवायचं होतं. यामुळे तब्बल ४ तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागांत आकाशातच घिरट्या घालत राहिलं. विमानातील इंधन कमी करून सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिक प्रयत्न करत होते. खूप मोठी रिस्क होती पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. विमानातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आता काही खरं नाही असं वाटत असल्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते. काही प्रवासी ढसाढसा रडत होते, काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. ४ तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही? हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी प्रार्थना करत होते.
अखेर वैमानिकांनी मोठ्या शिताफीने विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवलं. तिथे संध्याकाळी ७:३० वाजता विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. धावपट्टीवर विमान टेकताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काहींनी तर जमिनीला स्पर्श करताच ढसाढसा रडायला सुरुवात केली. एकीकडे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, एअरलाईन्सने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संवाद नसणे आणि माहिती लपवणे यामुळे प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला.
विमानात काय तांत्रिक बिघाड झाला याचा तपास केला जात आहे. याशिवाय वैमानिकांची देखील चौकशी केली जाणार आहे. वैमानिकाने कौशल्य दाखवून सुरक्षित लॅण्डिंग केलं. मात्र एक चुकीचा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे वैमानिकाचं कौतुक होत आहे. पण हे नेमकं कशामुळे घडलं, यामागे कारण काय होतं याचा तपास केला जात आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Changdev Barge
    1
    Post by Changdev Barge
    user_Changdev Barge
    Changdev Barge
    राहाता, अहमदनगर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ​येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. ​नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. ​सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला
    1
    ​येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत.
​नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे.
​सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Subhash Suryavanshi
    1
    Post by Subhash Suryavanshi
    user_Subhash Suryavanshi
    Subhash Suryavanshi
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ठाणे:शहापूर तालुक्यातील आधार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी, वन हक्क दावे आणि तीव्र पाणी टंचाई यांसारख्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, श्रमजीवी संघटना आणि विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत महसूल, ग्रामविकास, वन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी, तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनातर्फे एक कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात आला. या बैठकीत प्रामुख्याने आधारकार्ड नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असल्याने, येथील आदिम कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून तातडीने 'आधार कॅम्प' लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, मे महिन्यापर्यंत सर्व पात्र व्यक्तींचे आधार अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. वन हक्क दाव्यांच्या संदर्भातही बैठकीत कडक पवित्रा घेण्यात आला. तालुक्यातील साधारण २५० दावे ग्रामपंचायत आणि महसूल स्तरावर, तर ७०० हून अधिक दावे वनविभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांची पुढील १५ दिवसांत सखोल पडताळणी करून ती मंजुरीसाठी उपविभागीय समितीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तालुक्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेमार्फत 'वॉटर स्कॅर्सिटी मॅपिंग' करून टँकर पुरवठा आणि नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही पाड्याला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शहापूरचे गटविकास अधिकारी बाबुराव राठोड यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे आधार कार्ड, वन हक्क दावे आणि पाणी टंचाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आम्ही सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार केला असून मे महिन्यापर्यंत आधार नोंदणी पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल." या बैठकीला तहसीलदार परमेश्वर कासुले, गट विकास अधिकारी बाबुराव राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (ITDP) महेश कवडे, वनपरिक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले, विस्तार अधिकारी एन. एच. पाटील, विलास जाधव, बी. आर. वाघचौरे, दिनेश घोलप, यशवंत धोत्रे आणि जी. के. ठिकामे आणि सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्य संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, निरीक्षक लक्ष्मण चौधरी, सचिव प्रकाश खोडका, उपाध्यक्ष रुपेश आहिरे, विशाल मुकणे, दर्शना आगिवले, संघटक कैलास मुकणे, महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, महिला सचिव कल्पना वाघ, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे आणि माजी कातकरी प्रमुख संजय मुकणे यांनी उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
    1
    ठाणे:शहापूर तालुक्यातील आधार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी, वन हक्क दावे आणि तीव्र पाणी टंचाई यांसारख्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, श्रमजीवी संघटना आणि विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत महसूल, ग्रामविकास, वन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी, तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनातर्फे एक कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात आला.
या बैठकीत प्रामुख्याने आधारकार्ड नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असल्याने, येथील आदिम कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून तातडीने 'आधार कॅम्प' लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, मे महिन्यापर्यंत सर्व पात्र व्यक्तींचे आधार अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. वन हक्क दाव्यांच्या संदर्भातही बैठकीत कडक पवित्रा घेण्यात आला. तालुक्यातील साधारण २५० दावे ग्रामपंचायत आणि महसूल स्तरावर, तर ७०० हून अधिक दावे वनविभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांची पुढील १५ दिवसांत सखोल पडताळणी करून ती मंजुरीसाठी उपविभागीय समितीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
तालुक्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेमार्फत 'वॉटर स्कॅर्सिटी मॅपिंग' करून टँकर पुरवठा आणि नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही पाड्याला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शहापूरचे गटविकास अधिकारी बाबुराव राठोड यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे आधार कार्ड, वन हक्क दावे आणि पाणी टंचाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आम्ही सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार केला असून मे महिन्यापर्यंत आधार नोंदणी पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल."
या बैठकीला तहसीलदार परमेश्वर कासुले, गट विकास अधिकारी बाबुराव राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (ITDP) महेश कवडे, वनपरिक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले, विस्तार अधिकारी एन. एच. पाटील, विलास जाधव, बी. आर. वाघचौरे, दिनेश घोलप, यशवंत धोत्रे आणि जी. के. ठिकामे आणि सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्य संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, निरीक्षक लक्ष्मण चौधरी, सचिव प्रकाश खोडका, उपाध्यक्ष रुपेश आहिरे, विशाल मुकणे, दर्शना आगिवले, संघटक कैलास मुकणे, महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, महिला सचिव कल्पना वाघ, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे आणि माजी कातकरी प्रमुख संजय मुकणे यांनी उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.