हिंगणगाव येथे पोटपोट पाईपमध्ये अडकुन बुडून तीन जणांचा मृत्यु फलटण : हिंगणगाव ता. फलटण गावचे हद्दीत खानविलकर फार्मजवळ हिंगणगाव ते आदर्की जाणारे रस्त्याखालुन कॅनॉलचे पाणी घेवुन जाणेसाठी असणा-या पोटपाटाचे सिमेंटचे पाईपमध्ये असलेल्या पाण्यामध्ये अडकुन बुडुन प्रिमियम चिक फिड प्रा.लि. सुळवस्ती, हिंगणगाव ता. फलटण या कंपनीतील ३ मजुरांचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मृत्यु पावलेल्या मजुरांमध्ये ज्योर्तिमय भगिरथी नाईक (वय २२ वर्षे, सध्या रा. प्रिमियम चिक फिड प्रा. लि. सुळवस्ती, हिंगणगाव, ता. फलटण मुळ रा. गिधीबास, बरिया, केंदुझार, ओरिसा), सतिन बिरची नाईक (वय ३५ वर्षे, सध्या रा. प्रिमियम चिक फिड प्रा.लि. सुळवस्ती, हिंगणगाव, ता. फलटण, मुळ रा. उखेपाल, ता. जरक, जि. मयुरभंज राज्य ओरिसा), श्रीराम जगाई हेबरंम (वय २० वर्षे, सध्या रा. प्रिमियम चिक फिड प्रा.लि. सुळवस्ती, हिंगणगाव, ता. फलटण मुळ रा. चिकाडी, जि. मुयरभंज, राज्य ओरिसा) अशी त्यांची नावे आहेत. हिंगणगाव ता फलटण येथील सुळवस्ती येथे असलेल्या प्रिमियम चिक फिड प्रा.लि.कंपनीतील पोल्ट्री फार्मवर कामाला असलेले मजुर जवळच असलेल्या खानविलकर फार्म हाऊस जवळ असलेल्या हिंगणगाव ते आदर्की जाणारे डांबरी रोडच्या खालुन धोम - बलकवडी कालव्यावरून येणाऱ्या पोटपाटाच्या पाण्यामध्ये गेले असताना सिमेंटच्या पाईपजवळ पाण्यामध्ये बुडाल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन वरून मिळाली. त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली असता पोटपाटाच्या सिमेंटचे पाईपच्या एका बाजुला पाण्यात कंपनीतील ज्योतिर्मय भगिरथी नाईक हा मजुर निपचित पडलेला होता. त्याची माहिती लोणंद पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे व त्यांचे सहकारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कंपनीतील आणखी दोन मजुर कामाला आले नसल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी जेसीबी बोलवुन पाईपमधुन जाणारे पाणी दुसऱ्या दिशेने वळविण्यात आले. त्यानंतर सिमेंटचे पाईपमध्ये पाहिले असता आणखी दोन जण पाईपमध्ये असल्याचे दिसुन आले त्यांना बाहेर काढले असता सतिन बिरची नाईक व श्रीराम जगाई हेवरंम हे मजुर असल्याचे दिसुन आले. तिघेही मजुर निपचित अवस्थेत होते. त्यांनंतर खाजगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन त्यांचा मयत झाल्याचे सांगितले. याबाबतची फिर्याद शाम बाळु भगत (वय ३९ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, सध्या रा. सुळवस्ती, हिंगणगाव, ता. फलटण, जि. सातारा मुळ रा. मु.पो. पुसदा, ता. जि. अमरावती) यांनी लोणंद पोलिसात दिली असून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय रोहित हेगडे करीत आहेत.

- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.1
- पिंपरी चिंचवड :- आकुर्डी येथील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना, कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे... आरटीई प्रवेशासाठी १५ ते २२ एप्रिल हा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. या अल्प मुदतीत कागदपत्रे पडताळणे आवश्यक असताना, शाळेतील कर्मचारी पालकांना उन्हात ताटकळत ठेवून अचानक निघून गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा केली की, जर वेळेत पडताळणी झाली नाही आणि मुलांचे वर्ष वाया गेले, तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आकुर्डीतील गैरसोयीची माहिती मिळताच जादा कर्मचारी पाठवले असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुदत संपण्यापूर्वी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित व्हावा, यासाठी पालकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची मागणी होत आहे... #आकुर्डी #पिंपरीचिंचवड #आरटीईप्रवेश #शिक्षणविभाग #पालकांचा_संताप #प्रशासनाचा_गोंधळ #उन्हातहाल #शाळाप्रवेश #विद्यार्थीप्रश्न #RTEगोंधळ #Akurdi #PimpriChinchwad #RTEAdmission #EducationDepartment #ParentsProtest #AdministrativeFailure #SchoolAdmission #StudentIssues #RTEProcess #BreakingNews1
- कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.3
- पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.1
- पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.1
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आज एका भरधाव थार जीप आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेत एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आणि थार कारची जोरात धडक झाली. याच दरम्यान एक दुचाकीस्वारही या अपघाताच्या कचाट्यात सापडला. अपघाताचा आवाज ऐकताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात रुग्णवाहिकेचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला गेला असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास रावेत पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे....2
- पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक1
- Lucknow mein Aag lagne ke Karan Bhari nuksan aur hua Hai1