गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम पुणे : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यात ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात या उपक्रमाचे महानगरासह तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. *विविध विभागांच्या योजनांची माहिती* प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व मानाच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ‘लोकसंवाद-२०२६’मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण आदी विभागांसह सर्वच विभागांचा सहभाग असणार आहे. शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी औजारांसाठी अनुदान, महिला बचत गट तसेच महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती योजना सवलती यासह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी, औषधोपचार व शिष्यवृत्तीशी संबंधित सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती आदी संस्थांच्या योजनांबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे. *आंतरविभागीय समन्वयावर भर* ‘लोकसंवाद-२०२६’ प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, पणन, कौशल्य विकास, सामाजिक न्याय तसेच पोलीस विभागासह संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ प्रत्यक्ष गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांना थेट आणि अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे. *कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी* शक्य असेल तेथे कार्यक्रमांचे फेसबुक किंवा युट्यूब लाईव्ह करण्यात येणार असून, सोशल मीडियावर #गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंतही योजनांची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्या गणेश मंडळांना या कार्यक्रमात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयांकडून करण्यात आले आहे.

- गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल1
- यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार; गुन्हा दाखल करण्याची नगराध्यक्षा छाया शेलार यांची मागणी हा माझा नव्हे, संविधान, लोकशाही आणि कर्जतकरांचा अपमान”; पत्रकार परिषदेत छाया शेलार आक्रमक कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा प्रकार हा केवळ व्यक्तीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेचा, संविधानाने प्रदान केलेल्या पदाचा आणि समस्त कर्जतकर जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. छाया सुनील शेलार यांनी केली. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. निधीच्या विषयाला राजकीय रंग दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राप्त निधी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या वस्ती तसेच राखीव प्रभागासाठी खर्च करण्यात येत आहे. मात्र, या विषयाला जाणूनबुजून राजकीय रंग देऊन नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मला कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. माझ्याकडे या विषयाची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून अवमान करण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग असताना अशा प्रकारे पदाचा अवमान करणे योग्य नाही,” असे शेलार यांनी सांगितले. “खुर्चीचा अवमान म्हणजे पदाचा अवमान” “नगराध्यक्षा हे शहराचे प्रथम नागरिक पद आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान हा केवळ माझा वैयक्तिक अपमान म्हणून पाहता येणार नाही. हा संविधानिक लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेलार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गटनेते सतिश पाटील, नगरसेविका अश्विनी दळवी,लालासाहेब शेळके, दत्ता पिसाळ, रवी सुपेकर,नंदकुमार भैलुमे, सुनील शेलार उपस्थित होते.3
- खासदारांच्या ताफ्याला अडथळा आणल्याच्या आरोपावरून पुणेकराविरुद्ध गुन्हा; युवक काँग्रेसचा सवाल1
- मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews1
- बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.1