Shuru
Apke Nagar Ki App…
अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पैशांचा पाऊस? पैसे देऊन टेंडर दिल्याचा गंभीर आरोप; PMC निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पैशांचा पाऊस? पैसे देऊन टेंडर दिल्याचा गंभीर आरोप; PMC निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक1
- जिजाऊ लेकी आक्रमक मराठा छत्रपती महाराष्ट्र विरोधी टकले सेनेचे पदाधिकारी यांना रक्षाबंधनावर एक डजन बांगड्या लिपस्टिक भेट महाराष्ट्र : मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ’च्या काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, छत्रपती जिजाऊसाहेबांच्या लेकींच्या विरोधात तसेच महाराष्ट्राच्या हिताविरोधात काम केले जात असल्याचा दावा ‘मराठ्यांच्या लेक शिवशंभू कन्या’च्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक नकाशा हटविण्याच्या कथित प्रयत्नांसंदर्भात संबंधितांनी राजस्थानमध्ये जाऊन बैठक घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या बैठकीमागे महाराष्ट्रविरोधी कटकारस्थान असल्याचा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपतींच्या वंशजांची बदनामी करण्याचे काम संबंधितांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या गटाला ‘टकले सेना’ असे संबोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या कथित बैठकांसाठी किंवा अन्य कारणांसाठी ५० कोटी रुपये मिळाल्याची शंकाही आरोपकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा स्वतंत्र पुष्टी सध्या समोर आलेली नाही. या सर्व आरोपांबाबत संबंधित संघटनेची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध केले जाणे आवश्यक आहे. आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे असून, ऐतिहासिक वारसा आणि मराठा समाजाशी संबंधित संवेदनशील विषय असल्याने वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारेच पुढील भूमिका निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं? Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं? watch full video1
- जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..! हिंजवडी पुणे : चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र... हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. कुठे तासन्तास वाहतूक कोंडी... कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे... तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका... याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय. एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का? हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत. हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..? की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार? याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय... त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही... प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा! आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..? #Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन1
- "त्या देशातून आपल्याला पैसाही परत आणता येत नाही...; लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो..!"1
- * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा.. शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार, ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे, राजेंद्र गावडे, प्रितम पाटील, बाळासाहेब म्हस्के, मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे, नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.” “एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.” खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. > *विशेष चौकट* > > *खिदमत फाउंडेशन, शिरूर* > > *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*1
- अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पैशांचा पाऊस? पैसे देऊन टेंडर दिल्याचा गंभीर आरोप; PMC निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!1
- वाकडमध्ये हुंडाबळीचा धक्कादायक आरोप; शिल्पा गवारे यांचं टोकाचं पाऊल, भाऊ संतोष कलाटेंचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश!1