नायगाव मयूर अभयारण्यात वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार सुरेश आण्णा धस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक..! ------ नायगाव मयूर अभयारण्य (वन्यजीव), ता. पाटोदा येथे उपवनसंरक्षक कुलकर्णी मॅडम व वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे साहेब यांच्या समवेत वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रातील दहा गावांतील प्रमुख पदाधिकारी, शेतकरी व नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुरेश आण्णा धस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या ग्लिरीसिडिया (Gliricidia) या वृक्षामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वृक्षामुळे मोर, हरीण, ससा, कोल्हा व इतर वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर विपरीत परिणाम होत असून, झाडाखाली गवत, वेली व स्थानिक वनस्पतींची वाढ होत नसल्याने जैवविविधतेलाही मोठा फटका बसत आहे. तसेच परिसरात दुर्गंधी, डासांची वाढ आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. या वर उपाय म्हणून वन विभागाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने ग्लिरीसिडिया वृक्षांचे निर्मूलन करून त्यांच्या जागी औषधी वनस्पती, स्थानिक वनझाडे, फळ झाडे, फुल झाडे तसेच वन्यजीवांना पोषक वृक्षप्रजातींची लागवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या सोबतच जलसंधारणाची कामे, झाडांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था आणि वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची निर्मिती करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. या वेळी नायगाव, पिठ्ठी, निरगुडी, धस पिंपळगाव, मांडवेवाडी, नाळवंडी, भाटेवाडी, गुजरवस्ती, मळेकरवाडी, रायतेवस्ती, मिसाळवाडी, खडकवाडी आदी गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी वन विभागाच्या हद्दीमुळे प्रभावित होत असलेल्या शेतातील पाईपलाईन, वस्ती रस्ते आणि खाजगी मालकीच्या जमिनींसंदर्भातील अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, या साठी वन विभागाने आवश्यक समन्वय साधून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी या वेळी केली. वन्यजीवांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा समतोल राखत नायगाव मयूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
नायगाव मयूर अभयारण्यात वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार सुरेश आण्णा धस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक..! ------ नायगाव मयूर अभयारण्य (वन्यजीव), ता. पाटोदा येथे उपवनसंरक्षक कुलकर्णी मॅडम व वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे साहेब यांच्या समवेत वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रातील दहा गावांतील प्रमुख पदाधिकारी, शेतकरी व नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुरेश आण्णा धस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या ग्लिरीसिडिया (Gliricidia) या
वृक्षामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वृक्षामुळे मोर, हरीण, ससा, कोल्हा व इतर वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर विपरीत परिणाम होत असून, झाडाखाली गवत, वेली व स्थानिक वनस्पतींची वाढ होत नसल्याने जैवविविधतेलाही मोठा फटका बसत आहे. तसेच परिसरात दुर्गंधी, डासांची वाढ आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. या वर उपाय म्हणून वन विभागाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने ग्लिरीसिडिया वृक्षांचे निर्मूलन
करून त्यांच्या जागी औषधी वनस्पती, स्थानिक वनझाडे, फळ झाडे, फुल झाडे तसेच वन्यजीवांना पोषक वृक्षप्रजातींची लागवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या सोबतच जलसंधारणाची कामे, झाडांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था आणि वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची निर्मिती करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. या वेळी नायगाव, पिठ्ठी, निरगुडी, धस पिंपळगाव, मांडवेवाडी, नाळवंडी, भाटेवाडी, गुजरवस्ती, मळेकरवाडी, रायतेवस्ती, मिसाळवाडी, खडकवाडी आदी गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी वन विभागाच्या हद्दीमुळे प्रभावित होत असलेल्या
शेतातील पाईपलाईन, वस्ती रस्ते आणि खाजगी मालकीच्या जमिनींसंदर्भातील अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, या साठी वन विभागाने आवश्यक समन्वय साधून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी या वेळी केली. वन्यजीवांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा समतोल राखत नायगाव मयूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे1
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली अहिल्यानगर साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. *आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी* आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.1
- दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी1
- सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर.. प्रेस नोट *सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* *११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ* *प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार* सिल्लोड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. ------------- प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ---------- नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले. ------ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान, अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.1
- पार्किंगच्या वादातून पैठण गेटमध्ये तुफान राडा; एकाच कॉलवर टोळके जमले, दुकानात घुसून हाणामारी छत्रपती संभाजीनगर... ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात दोन गट आमनेसामने येत दुकानात घुसून तुंबळ हाणामारी केली. एका कॉलनंतर मोठे टोळके घटनास्थळी पोहोचल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे, या घटनेत कोणताही पक्ष तक्रार देण्यास पुढे आला नाही. त्यामुळे सिटी चौक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पार्किंगवरून सुरू झालेला हा वाद पुन्हा उफाळून थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असून, प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल असगर शेख करत आहेत.1