खाटूश्यामजीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी रेल्वेचा शिर्डी-बिकानेर साप्ताहिक गाडीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय खाटूश्यामजीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी रेल्वेचा शिर्डी-बिकानेर साप्ताहिक गाडीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय प्रतिनिधी जालना मध्य रेल्वे प्रशासनाने भाविकांच्या वाढत्या मागणीचा विचार करून साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ०४७१५ बिकानेर–साईनगर शिर्डी आणि ०४७१६ साईनगर शिर्डी–बिकानेर या गाड्यांच्या फेऱ्या अनुक्रमे ११ जुलै २०२६ आणि १२ जुलै २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. ही सेवा महाराष्ट्रातील साईनगर शिर्डी ते राजस्थानमधील बिकानेर दरम्यान चालते. या विस्तारित कालावधीत दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी १५ फेऱ्या होतील. या मार्गावर मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, उज्जैन, कोटा, जयपूर आणि रिंगससारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. शिर्डी येथील साईबाबा आणि खाटूश्याम मंदिरासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. प्रवासी, पर्यटक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि नियोजनबद्ध होणार आहे.

- आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.1
- शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस,गावकऱ्यानी गुलाल उधळून केले जंगी स्वागत... भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील कु. शितल नाना मोरे यवतमाळ येथे महाराष्ट्र महिला पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी, महिला, पुरुषानी मोठ्या उत्साहाने पेढे वाटून,गुलाल उधळत जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक पांडुरंग साबळे,दिलीप काकाराव साबळे, बालु मोरे, भागवत साबळे, सचिन मोरे, पंढरी साबळे,समाधान कोलते, निवृत्ती साबळे, संतोष साबळे, सौ. संगीता दिलीप साबळे,सौ. कविता बाळू मोरे यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती1
- जालन्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाउद्दीन यांनी आज आपल्या असंख्य मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. सलाउद्दीन यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे1
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.1
- पाथरी येथील शाहुनगर आणि शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. #maxparbhani #पाथरी #परभणी #म्हाराष्ट्रा #facebook1
- नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..1
- Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat1
- घनसावंगी - हनुमान जयंतीनिमित्त भव्य कुस्ती दंगल ! हनुमान जयंतीनिमित्त घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.1