सहकार, पणन विभाग) सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. १५ सप्टेंबर, २०२६ मंत्रिमंडळ निर्णय (सहकार, पणन विभाग) सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना थकीत एफआरपी, गाळप हंगाम पूर्वतयारीसाठी मिळणार निधी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २०२५-२६ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि आगामी २०२६-२७च्या गाळप हंगामातील पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता सॉफ्ट लोन योजनेस आणि त्यासाठीच्या अंदाजित ७३८.५१ कोटी रुपयांच्या व्याज अनुदानास आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात २०२५-२६ मधील गाळप हंगामात १०२ सहकारी साखर कारखान्यांनी ५२७.५१ लाख मे.टन ऊस गाळप केले आहे. मात्र साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि पुढील हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. त्यानुसार या योजनेस मान्यता देण्यात आली. यापूर्वी २०१५ व २०१९ मध्ये सॉफ्ट लोन योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांमध्ये वित्तीय संस्थांनी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जासाठी व्याज अनुदान देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या २०१५ मधील योजनेत राज्य शासनाने सहभाग गेतला होता. यामध्ये केंद्र सरकारने एक वर्षाचे तर राज्य शासनाने त्यापुढील चार वर्षांकरिता द.सा.स.शे १० टक्के किंवा बँकेच्या प्रत्यक्ष व्याजदरापेक्षा जो कमी असेल त्यानुसार व्याज अनुदान दिले होते. या योजनेच्या धर्तीवर ही सॉफ्ट लोन योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पुढील सात वर्षांसाठी येणाऱ्या सुमारे ७३८ कोटी ५१ लाख रुपयांच्या व्याज अनुदानासही मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत बँकांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मंजुरी व वितरित केलेली रक्कम व्याज अनुदानास पात्र राहील. योजनेत मंजुरी झालेल्या कर्जाचा विनियोग प्रामुख्याने थकीत एफआरपीची रक्कम आदा करण्यास बंधनकारक असेल. थकीत रक्कम नसणा-या कारखान्यांना योजनेतील कर्जाचा वापर २०२६-२७ मधील पूर्वहंगामी कर्जासाठी करता येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी एक ऑक्टोबर २०२६ पासून पुढील सात वर्षांसाठी असेल; आणि याच कालावधीसाठी व्याज अनुदान देय राहील. द.सा.द.शे. १० टक्के किंवा बँकेकडून आकारण्यात येणारा व्याजदर यापैकी जो दर कमी असेल त्यानुसार व्याज अनुदान देण्यात येईल. त्याचबरोबर कर्जाचा हफ्ता वेळेत न भरणाऱ्या साखर कारखान्यांना या योजनेतून तत्काळ वगळण्यात येईल आणि अशा कारखान्यांना पुढील कालावधीसाठी व्याज सवलत मिळणार नाही. यासाठी साखर कारखान्यांना जुलै २०२७ पर्यंत कर्जाबातचा विनियोग दाखला सादर करावा लागणार आहे. असा दाखला सादर करू न शकल्यास व्याज अनुदान मिळण्यास कारखाना अपात्र ठरेल.

- मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews1
- वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड, आयुक्त साहेब यांस, 16 Sept 2026 नमस्कार.. विषय . वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे. कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत. माझा पत्ता... पोतनीस, 51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ. पुणे 411041.3
- "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"1
- को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त1
- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- ६० वर्षांची साथ तुटली; मदन बाफनांच्या आठवणींना शरद पवारांचा उजाळा... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. गेली ६० वर्षे बाफना आपल्यासोबत होते, त्यांच्यासोबतची साथ शेवटपर्यंत लाभली, अशी आठवण पवारांनी सांगितली. सरपंच ते मंत्री असा त्यांचा कर्तृत्ववान प्रवास होता. आता त्यांचे पुत्र गणेश बाफना वडिलांचा वारसा पुढे नेतील आणि त्यांच्या पाठीशी आपण कायम राहू, असंही शरद पवार म्हणाले... : शरद पवार - राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अध्यक्ष्य #मदनबाफना #शरदपवार #मदनबाफनानिधन #पुणे #पिंपरीचिंचवड #मावळ #राष्ट्रवादीकाँग्रेस #SharadPawar #MadanBafna #MaharashtraPolitics #Thenayaknews #TheNayakNews1