बेकायदेशीर प्लास्टीक कारखाने तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश सरपंच व ग्रामसेवक, वसाणे ग्रामपंचायत ता. मालेगांव जि. नाशिक यांनी दसाणे शिवारातील गट नं 130, 131, 134, 143, 157 या मिळकतींवर असलेले प्लास्टीक कारखाने यांच्यातून निघणारे दुर्गंधीयुक्त धुर तसेच जल प्रदुषण, वायु प्रदुषण यामुळे परिसरात वावरणारे नागरीक यांना साथीचे रोग, श्वसनाचे विकार इ. घातक परिणाम दिसू लागले व आसपासची उपजाऊ शेतजमीनीत प्लास्टीक पिशव्या व वेस्टेज उडत येवून साचून रहातात व त्यामुळे शेतात दुर्गंधी पसरते व शेतजमीन नापीक होत आहे, अशी लेखी तक्रार सरपंच व ग्रामसेवक, दसाणे ग्रामपंचायत ता. मालेगांव यांनी उपविभागीय अधिकारी, मालेगांव यांचेकडे केली होती. सदरहू तक्रारी संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी नितीन सवगिर यांनी दसाणे परिसरातील एकूण 54 प्लास्टीक कारखानदार यांच्याविरुध्द भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 152 प्रमाणे केस क्र. 3/2026 ही केस दाखल करून नोटीसा काढल्या होत्या. सार्वजनिक उपद्रव दुर करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांचे समक्ष सदरहू 54 प्लास्टीक कारखानदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे सादर केले. तसेच सरपंच व ग्रामसेवक दसाणे ग्रामपंचायत यांच्यावतीने अॅड. सुधीर बी. अक्कर व अॅड साई अक्कर यांनी ग्रामस्थांच्या बाजूने कायदेशीर बाजू उपविभागीय दंडाधिकारी यांचे समक्ष लेखी स्वरुपात मांडली. उपविभागीय दंडाधिकारी यांनी दोन्ही बाजूकडील युक्तीवाद व लेखी पुरावे तसेच मंडल अधिकारी सायने बुवुक यांनी दिलेला जागेचा स्थळ पहाणी अहवाल बघून व कायदयातील तरतुदींचा विचार करुन दसाणे येथील 54 प्लास्टीक कारखाण्या पैकी 29 प्लास्टीक कारखाने यांच्याकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांची Consent to Operate उत्पादन करण्याची कोणतीही परवानगी नसल्यामुळे सदरहू कारखाने सबरहू आदेश मिळाल्याच्या 3 दिवसांच्या आत तत्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे व सदरहू प्लास्टीक कारखान्याची वीज जोडणी तत्काळ प्रभावाने खंडीत करण्याची कारवाई कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी करावी असा आदेश केलेला आहे.तसेच उर्वरीत 7 प्लास्टीक कारखाने यांच्यासंबंधी Consent to Operate उत्पादन परवानगीच्या अनुशंगाने पुढील 30 दिवसांच्या आत प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, नाशिक यांनी स्थळ पहाणी करुन निकषाची तपासणी करावी व त्याचे उल्लघन होत असल्यास सदरहू कारखाने त्वरीत बंद करण्याची कारवाई करावी असा देखील आदेश केलेला आहे. सदरहू प्लास्टीक कारखाने बंद करण्याचे आदेश दि. 9/9/2026 रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांनी केलेला आहे. तसेच सदरहू आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 292, 293 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असाही आदेश केलेला आहे. सदरहू आदेश करतेवेळी न्यायालयाने सदरहू प्लास्टीक कारखान्यातून निघणारा धुर व सांडपाणी उघडपणे सोडले असल्यामुळे वायू व जलप्रदुषण होवून पर्यावरण हानी होत आहे व आजुबाजुच्या परिसरातील नागरीक व प्राणी यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असे मत उपविभागीय दंडाधिकारी यांनी व्यक्त केलेले आहे. सदरहू निकालामुळे बेकायदेशीरपणे दसाणे शिवारात चालू असलेले प्लास्टीक कारखाने त्वरीत बंद करण्याची कारवाई सुरु झालेली आहे. त्यामुळे दसाणे येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करुन सदरहू बेकायदेशीर प्लास्टीक कारखाने कायमस्वरूपी बंद करावे यासाठी सुरु केलेले अभियान यशस्वी झालेले आहे. सदरहू सार्वजनिक उपद्रव दुर करण्याचे कायदेशीर प्रकरणकामी अॅड सुधीर अक्कर, अॅड साई सुधीर अक्कर यांनी दसाणे ग्रामसेवक व सरपंच यांच्या वतीने कायदेशीर बाजू व लेखी युक्तीवाद मांडला व कामकाज बघितले. त्यांना अॅड लक्ष्मीकांत जी. सुरसे, अॅड संतोष ए. अहिरे, अॅड हितेश जैन, अॅड कृष्णा सं. मिश्रा यांनी सहकार्य केले.

- चांदवडला आगमन मिरवणूकांनी गणरायाची वाजतगाजत प्रतिष्ठापना; ‘वरचे गावचा राजा’ची लक्षवेधी मिरवणूकीने स्थापना; ‘महाकाल अघोरी तांडव’चा सजीव देखावा पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी चांदवड शहरातील विविध गणेश मंडळांनी आगमन मिरवणूका काढून आपल्या गणरायाची उत्साहात, वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. गणेश मंडळांच्या सुमारे १५ फुटी भव्य गणेशमूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील वरचे गाव येथील छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या ‘वरचे गावचा राजा’चा मुखदर्शन व आगमन सोहळा लक्षवेधी ठरला. या मंडळाच्या मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेला महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बाळगोपाळांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी (दि. १२) पहाटे तीन वाजता नंदुरबार येथून निघालेल्या ‘वरचे गावचा राजा’च्या सुमारे १५ फूर्टी भव्य गणेशमूर्तीचे सुमारे १५ तासानंतर शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चांदवड शहरात आगमन झाले. रविवारी (दि. १३) सायंकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ‘वरचे गावच्या राजा’च्या आगमन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मिरवणूकीत डीजे पथक, महाबली हनुमान देखावा, बालाजी देखावा, भगवान शिवशंकराचे रुप, ढोल-ताशांच्या तालावर अघोरी नृत्य करणारे साधू, महाकाली देखावा यासह नाशिक येथील सुमारे १०० सदस्यांचे ढोलताशा पथक सहभागी झाले होते. मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेल्या हरियाणा येथील महाकाल अघोरी पथकाचा शिवतांडव, अग्नीतांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बालगोपाळांसह महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. महाकाल यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतरचे आक्रमक रुप, कांतारा, कालिकादेवी, महाकाली, शिवपार्वती व अघोरींचे नृत्य चांदवडकरांनी अनुभवले. पथकाने सादर केलेली अग्नी व भस्माच्या चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी शहरातील रस्ते नागरीकांच्या गर्दीने भरले होते. या मिरवणूकीत तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांच्या प्रदर्शनानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. आठवडे बाजार तळ, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, शिंपी गल्ली मार्गे सुमारे पाच तासानंतर मिरवणूकीची वरचे गाव येथे सांगता झाली. यावेळी गणेशाच्या मुखदर्शनप्रसंगी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ---- गणेश मंडळांकडून भव्य गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना- संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या मंडळासह शहरातील त्रिलोक गणेश मित्र मंडळ, संत गाडगेबाबा चौक गणेश मित्र मंडळ, हिंदुराजा गणेश मित्र मंडळ, राजमुद्रा फ्रेंड सर्कल आदी विविध मंडळांचाही गणेश आगमन सोहळा वाजतगाजत, डीजे च्या निनादात पार पडला. या मंडळांनीही भव्य गणेशमूतींची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळून निघालेल्या गणेश आगमन मिरवणूकांची मंडळांच्या गणेश प्रतिष्ठापनास्थळी सांगता झाली.4
- वाहेगाव साळ येथे नव्याने हनुमान चौक मित्र मंडाळाची स्थापना सामाजिक व धामी॔क उपक्रमांची सुरुवा तरुण मुले एकत्र येवुन हनुमान चौक मंत्र मंडाळाची स्थापना करुन वष॔ पहीले गणपती बाप्पाची मुती॔ बसुन मित्र मंडळ व पोलीस पाटिल उपस्थतीत गणपती बाप्पाची पहीली आरती घेण्यात आली दरवषी॔ मोठ्या उत्साहात करणार2
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरातील अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, टायफॉइड आणि सर्दी-तापासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला होता, ज्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आजारी पडत होते. या गंभीर समस्येची दखल घेत, शाळेतील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जुनेद पठाण साहेब यांनी सुल्तानिया संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे शाळेतच शिबीर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात शेकडो विद्यार्थ्यांची कसून आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन श्री इमरान आजमी साहेब आणि अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री नदीम खान गुलशेर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात डॉक्टर निशा धवन, डॉक्टर बदर सूर्यवंशी आणि आशा वर्कर नफिसा दीदी यांनी अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची तपासणी करत उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली. या संपूर्ण प्रक्रियेत आणि शिबिराच्या नियोजनात श्री जुनेद पठाण साहेब यांच्यासह श्री हुसेन पिंजारी साहेब, श्री अयाज अहमद अयाज आणि अमजद पठाण साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या साथीच्या आजारांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी जागेवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे धुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले1