तिरुपती बालाजीच्या सेवेसाठी मंगरूळपीर, दिग्रस व शेलुबाजारचे भाविक तिरुपती बालाजीच्या सेवेसाठी मंगरूळपीर, दिग्रस व शेलुबाजारचे भाविक रिसोड वाशिम आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी हे देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असून, या पवित्र तीर्थक्षेत्राच्या दर्शनासोबतच धार्मिक सेवा करण्यासाठी मंगरूळपीर, दिग्रस व शेलुबाजार परिसरातील भाविक मोठ्या संख्येने नियमितपणे तिरुपती येथे जात असतात. भक्ती, सेवा आणि धार्मिक कार्याची परंपरा जपत अनेक भाविक विविध सेवाकार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. दिग्रस येथून सतीशभाऊ मेहता व सौ. हेमलता मेहता, अजय भैया बंग व सौ. राखी अजय बंग, मंगरूळपीर येथून सतीश राठी व सौ. मीना राठी, डॉ. नंदकिशोर बियाणी व सौ. भारती बियाणी, तर शेलुबाजार येथून राजेंद्र पवार व सौ. रंजना राजेंद्र पवार यांच्यासह परिसरातील अनेक भाविक तिरुपती बालाजीच्या सेवाकार्यात सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे सतीश राठी यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक धार्मिक सेवा, सामाजिक उपक्रम आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या विविध कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. तिरुपती बालाजीच्या चरणी सेवा करण्याची संधी ही भाविकांसाठी अत्यंत समाधानाची आणि आध्यात्मिक अनुभूती देणारी बाब मानली जाते. मंगरूळपीर, दिग्रस आणि शेलुबाजार परिसरातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असून, दर्शनासोबतच सेवा करण्याची भावना अधिक दृढ होत आहे. ‘भक्तीबरोबर सेवा’ या भावनेतून सुरू असलेले हे धार्मिक कार्य परिसरातील भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिरुपती बालाजीच्या पवित्र भूमीत सेवा करण्याच्या या उपक्रमामुळे धार्मिक एकोपा, परस्पर सहकार्य आणि सेवाभावाची भावना वृद्धिंगत होत असून, भाविकांमध्येही या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

- बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.1
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .1
- शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड1
- रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी1
- Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...4