बीड शहरातील नाळवंडी नाका ते पिंपळनेर मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नगरपालिकेची पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यावर दीड ते दोन फूट खोल खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग बीड-नाथापूर, पिंपळनेर आणि माजलगाव या भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. याच मार्गावरून दररोज आदित्य मेडिकल कॉलेज, खंडेश्वरी मंदिर, शासकीय आयटीआय, एमआयडीसी आणि नवीन मोंढा परिसरात हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, फुटलेल्या पाईपलाईनमधून सतत वाहणारे पाणी आणि सध्या सुरू असलेला पाऊस यामुळे रस्त्याची स्थिती आणखी गंभीर झाली असून, अनेक ठिकाणी गुडघ्याएवढे खड्डे निर्माण झाले आहेत. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून, दुचाकीस्वारांना येथून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांनी नगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुटलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि नगरपालिकेने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- बीड येथील जिल्हा रुग्णालयासमोर प्रसुती दरम्यान झालेल्या मातामृत्यू प्रकरणी तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. या आंदोलनादरम्यान मुस्कान शेख व छाया पांचाळ यांच्या प्रसुती दरम्यान झालेल्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.1
- "हक्क विद्यार्थ्यांचा, लढा राष्ट्रवादीचा!" या घोषवाक्याखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील आंदोलनस्थळावरून हटविल्याच्या घटनेचा निषेध आणि देशभरातील NEET तसेच महाराष्ट्रातील TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. सकाळपासूनच सुरू झालेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी केली. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे अशा मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर कठोर उपाययोजना करून परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शांततामय आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध नोंदवत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.2
- नगरसेवकांनी नेमकी कोणती कामे केली पाहिजेत, याबाबत नागरिकांना आपले मत मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विषयावर आपले स्पष्ट मत काय आहे, ते कमेंट करून नक्की सांगावे.1
- बीड जिल्हा रुग्णालयासमोर मुस्कान शेख आणि छाया पांचाळ यांच्या प्रसुती दरम्यान झालेल्या मातामृत्यू प्रकरणी निदर्शने करण्यात आली आहेत. या प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे।1
- सामाजिक, पर्यावरण व शिक्षण क्षेत्रातील संशोधक सोनम वांगचुक यांच्या शांततामय आंदोलनावर झालेल्या कथित कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (म.अं.नि.स.) बीड शाखेच्या वतीने भारताच्या राष्ट्रपतींना बीड जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी त्यांना जंतर-मंतर येथून हटविण्याच्या कारवाईचा या निवेदनात निषेध व्यक्त करण्यात आला. समितीने आपल्या निवेदनात आंदोलनादरम्यान झालेली पोलिसी कारवाई आणि आंदोलनकर्त्यांवरील कथित बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला आहे. सोनम वांगचुक यांच्या आरोग्याविषयी पारदर्शक माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करतानाच, त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांना संपूर्ण माहिती देण्यात यावी आणि आवश्यक असल्यास स्वतंत्र वैद्यकीय सल्ल्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, राष्ट्रीय स्तरावरील नीट (NEET), टीईटी (TET) आणि इतर परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी व परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट करत, ही संपूर्ण परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक संवाद साधून योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या या निवेदनात सोनम वांगचुक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी देऊन त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान राखावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन सादर करताना प्राचार्य डॉ. सविता शेटे (राज्य कार्यवाह, विवेकवाहिनी), प्राचार्य कॉ. डी. जी. तांदळे (जिल्हा उपाध्यक्ष, म.अं.नि.स.), विजय घेवारे (कार्याध्यक्ष), अॅड. करुणा टाकसाळ (प्रधान सचिव), शुभांगी कुलकर्णी (जिल्हा सहकार्यवाह, महिला सहभाग विभाग) आणि अॅड. अंबादास आगे यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील भ्रष्टाचारी ग्रामसेवकाने केवळ कागदोपत्री कामे दाखवून गावकऱ्यांना विकासापासून वंचित ठेवले असून, नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. गावात पाणी, आरोग्य आणि स्मशानभूमीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत सुविधांसाठीही नागरिकांना उपोषणाला बसावे लागत आहे, जे या गावाचे मोठे दुर्दैव आहे. एवढे गंभीर प्रकार समोर येऊनही गट विकास अधिकारी (बीडीओ) या भ्रष्टाचारी ग्रामसेवकावर निलंबन किंवा बडतर्फीची कोणतीही कारवाई करत नसून उलट त्याला सहकार्य करत आहेत. यामुळे भ्रष्टाचारी ग्रामसेवकाला बडतर्फ करण्यास बीडीओ असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावाचा विकास कागदोपत्री ऐवजी प्रत्यक्षात करावा आणि फुकट पगार घेणाऱ्या या भ्रष्टाचारी ग्रामसेवकाला तात्काळ बडतर्फ करावे.4