logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड येथील जिल्हा रुग्णालयासमोर प्रसुती दरम्यान झालेल्या मातामृत्यू प्रकरणी तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. या आंदोलनादरम्यान मुस्कान शेख व छाया पांचाळ यांच्या प्रसुती दरम्यान झालेल्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

16 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
16 hrs ago

बीड येथील जिल्हा रुग्णालयासमोर प्रसुती दरम्यान झालेल्या मातामृत्यू प्रकरणी तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. या आंदोलनादरम्यान मुस्कान शेख व छाया पांचाळ यांच्या प्रसुती दरम्यान झालेल्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

  • user_पंडित चव्हाण
    पंडित चव्हाण
    गेवराई, बीड, महाराष्ट्र
    आता. फार ऊसिर. झाल. आहे
    10 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाथरीचे शिवसेना आमदार सईद खान यांनी विजय मिळवला आहे. या बँकेच्या निवडणुकीत आमदार सईद खान विजयी झाल्याची थेट (LIVE) माहिती समोर आली आहे.
    1
    परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाथरीचे शिवसेना आमदार सईद खान यांनी विजय मिळवला आहे. या बँकेच्या निवडणुकीत आमदार सईद खान विजयी झाल्याची थेट (LIVE) माहिती समोर आली आहे.
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • उपराकार लक्ष्मण माने यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
    1
    उपराकार लक्ष्मण माने यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विनयभंग प्रकरणात जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुख्य आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी विनयभंग प्रकरणात जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुख्य आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी POCSO प्रकरणात जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल वाड्यात जाऊन तरुणीचा विनयभंग महागात; दोन्ही आरोपी दोषी, पीडितेला नुकसानभरपाईचा आदेश आज दिनांक 20 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एका गंभीर विनयभंग प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व ११ हजार रुपये दंड, तर दुसऱ्या आरोपीला सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अनुक्रमे सहा महिने व एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. ही शिक्षा मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. के. पी. मोरे यांनी सुनावली. या प्रकरणातील आरोपी शेख मोहसिन शेख वसीम (वय ३२) आणि शेख रहीम शेख वसीम (वय ३३, रा. पारध बु., ता. भोकरदन, जि. जालना) यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा सिद्ध झाला. काय घडले होते? सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, २७ जून २०२० रोजी पीडित तरुणी रात्री आपल्या वाड्यात मोबाईलवर बोलत असताना मुख्य आरोपी तेथे आला. त्याने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. पीडितेने विरोध करताच आरोपीने तिला धमकावले. दुसऱ्या दिवशी पीडितेने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर आरोपी मोहसिन व रहीम यांनी पीडितेच्या कुटुंबीयांनाही धमक्या दिल्याचा आरोप होता. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. एस. उबाळे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाची प्रभावी बाजू सरकारी पक्षाने पीडितेसह तिची आई, पंच साक्षीदार, शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी अशा महत्त्वाच्या साक्षीदारांचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. तसेच पीडितेचे वय सिद्ध करणारी शाळेची कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आली. पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत शिक्षा सुनावली. तसेच न्यायालयाने आदेश दिला की, आरोपींकडून वसूल होणाऱ्या दंडाच्या रकमेतून १७ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना कोर्ट पेअरवी पोलिसांचीही मोलाची मदत लाभली.
    1
    विनयभंग प्रकरणात जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुख्य आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी


विनयभंग प्रकरणात जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुख्य आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी
POCSO प्रकरणात जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
वाड्यात जाऊन तरुणीचा विनयभंग महागात; दोन्ही आरोपी दोषी, पीडितेला नुकसानभरपाईचा आदेश
आज दिनांक 20 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एका गंभीर विनयभंग प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व ११ हजार रुपये दंड, तर दुसऱ्या आरोपीला सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अनुक्रमे सहा महिने व एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
ही शिक्षा मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. के. पी. मोरे यांनी सुनावली. या प्रकरणातील आरोपी शेख मोहसिन शेख वसीम (वय ३२) आणि शेख रहीम शेख वसीम (वय ३३, रा. पारध बु., ता. भोकरदन, जि. जालना) यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा सिद्ध झाला.
काय घडले होते?
सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, २७ जून २०२० रोजी पीडित तरुणी रात्री आपल्या वाड्यात मोबाईलवर बोलत असताना मुख्य आरोपी तेथे आला. त्याने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. पीडितेने विरोध करताच आरोपीने तिला धमकावले. दुसऱ्या दिवशी पीडितेने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर आरोपी मोहसिन व रहीम यांनी पीडितेच्या कुटुंबीयांनाही धमक्या दिल्याचा आरोप होता.
या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. एस. उबाळे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी पक्षाची प्रभावी बाजू
सरकारी पक्षाने पीडितेसह तिची आई, पंच साक्षीदार, शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी अशा महत्त्वाच्या साक्षीदारांचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. तसेच पीडितेचे वय सिद्ध करणारी शाळेची कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आली.
पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत शिक्षा सुनावली. तसेच न्यायालयाने आदेश दिला की, आरोपींकडून वसूल होणाऱ्या दंडाच्या रकमेतून १७ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना कोर्ट पेअरवी पोलिसांचीही मोलाची मदत लाभली.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी हातचलाखी करत १ लाख ६९ हजार ६७१ रुपये किमतीचे १२ जोड चांदीचे पैंजण लंपास केले आहेत. सोमवारी दिवसा घडलेली ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलांनी खरेदीचा बहाणा करत दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले आणि अवघ्या दोन मिनिटांत ७२२ ग्रॅम वजनाचे पैंजण चोरून नेले. याप्रकरणी ओम सचिन कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे।
    2
    कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी हातचलाखी करत १ लाख ६९ हजार ६७१ रुपये किमतीचे १२ जोड चांदीचे पैंजण लंपास केले आहेत. सोमवारी दिवसा घडलेली ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या महिलांनी खरेदीचा बहाणा करत दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले आणि अवघ्या दोन मिनिटांत ७२२ ग्रॅम वजनाचे पैंजण चोरून नेले. याप्रकरणी ओम सचिन कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे।
    user_Malave subhash
    Malave subhash
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून हटविल्याच्या घटनेचा निषेध करत बीड जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता या मुद्द्यांवर सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना तिथून हटवण्यात आल्याच्या घटनेमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद करत, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या तातडीने पाठवण्याची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये परीक्षांमधील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करणे, परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान राखणे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र शासनाने सकारात्मक संवाद साधणे यांचा समावेश आहे.
    1
    नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून हटविल्याच्या घटनेचा निषेध करत बीड जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता या मुद्द्यांवर सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना तिथून हटवण्यात आल्याच्या घटनेमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांनी लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद करत, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या तातडीने पाठवण्याची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये परीक्षांमधील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करणे, परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान राखणे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र शासनाने सकारात्मक संवाद साधणे यांचा समावेश आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुना जालना भागातील मुक्तेश्वर लॉन्स येथे भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि मतदार यादी पुनर्निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जालना मनपाचे स्थायी समिती सभापती आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अशोक पांगारकर यांच्या मित्रमंडळातर्फे हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या विविध उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल, मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, गटनेता महेश निकम, नगरसेवक शशिकांत घुगे, शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस, स्वच्छता व आरोग्य उपसभापती सौ. अनामिका पांगारकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. संध्या देठे, नगरसेविका सौ. सुलोचना गोरडे, पाणी पुरवठा उपसभापती भगवान चांदोडे आणि नगरसेवक सिद्धिविनायक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात जवळपास ३० दात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते मुक्तेश्वर संस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेला सहकार्य करण्यासाठी आणि मतदारांची होणारी परवड थांबवण्यासाठी प्रभाग क्रमांक ११, १३ आणि १४ मधील नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी बीएलओंसाठी ५० टेबलवर स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांना त्यांची पुनर्निरीक्षण प्रक्रिया पार पाडण्यात मोठी मदत झाली. या कार्यक्रमास सुजितकुमार जोगस, विजय पांगारकर, निलेश गोरडे, रणजीत मगरे, प्रतीक पांगारकर, विशाल वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुना जालना भागातील मुक्तेश्वर लॉन्स येथे भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि मतदार यादी पुनर्निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जालना मनपाचे स्थायी समिती सभापती आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अशोक पांगारकर यांच्या मित्रमंडळातर्फे हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या विविध उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल, मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, गटनेता महेश निकम, नगरसेवक शशिकांत घुगे, शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस, स्वच्छता व आरोग्य उपसभापती सौ. अनामिका पांगारकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. संध्या देठे, नगरसेविका सौ. सुलोचना गोरडे, पाणी पुरवठा उपसभापती भगवान चांदोडे आणि नगरसेवक सिद्धिविनायक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात जवळपास ३० दात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते मुक्तेश्वर संस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेला सहकार्य करण्यासाठी आणि मतदारांची होणारी परवड थांबवण्यासाठी प्रभाग क्रमांक ११, १३ आणि १४ मधील नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी बीएलओंसाठी ५० टेबलवर स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांना त्यांची पुनर्निरीक्षण प्रक्रिया पार पाडण्यात मोठी मदत झाली. या कार्यक्रमास सुजितकुमार जोगस, विजय पांगारकर, निलेश गोरडे, रणजीत मगरे, प्रतीक पांगारकर, विशाल वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी आणि आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांचा आरोप आहे की, शांततापूर्ण आंदोलनाला प्रतिसाद देण्याऐवजी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधूराचा वापर केला आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. विद्यार्थ्यांच्या आवाजावर लाठीचा प्रहार झाल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.
    1
    NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी आणि आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांचा आरोप आहे की, शांततापूर्ण आंदोलनाला प्रतिसाद देण्याऐवजी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधूराचा वापर केला आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. विद्यार्थ्यांच्या आवाजावर लाठीचा प्रहार झाल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.