देशभरातील परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ विद्यार्थी-युवक संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रशासन आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आंदोलनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात दिल्लीतील शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून, हा प्रकार लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थी-युवक संघर्ष समितीने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) बरखास्त करणे, NEET, TET व इतर परीक्षांमधील पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करणे, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यासोबतच लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि २०२६ च्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून द्यावी, असा आग्रह धरण्यात आला आहे. या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. सादर करण्यात आलेल्या निवेदनावर अनिल मिसाळ, वैजिनाथ लोंढे, ऍड. राहुल बोबडे, समाधान खरात, समाधान खाडे, पवन दांडगे, मुजीब शेख, अंगद धनवे, पूनम लांडगे, बाबासाहेब पाटोळे, सचिन गाडगे आणि बाबासाहेब अंबडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

- दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाचे तीव्र पडसाद जालन्यात उमटले असून, मुसळधार पावसाची तमा न बाळगता शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन छेडले. हातात विविध मागण्यांचे फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर लक्ष वेधत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाला नेताजी सुभाष चंद्र बोस सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. दरम्यान, आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून BARकाईने लक्ष ठेवण्यात आले. भर पावसात झालेल्या या आक्रमक आंदोलनामुळे दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागल्याचे चित्र असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बाणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वारसा जपत भव्य दिंडी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन काढले. डोक्यावर पांढऱ्या टोप्या, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळावर गंध-टिळा लावून हातात टाळ, मृदंग व भगवे ध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून दिंडी काढली. गावातील प्रमुख चौक, मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांवरून दिंडी मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख, संत परंपरेबद्दल आदर, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात, असे शिक्षकांनी सांगितले.4
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार धरणे आंदोलन छेडले. महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण काही काळ तापले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारावर जोरदार हल्लाबोल करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत NEET पेपरफुटी या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.1
- बदनापूर येथे सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही रमेश सुंदरलाल जैन यांच्या परिवाराचा शोध लागू शकलेला नाही. रमेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही महिन्यांपूर्वी सेंट्रल इंडिया ट्रान्सपोर्टचे मालक सादिक शेठ आणि विखार सिद्दीकी यांच्या ट्रान्सपोर्टवर काम करत होते. रमेश जैन यांच्या परिवाराचा शोध लावून त्यांना सुखरूप घरी पोहोचवणे हेच सध्या ध्येय आहे. जर कोणाला त्यांच्या परिवाराविषयी माहिती असेल, तर बदनापूर येथील पत्रकार नजीर इनामदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात माणुसकीचे दर्शन घडवत पाथरीकर पेट्रोल पंपावरील कर्मचारी शेख नईम, शेख नजीर इनामदार, भाऊसाहेब साळुंके आणि मगरे परमेश्वर यांच्यासह संपूर्ण पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नसली, तरी बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या किसन जाधव यांनी माणुसकीच्या नात्याने खूप मदत केली. यासोबतच चाळीसगावचे पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार महेश थेरे आणि बदनापूरचे पोलीस निरीक्षक यांनीही मदत केली असून, पाथरीकर पेट्रोल पंपाचे संपूर्ण कर्मचारी त्यांची व्यवस्था पाहत आहेत.2
- देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.1
- शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या परिस्थितीमुळे आक्रमक झालेल्या संतप्त पालकांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवण्याचा थेट इशारा दिला आहे.1
- भोकरदन तालुक्यातील मेरखेडा गावामध्ये महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान महसूल प्रशासनाकडून अवैध साठे जप्त करण्यात आले आहेत.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा जालन्यातील डेमोक्रेटिक लॉयर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचे दमन करण्याऐवजी त्यांना न्याय देण्यात यावा आणि लाठीहल्ल्याची कृती ही लोकशाही मूल्यांवर घातलेला आघात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, NEET आणि IIT-JEE परीक्षांमधील पेपरफुटीचे प्रकार तसेच शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक व मानसिक ताण याविरोधात हे आंदोलन उभारण्यात आले होते. शिक्षण सुधारक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या शांततामय आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना विद्यार्थ्यांवर दमनशाहीचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना त्वरित न्याय देण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या या निवेदनावर डेमोक्रॅटिक लॉयर्स असोसिएशनचे ॲड. शिवाजीराव आदमाने, ॲड. किशोर राऊत, ॲड. माणिकराव बनसोडे, ॲड. कल्पना त्रिभुवन, ॲड. राहुल चव्हाण, ॲड. डी. के. कुलकर्णी, ॲड. वैभव खरात, ॲड. राम गव्हाणे, ॲड. जाधव सर, ॲड. लक्ष्मण उडान, ॲड. उमर परसूवाले, ॲड. सविता भास्कर, ॲड. शारजा शेख, ॲड. सरिता गजरे, ॲड. आयज सुभानी, ॲड. ज्ञानेश्वर कोरडे, ॲड. एस. आर. जऱ्हाड, ॲड. आर. जी. डुरे आणि ॲड. शरद कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा लढा येत्या काळात अधिक तीव्र करण्याचा इशाराही विधिज्ञांनी दिला आहे.1