बदनापूर येथे सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही रमेश सुंदरलाल जैन यांच्या परिवाराचा शोध लागू शकलेला नाही. रमेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही महिन्यांपूर्वी सेंट्रल इंडिया ट्रान्सपोर्टचे मालक सादिक शेठ आणि विखार सिद्दीकी यांच्या ट्रान्सपोर्टवर काम करत होते. रमेश जैन यांच्या परिवाराचा शोध लावून त्यांना सुखरूप घरी पोहोचवणे हेच सध्या ध्येय आहे. जर कोणाला त्यांच्या परिवाराविषयी माहिती असेल, तर बदनापूर येथील पत्रकार नजीर इनामदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात माणुसकीचे दर्शन घडवत पाथरीकर पेट्रोल पंपावरील कर्मचारी शेख नईम, शेख नजीर इनामदार, भाऊसाहेब साळुंके आणि मगरे परमेश्वर यांच्यासह संपूर्ण पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नसली, तरी बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या किसन जाधव यांनी माणुसकीच्या नात्याने खूप मदत केली. यासोबतच चाळीसगावचे पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार महेश थेरे आणि बदनापूरचे पोलीस निरीक्षक यांनीही मदत केली असून, पाथरीकर पेट्रोल पंपाचे संपूर्ण कर्मचारी त्यांची व्यवस्था पाहत आहेत.
बदनापूर येथे सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही रमेश सुंदरलाल जैन यांच्या परिवाराचा शोध लागू शकलेला नाही. रमेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही महिन्यांपूर्वी सेंट्रल इंडिया ट्रान्सपोर्टचे मालक सादिक शेठ आणि विखार सिद्दीकी यांच्या ट्रान्सपोर्टवर काम करत होते. रमेश जैन यांच्या परिवाराचा शोध लावून त्यांना सुखरूप घरी पोहोचवणे हेच सध्या ध्येय आहे. जर कोणाला त्यांच्या परिवाराविषयी माहिती असेल, तर बदनापूर येथील पत्रकार नजीर इनामदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात माणुसकीचे दर्शन घडवत पाथरीकर
पेट्रोल पंपावरील कर्मचारी शेख नईम, शेख नजीर इनामदार, भाऊसाहेब साळुंके आणि मगरे परमेश्वर यांच्यासह संपूर्ण पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नसली, तरी बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या किसन जाधव यांनी माणुसकीच्या नात्याने खूप मदत केली. यासोबतच चाळीसगावचे पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार महेश थेरे आणि बदनापूरचे पोलीस निरीक्षक यांनीही मदत केली असून, पाथरीकर पेट्रोल पंपाचे संपूर्ण कर्मचारी त्यांची व्यवस्था पाहत आहेत.
- बदनापूर येथे सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही रमेश सुंदरलाल जैन यांच्या परिवाराचा शोध लागू शकलेला नाही. रमेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही महिन्यांपूर्वी सेंट्रल इंडिया ट्रान्सपोर्टचे मालक सादिक शेठ आणि विखार सिद्दीकी यांच्या ट्रान्सपोर्टवर काम करत होते. रमेश जैन यांच्या परिवाराचा शोध लावून त्यांना सुखरूप घरी पोहोचवणे हेच सध्या ध्येय आहे. जर कोणाला त्यांच्या परिवाराविषयी माहिती असेल, तर बदनापूर येथील पत्रकार नजीर इनामदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात माणुसकीचे दर्शन घडवत पाथरीकर पेट्रोल पंपावरील कर्मचारी शेख नईम, शेख नजीर इनामदार, भाऊसाहेब साळुंके आणि मगरे परमेश्वर यांच्यासह संपूर्ण पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नसली, तरी बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या किसन जाधव यांनी माणुसकीच्या नात्याने खूप मदत केली. यासोबतच चाळीसगावचे पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार महेश थेरे आणि बदनापूरचे पोलीस निरीक्षक यांनीही मदत केली असून, पाथरीकर पेट्रोल पंपाचे संपूर्ण कर्मचारी त्यांची व्यवस्था पाहत आहेत.2
- दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाचे तीव्र पडसाद जालन्यात उमटले असून, मुसळधार पावसाची तमा न बाळगता शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन छेडले. हातात विविध मागण्यांचे फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर लक्ष वेधत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाला नेताजी सुभाष चंद्र बोस सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. दरम्यान, आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून BARकाईने लक्ष ठेवण्यात आले. भर पावसात झालेल्या या आक्रमक आंदोलनामुळे दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागल्याचे चित्र असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बाणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वारसा जपत भव्य दिंडी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन काढले. डोक्यावर पांढऱ्या टोप्या, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळावर गंध-टिळा लावून हातात टाळ, मृदंग व भगवे ध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून दिंडी काढली. गावातील प्रमुख चौक, मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांवरून दिंडी मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख, संत परंपरेबद्दल आदर, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात, असे शिक्षकांनी सांगितले.4
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार धरणे आंदोलन छेडले. महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण काही काळ तापले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारावर जोरदार हल्लाबोल करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत NEET पेपरफुटी या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.1
- केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली न गेल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारीवर कसलीही कारवाई न झाल्याने सुरू ॲप काहीच कामाचा उरलेला नाही, असा थेट आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला आहे.1
- छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी सभागृहात उद्योग संघटनांशी साधलेल्या संवादादरम्यान, शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीत सूक्ष्म व लघु उद्योगांना समन्यायी व सुयोग्य पद्धतीने भूखंड उपलब्ध करून देण्याचे निर्देश उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. शेंद्रा बिडकीन वसाहतीत सूक्ष्म व लघु उद्योगांना भूखंड देण्याबाबत त्वरित निर्णय घेऊन उच्चतम दर निश्चित करण्यात यावेत, जेणेकरून उद्योजकांना भूखंड घेणे शक्य होईल, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीत उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा व बिडकीन औद्योगिक क्षेत्रात ट्रक टर्मिनस सुरू करण्याच्या मागणीवर बोलताना, उद्योग संघटनांनी सहभाग देऊन सहयोग तत्त्वावर ट्रक टर्मिनस उभारावे आणि चालवावे, असे श्री. सामंत यांनी सांगितले. तसेच उद्योजकांच्या वीज पुरवठ्याच्या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतील वीज वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवून द्यावा आणि एक्झिबीशन सेंटरच्या कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीस खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार विलास भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य अभियंता राहुल बनसोड, अधीक्षक अभियंता रमेशचंद्र गिरी, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, उप अभियंता नितीन जाधव, कार्यकारी अभियंता नागोराव राठोड, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा जालन्यातील डेमोक्रेटिक लॉयर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचे दमन करण्याऐवजी त्यांना न्याय देण्यात यावा आणि लाठीहल्ल्याची कृती ही लोकशाही मूल्यांवर घातलेला आघात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, NEET आणि IIT-JEE परीक्षांमधील पेपरफुटीचे प्रकार तसेच शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक व मानसिक ताण याविरोधात हे आंदोलन उभारण्यात आले होते. शिक्षण सुधारक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या शांततामय आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना विद्यार्थ्यांवर दमनशाहीचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना त्वरित न्याय देण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या या निवेदनावर डेमोक्रॅटिक लॉयर्स असोसिएशनचे ॲड. शिवाजीराव आदमाने, ॲड. किशोर राऊत, ॲड. माणिकराव बनसोडे, ॲड. कल्पना त्रिभुवन, ॲड. राहुल चव्हाण, ॲड. डी. के. कुलकर्णी, ॲड. वैभव खरात, ॲड. राम गव्हाणे, ॲड. जाधव सर, ॲड. लक्ष्मण उडान, ॲड. उमर परसूवाले, ॲड. सविता भास्कर, ॲड. शारजा शेख, ॲड. सरिता गजरे, ॲड. आयज सुभानी, ॲड. ज्ञानेश्वर कोरडे, ॲड. एस. आर. जऱ्हाड, ॲड. आर. जी. डुरे आणि ॲड. शरद कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा लढा येत्या काळात अधिक तीव्र करण्याचा इशाराही विधिज्ञांनी दिला आहे.1
- भोकरदन पोलिसांनी अत्यंत धडाकेबाज कारवाई करत १० किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कामगिरीत १० किलो गांजाचा साठा हस्तगत करत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.1