logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बाणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वारसा जपत भव्य दिंडी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन काढले. डोक्यावर पांढऱ्या टोप्या, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळावर गंध-टिळा लावून हातात टाळ, मृदंग व भगवे ध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून दिंडी काढली. गावातील प्रमुख चौक, मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांवरून दिंडी मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख, संत परंपरेबद्दल आदर, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात, असे शिक्षकांनी सांगितले.

4 hrs ago
user_Santram Jadhav
Santram Jadhav
Jalna, Maharashtra•
4 hrs ago
7975f805-d28f-486a-803e-c0543928853c

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बाणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वारसा जपत भव्य दिंडी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव भक्तिरसात

न्हाऊन काढले. डोक्यावर पांढऱ्या टोप्या, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळावर गंध-टिळा लावून हातात टाळ, मृदंग व भगवे ध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात गावातील प्रमुख

6040762c-e86f-4acd-953b-1dbcfca1ecd2

मार्गांवरून दिंडी काढली. गावातील प्रमुख चौक, मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांवरून दिंडी मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि

13b49b7d-7a5b-4e06-9eed-6192043a39ee

ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख, संत परंपरेबद्दल आदर, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात, असे शिक्षकांनी सांगितले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीतील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. महेश धन्नावत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रामभक्तांनी श्रद्धेने आणि घामाच्या कमाईतून अर्पण केलेल्या देणगीत अपहार झाल्याचा आरोप करत, रामललांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना अभय का दिले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर आपले मौन सोडावे आणि दोषींवर कठोर कारवाई करून रामभक्तांच्या देणगीचा हिशोब द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकाद्वारे भूमिका मांडताना ॲड. धन्नावत यांनी परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करत, या देणगी घोटाळ्याचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली. सक्तवसुली संचालनालय (ED), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणात तत्परतेने कारवाई करावी, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या (SIT) तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाचा अहवाल मागवल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व संबंधितांची चौकशी करून देणगीच्या एक-एक रुपयाचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी शेवटी केली.
    1
    अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीतील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. महेश धन्नावत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रामभक्तांनी श्रद्धेने आणि घामाच्या कमाईतून अर्पण केलेल्या देणगीत अपहार झाल्याचा आरोप करत, रामललांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना अभय का दिले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर आपले मौन सोडावे आणि दोषींवर कठोर कारवाई करून रामभक्तांच्या देणगीचा हिशोब द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पत्रकाद्वारे भूमिका मांडताना ॲड. धन्नावत यांनी परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करत, या देणगी घोटाळ्याचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली. सक्तवसुली संचालनालय (ED), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणात तत्परतेने कारवाई करावी, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या (SIT) तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाचा अहवाल मागवल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व संबंधितांची चौकशी करून देणगीच्या एक-एक रुपयाचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी शेवटी केली.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बाणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वारसा जपत भव्य दिंडी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन काढले. डोक्यावर पांढऱ्या टोप्या, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळावर गंध-टिळा लावून हातात टाळ, मृदंग व भगवे ध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून दिंडी काढली. गावातील प्रमुख चौक, मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांवरून दिंडी मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख, संत परंपरेबद्दल आदर, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात, असे शिक्षकांनी सांगितले.
    4
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बाणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वारसा जपत भव्य दिंडी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन काढले. डोक्यावर पांढऱ्या टोप्या, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळावर गंध-टिळा लावून हातात टाळ, मृदंग व भगवे ध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून दिंडी काढली.

गावातील प्रमुख चौक, मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांवरून दिंडी मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख, संत परंपरेबद्दल आदर, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात, असे शिक्षकांनी सांगितले.
    user_Santram Jadhav
    Santram Jadhav
    Jalna, Maharashtra•
    4 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार धरणे आंदोलन छेडले. महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण काही काळ तापले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारावर जोरदार हल्लाबोल करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत NEET पेपरफुटी या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार धरणे आंदोलन छेडले. महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण काही काळ तापले होते.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारावर जोरदार हल्लाबोल करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत NEET पेपरफुटी या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बदनापूर शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यांवर व चौकांमध्ये दोरीवरची कसरत करणाऱ्या अवघ्या ५ ते ७ वर्षांच्या चिमुकलीचे दृश्य अतिशय वेदनादायक आणि वास्तववादी ठरत आहे. ही लहान मुलगी भीक न मागता आपली कला लोकांसमोर सादर करून चार पैसे कमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक नागरिक या चिमुकलीच्या कलेचे कौतुक करून तिला काही पैसे देतात आणि मिळणाऱ्या या अत्यल्प पैशांवरच तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भीक न मागता स्वतःच्या कलेच्या जोरावर चार पैसे मिळवण्याची ही धडपड असली, तरी गरिबीच्या गर्तेत अशा प्रकारे बालपण हरवून जाणे ही एक मोठी सामाजिक शोकांतिका आहे.
    1
    बदनापूर शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यांवर व चौकांमध्ये दोरीवरची कसरत करणाऱ्या अवघ्या ५ ते ७ वर्षांच्या चिमुकलीचे दृश्य अतिशय वेदनादायक आणि वास्तववादी ठरत आहे. ही लहान मुलगी भीक न मागता आपली कला लोकांसमोर सादर करून चार पैसे कमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक नागरिक या चिमुकलीच्या कलेचे कौतुक करून तिला काही पैसे देतात आणि मिळणाऱ्या या अत्यल्प पैशांवरच तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भीक न मागता स्वतःच्या कलेच्या जोरावर चार पैसे मिळवण्याची ही धडपड असली, तरी गरिबीच्या गर्तेत अशा प्रकारे बालपण हरवून जाणे ही एक मोठी सामाजिक शोकांतिका आहे.
    user_ADIL KHAN
    ADIL KHAN
    Local News Reporter Badnapur, Jalna•
    23 hrs ago
  • देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.
    1
    देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.
    user_किशोर शिंदे
    किशोर शिंदे
    पत्रकार घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या परिस्थितीमुळे आक्रमक झालेल्या संतप्त पालकांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवण्याचा थेट इशारा दिला आहे.
    1
    शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या परिस्थितीमुळे आक्रमक झालेल्या संतप्त पालकांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवण्याचा थेट इशारा दिला आहे.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    33 min ago
  • दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ला व कारवाईच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला घनसावंगी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश व्यापारी आस्थापना दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने शहरात शुकशुकाटाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने दैनंदिन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला. या बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, तालुका अध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाळासाहेब सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राजकिरण राजगुरू, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष संतोष येडे तसेच शहराध्यक्ष आदित्य खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. बंद शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.
    1
    दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ला व कारवाईच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला घनसावंगी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश व्यापारी आस्थापना दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने शहरात शुकशुकाटाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने दैनंदिन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला.

या बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, तालुका अध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाळासाहेब सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राजकिरण राजगुरू, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष संतोष येडे तसेच शहराध्यक्ष आदित्य खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बंद शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका मुंबई पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आंदोलनात पुन्हा दिसल्यास "५० ग्रॅम पावडर टाकून देईन", अशा शब्दांत या पोलिसाने आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी दिली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलीस अधिकाऱ्याने वापरलेल्या या 'पावडर' या शब्दाचा नेमका अर्थ काय, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या अशा प्रकारच्या थेट धमकीमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या व्हायरल व्हिडिओवरून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका मुंबई पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आंदोलनात पुन्हा दिसल्यास "५० ग्रॅम पावडर टाकून देईन", अशा शब्दांत या पोलिसाने आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी दिली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पोलीस अधिकाऱ्याने वापरलेल्या या 'पावडर' या शब्दाचा नेमका अर्थ काय, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या अशा प्रकारच्या थेट धमकीमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या व्हायरल व्हिडिओवरून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.