*मराठी वाड़.मय मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, साहित्यिक जाणीवांना दिशा देणारे एक मुक्त व्यासपीठ – डॉ. तुकाराम रोंगटे शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर येथील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आदिवासी व लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते. उद्घाटनपर मनोगतात डॉ. तुकाराम रोंगटे यांनी मानवी जीवनातील साहित्याचे महत्त्व स्पष्ट केले. “जे लाजवतं, माजवतं आणि खाजवतं ते साहित्य”, असे सांगत साहित्य हे केवळ कल्पनारंजन करणारे नसून समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब मांडणारे माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य हे समाजमनाचा आरसा असून मराठी साहित्याने विविध सामाजिक स्तरांतील जीवनानुभव आणि संवेदना प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, व्यासपीठ देणारे साहित्याची आवड निर्माण करणारे आणि मराठी भाषेविषयी अभिमान जागवणारे एक सर्जनशील व्यासपीठ आहे. मंडळाच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या विविध साहित्यिक, सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवतात, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मराठीतील निसर्गकाव्य, विडंबनकाव्य तसेच दलित आदिवासी, स्त्रीवादी ग्रामीण साहित्य आणि विशेषतः दलित कवितेतून व्यक्त झालेल्या सामाजिक संवेदना यावरही भाष्य केले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा वेध घेत विद्यार्थ्यांनी मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून आपल्या विविध कलागुणांना वाव द्यावा, तसेच साहित्याशी सर्जनशील नाते निर्माण करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी मराठी वाड्मय मंडळाची भूमिका व महत्त्व विशद करत मराठी वांग्मय मंडळ हे केवळ कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर इतरही शाखेच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना कसे विचारपीठ उपलब्ध करून देते यातून विद्यार्थी कसे घडतात याविषयी विवेचन केले. वक्त्यांचा परिचय प्रा. अविनाश मेहेत्रे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. क्रांती गोसावी -पैठणकर यांनी केले, तर आभार डॉ. बाळासाहेब देविकर यांनी मानले. याप्रसंगी डॉ . विजय केसकर डॉ. ब्रिजेश तांबे, डॉ. समाधान बोरसे, डॉ. ईश्वर पवार, डॉ. श्रीपाद जोशी तसेच विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews1
- वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड, आयुक्त साहेब यांस, 16 Sept 2026 नमस्कार.. विषय . वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे. कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत. माझा पत्ता... पोतनीस, 51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ. पुणे 411041.3
- "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"1
- को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त1
- देवळाली प्रवराच्या लोड शेंडीग बाबद दीलेल्या सर्व पक्षीय निवेदनावर काय कारवाई झाली1
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- ६० वर्षांची साथ तुटली; मदन बाफनांच्या आठवणींना शरद पवारांचा उजाळा... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. गेली ६० वर्षे बाफना आपल्यासोबत होते, त्यांच्यासोबतची साथ शेवटपर्यंत लाभली, अशी आठवण पवारांनी सांगितली. सरपंच ते मंत्री असा त्यांचा कर्तृत्ववान प्रवास होता. आता त्यांचे पुत्र गणेश बाफना वडिलांचा वारसा पुढे नेतील आणि त्यांच्या पाठीशी आपण कायम राहू, असंही शरद पवार म्हणाले... : शरद पवार - राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अध्यक्ष्य #मदनबाफना #शरदपवार #मदनबाफनानिधन #पुणे #पिंपरीचिंचवड #मावळ #राष्ट्रवादीकाँग्रेस #SharadPawar #MadanBafna #MaharashtraPolitics #Thenayaknews #TheNayakNews1