नेवासा फाटा हादरला! तीन हॉटेल-लॉजवर पोलिसांचा एकाचवेळी संयुक्त छापा; देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, मालक-व्यवस्थापकांसह १० जणांवर गुन्हा (अहिल्यानगर), दि. १० मे २०२६: नेवासा फाटा परिसरात सुरू असलेल्या कथित अनैतिक देहविक्री व्यवसायावर शेवगाव व नेवासा पोलिसांनी संयुक्तरीत्या मोठी आणि धडक कारवाई करत तीन हॉटेल व लॉजवर एकाचवेळी छापे टाकून मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत महिलांना पैशाचे आमिष दाखवून व बळजबरीने देहविक्रीस प्रवृत्त करणाऱ्या हॉटेल मालक, मॅनेजर आणि ग्राहकांसह एकूण १० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणारा कायदा (PITA) १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, श्री. वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. नेवासा फाटा हद्दीतील तिरंगा लॉज, मित्रप्रेम हॉटेल आणि नामगंगा लॉज येथे महिलांमार्फत कुंटणखाना चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक तयार करून त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांच्या नोटा देत संबंधित हॉटेलमध्ये पाठवले. डमी ग्राहकांनी दिलेल्या पूर्वनियोजित इशाऱ्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिन्ही ठिकाणी एकाचवेळी धाड टाकत परिसराला वेढा घातला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संबंधित हॉटेल परिसरात मोठी खळबळ उडाली. छाप्यामध्ये हॉटेल मालक आणि व्यवस्थापक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून व दबाव टाकून देहविक्रीस भाग पाडत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून डमी ग्राहकांना देण्यात आलेल्या नोटा, व्यवहाराशी संबंधित साहित्य तसेच इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. या कारवाईदरम्यान अडकलेल्या पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना पुढील कायदेशीर व संरक्षणात्मक प्रक्रियेसाठी नेवासा पोलीस ठाण्यात हलविण्यात आले. आरोपींमध्ये तिन्ही हॉटेलचे मालक व व्यवस्थापक यांचा समावेश असून त्यात तिरंगा हॉटेलचे प्रकाश शेंडगे व इक्बाल मंडाल, मित्रप्रेम हॉटेलचे सचिन कोळेकर व सुरेश कांबळे, तसेच नामगंगा हॉटेलचे अजय कोळेकर व अजित बर्डे यांचा समावेश आहे. याशिवाय या व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या चार ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांवर मोठा आघात बसला असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी भूमिकेचे स्वागत केले आहे. अनेक दिवसांपासून या भागात संशयास्पद हालचाली होत असल्याच्या तक्रारी होत्या. अखेर पोलिसांनी अचूक नियोजन, गुप्त माहिती आणि सापळा रचून मोठी कारवाई यशस्वी केली. ही मोहीम पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामहरी खेडकर, अमोल पवार, उपनिरीक्षक विकास पाटील यांच्यासह शेवगाव व नेवासा पोलिसांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. अनेक अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी व जवानांच्या सहभागामुळे ही कारवाई प्रभावी ठरली. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणातील पीडित महिलांच्या पुनर्वसनासंदर्भातही आवश्यक ती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे समजते. नेवासा फाटा येथील या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनैतिक व्यवसायांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळाला आहे.

- अहिल्यानगर शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 'ब्लॉकस्पॉट पेट्रोलिंग' मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर किंवा नशा करून त्रास देणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. यामुळे शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.1
- रवींद्र दामोदरे यांनी कर्जत येथील श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव राखून लोकशाही मार्गाने स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ट्रस्टचा कारभार पारदर्शक व सर्वांसाठी स्वीकारार्ह असावा. या मागणीने आता ट्रस्टच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष वेधले आहे.1
- हर्र हर्र मोदी, घरघर मोदी !! काँग्रेस चे प्रवक्ते हनुमंत पवार यांची प्रतिक्रिया.1
- न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.1
- वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे भीषण आग पहाटे 4 वाजेच्या सुमारास 8 ते 10 दुकाने जळून खाक छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान शिऊर पोलिसांची घटनास्थळी धाव वैजापूर नगर परिषद आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आगीत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, पुढील तपास सुरू ANC : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील 8 ते 10 दुकाने या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वैजापूर नगर परिषदेचे अग्निशामक दल आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले. दोन्ही विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.4
- वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका नामांकित डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी अटक केली आहे. या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदेशीर वैद्यकीय व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.1
- वारकरी कीर्तनकरांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे1