Shuru
Apke Nagar Ki App…
श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव ठेवत लोकशाही मार्गाने व्हावी: रवींद्र दामोदरे.
Rushikesh pawar
श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव ठेवत लोकशाही मार्गाने व्हावी: रवींद्र दामोदरे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव ठेवत लोकशाही मार्गाने व्हावी: रवींद्र दामोदरे.1
- अहिल्यानगरमधील कर्जत-जामखेड भागातील बेनवडीचे भावी सरपंच परशुराम गदादे अठरा समाजांसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहेत. त्यांचे कार्य समाजात सलोखा आणि एकोपा निर्माण करणारे आहे.1
- अहिल्यानगर शहरात ब्लॉकस्पॉट पेट्रोलिंग सुरू; सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व नशा करणाऱ्यांवर कारवाई अहिल्यानगर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून विशेष “ब्लॉकस्पॉट पेट्रोलिंग” मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी, मैदानावर, उड्डाणपूल परिसरात तसेच गर्दीच्या भागात मद्यपान करून गोंधळ घालणारे, नशा करून नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील शांतता व नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन रात्रीच्या वेळी विविध भागांमध्ये पोलिस पथकांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. संशयित हालचाली, सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान किंवा बेकायदेशीर कृत्ये आढळल्यास तात्काळ पोलिस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखता येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. — प्रतिनिधी1
- सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.1
- सोलापूर जिल्ह्यातील धनश्री पवारने वडिलांचे प्रेत घरात असतानाही अवघ्या दीड तासात मराठीचा पेपर दिला. या स्थितीतही तिने 65 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीची आणि संघर्षावर मात करण्याच्या वृत्तीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.1
- न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .1
- "धक्कादायक! झोपेत असताना छातीत दोन गोळ्या झाडून केला खून; उमदी पोलिसांनी शिताफीने आरोपींना पकडले." सांगली/जत: जत तालुक्यातील संख येथे मध्यरात्री झोपेत असलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडून करण्यात आलेल्या निर्घृण खुनाचा छडा उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत लावला आहे. कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना केवळ गोपनीय बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी कौशल्याने तपास चक्र फिरवत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. नेमकी घटना काय? संख (ता. जत) येथील संतोष शिवाप्पा बिरादार (वय ४२) हे १० मे २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास आपल्या कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी अचानक अग्निशस्त्राचा वापर करून बिरादार यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात बिरादार यांचा मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन शेतातून पलायन केले होते. तपासाची चक्रे अन् ३ तासांत अटक घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (जत) श्री. सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) संदीप कांबळे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सपोनि संदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित संख ते दरीबडची रस्त्यावर आहे. माहिती मिळताच पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा रचला आणि आरोपी रोहित ऊर्फ नागेश बाळू जगदाळे (वय २२) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने महांतेश मल्लय्या स्वामी (वय ३५, रा. दरीबडची) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या पथकामार्फत महांतेश स्वामी याला जाडरबोबलाद ते माडग्याळ रोडवरील एका शेतातून अटक केली. गुन्ह्याची नोंद आणि आरोपी याप्रकरणी मयताची मुलगी श्रवंती संतोष बिरादार (वय १६) हिने फिर्याद दिली असून, उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १३८/२०२६ नुसार बीएनएस कलम १०३(१), ३(५) आणि आर्म्स ॲक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी: १) महांतेश मल्लय्या स्वामी (वय ३५, रा. दरीबडची, जत) २) रोहित ऊर्फ नागेश बाळू जगदाळे (वय २२, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी बजावली कामगिरी ही यशस्वी कारवाई सपोनि संदीप कांबळे, पोउपनि बंडू साळवे, पोउनि दिनेश घसाडे, पोउनि सिद्धेश्वर गायकवाड, संतोष माने, लक्ष्मण बंडगर, कावेरी मोटे, महादेव मडसनाळ, संजय पांढरे, परशराम देशमुखे, माळी, छाया बाबर, रेणुका कुंभरे, सोपान भंडे आणि सुदर्शन खोत यांच्या पथकाने केली आहे. काहीही पुरावा नसताना अत्यंत कमी वेळेत खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संदीप कांबळे करत आहेत.1
- सोलापूर शहरात मार्केट यार्ड परिसरातील एका घरात दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने तीन तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.1