logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश, नागनाथ मंदिर रस्त्यासाठी ६ कोटी, कै. शहाजीराव पाटील सभागृहासाठी ४ कोटींचा निधी मंजूर मोहोळ :- मोहोळ शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा दोन मोठ्या कामांना अखेर शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, श्री नागनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कै. शहाजीराव पाटील सभागृहासाठीही ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मोहोळ शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मोहोळ हे श्री नागनाथ संप्रदायातील महत्त्वाचे धार्मिक असून या मंदिरला वर्षभर राज्यभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था आणि अपुऱ्या सुविधांमुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामनाकरावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ लगत असलेल्या स्मशानभूमी ते श्री नागनाथ मंदिर या मार्गाच्या काँक्रिटीकरणासह स्ट्रीट लाईट उभारणीसाठी रस्ता अनुदान योजनेअंतर्गत ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागेश भक्तांची मागणी आता पूर्णत्वास जाणार आहे. याचबरोबर मोहोळ शहरातील सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी अद्ययावत सभागृहाची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आमदार राजू खरे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कै. शहाजीराव पाटील सभागृहासाठी निधीची मागणी केली होती. शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मोहोळ तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, शासकीय इमारती आणि मूलभूत सुविधांबाबत विविध प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठामपणे मांडल्याचे आमदार राजू खरे यांनी सांगितले. निधीअभावी विकासकामे रखडू नयेत यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री नागनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी तसेच सभागृहासाठी निधी मंजूर झाल्याने शहराच्या विकासाला गती मिळणार असून भाविक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार राजू खरे यांनी दिली.

5 hrs ago
user_गो.रा.  कुंभार
गो.रा. कुंभार
मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
09dbd866-d903-460e-9cb4-df51b4a53221

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.
    1
    पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद क्रांती न्यूज -​सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख : सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ​नेमकी घटना काय? ​सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते. ​हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे. ​पोलिसांचा धाडसी सापळा ​मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे: ​०१ देशी बनावटीचे पिस्टल ​०१ जिवंत काडतूस (राऊंड) मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. ​तपासात धक्कादायक खुलासा ​अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे. ​न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी ​याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत. ​"जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे." — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
    2
    सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद
क्रांती न्यूज -​सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख :
सांगली :
जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
​नेमकी घटना काय?
​सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते.
​हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे.
​पोलिसांचा धाडसी सापळा
​मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे:
​०१ देशी बनावटीचे पिस्टल
​०१ जिवंत काडतूस (राऊंड)
मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता.
​तपासात धक्कादायक खुलासा
​अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे.
​न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
​याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत.
​"जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे."
— स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
    user_क्रांती न्यूज
    क्रांती न्यूज
    Radio Jockey आटपाडी, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
    1
    सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    20 hrs ago
  • जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.
    1
    जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 11 मे 2026. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा. या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.
    1
    नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट.
विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन.
नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट.
विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
सोमवार दिनांक 11 मे 2026.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा.
या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    1
    लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    11 hrs ago
  • युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    1
    युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.