पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित प्लॉगाथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद *शहर स्वच्छतेचा संदेश कृतीतून साकार* *पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ कोयनानगर येथे आयोजित करण्यात आलेला प्लॉगाथॉन उपक्रम उत्साहात पार पडला. शहर स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमात उपायुक्त संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहा. आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक गौरव दराडे, महेंद्र साबळे, समाधान कातड, रामचंद्र शिंगाडे यांच्यासह सुमारे २५० ते ३०० नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत परिसरातील कचरा गोळा केला. स्वच्छता हीच खरी जबाबदारी हा संदेश नागरिकांनी आपल्या कृतीतूनच दाखवून दिला. या उपक्रमामध्ये विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, फिटनेस गट तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यामध्ये गणगे प्रशाला विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, गणेश इंटरनॅशनल स्कूल, एक्सपायर अकॅडमी, ओमसाई फिटनेस क्लब, सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ, आदर्श क्रांती सामाजिक संस्था, विद्याव्हेली कॉलेज, सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, दामोदर हरीश चाफेकर औद्योगिक प्रशिक्षण कॉलेज, माऊली संगीत विद्यालय, डी. वाय. पाटील कॉलेज, भगवती बचत गट, जॉगर्स पार्क ग्रुप इत्यादींचा समावेश होतो. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून, पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा स्वच्छतेच्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित प्लॉगाथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद *शहर स्वच्छतेचा संदेश कृतीतून साकार* *पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ कोयनानगर येथे आयोजित करण्यात आलेला प्लॉगाथॉन उपक्रम उत्साहात पार पडला. शहर स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमात उपायुक्त संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहा. आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक गौरव दराडे, महेंद्र साबळे, समाधान कातड, रामचंद्र शिंगाडे यांच्यासह सुमारे २५० ते ३०० नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांनी
मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत परिसरातील कचरा गोळा केला. स्वच्छता हीच खरी जबाबदारी हा संदेश नागरिकांनी आपल्या कृतीतूनच दाखवून दिला. या उपक्रमामध्ये विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, फिटनेस गट तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यामध्ये गणगे प्रशाला विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, गणेश इंटरनॅशनल स्कूल, एक्सपायर अकॅडमी, ओमसाई फिटनेस क्लब, सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ, आदर्श क्रांती सामाजिक संस्था, विद्याव्हेली कॉलेज, सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, दामोदर हरीश चाफेकर औद्योगिक प्रशिक्षण कॉलेज, माऊली संगीत विद्यालय, डी. वाय. पाटील कॉलेज, भगवती बचत गट, जॉगर्स पार्क ग्रुप इत्यादींचा समावेश होतो. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून, पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा स्वच्छतेच्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.
- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पिंपरी चिंचवड :- गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई ठरली आहे... एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते. अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत... #पिंपरीचिंचवडपोलीस #सायबरगुन्हा #मकोका #सायबरफसवणूक #क्रिप्टोकरन्सी #USDT #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #फसवणूकप्रकरण #शेअरमार्केटस्कॅम #आर्थिकगुन्हे #महाराष्ट्रपोलीस #मोठीकारवाई #न्यायालयआदेश #PimpriChinchwadPolice #CyberCrime #MCOCA #CyberFraud #Cryptocurrency #USDT #FinancialFraud #PoliceAction #ScamAlert #StockMarketScam #OrganizedCrime #MaharashtraPolice #BigAction #CourtOrder1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे /भोर दि.२१ येत्या दिनांक १ मे पासून जनगणना मोहीम सुरू होतं आहे.यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.1
- Post by Nityanand More1
- शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 99747788631
- पिंपरी चिंचवड :- सांगवी-बोपोडी दरम्यानच्या ३२ कोटींच्या पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे दीपक मारुतराव तनपुरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. परिसरात दहशत माजवणाऱ्या या गुंडांची पोलिसांनी त्याच भागात धिंड काढून त्यांच्यातील हवा काढली आहे.... पुलाच्या कामातील कथित भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवल्याच्या रागातून दीपक तनपुरे यांच्यावर ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तनपुरे यांनी हे हल्लेखोर भाजपच्या एका स्थानिक नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोपही केला होता. सांगवी पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत पाच मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर अभिषेक शेडगे,अंकित कुमार ऊर्फ राजेश मोर्या, ओम ताकवले,ओम इनामदार, चैतन्य कदम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांनी ज्या परिसरात हल्ला झाला होता, त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढली. यावेळी आरोपींना रस्त्यावर हात जोडून बसवण्यात आले होते. पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे.... #PimpriChinchwad #SangviPolice #CrimeNews #AssaultCase #CorruptionAllegation #PoliceAction #Arrested #PublicSafety #BreakingNews #MaharashtraNews #पिंपरीचिंचवड #सांगवीपोलीस #गुन्हेवार्ता #हल्लाप्रकरण #भ्रष्टाचारआरोप #पोलीसकारवाई #अटक #सार्वजनिकसुरक्षा #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रवार्ता1