logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*रिसोड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ* *रिसोड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ* रिसोड तालुका प्रतिनिधी रामेश्वर रंजवे रिसोड तहसील कार्यालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार साहेबांच्या केबिनला लागून असलेल्या शौचालया शेजारी मोठ्या प्रमाणात घाण साचली असून सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली आहे.तालुक्यातील हजारो नागरिक आपल्या विविध तक्रारी आणि कामांसाठी दररोज तहसील कार्यालयात येत असतात. कार्यालयात जागा नसल्याने अनेक नागरिकांना बाहेर बसावे लागते, मात्र बाहेर बसल्यानंतर या घाणीचा आणि दुर्गंधीचा असह्य त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे याच ठिकाणी नागरिकांसाठी बसवण्यात आलेले आरओ पाणी फिल्टर देखील मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही.एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, मग हा निधी जातो कुठे? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा शिवव्याख्याते गोपाल भिसडे यांनी उपस्थित केला आहे.शासकीय कार्यालयातच जर अशी दयनीय अवस्था असेल तर ही सर्वसामान्य नागरिकांची केलेली थट्टा आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून परिसर स्वच्छ करावा, अशी निवेदना सह मागणी गोपाल भिसडे यांनी केली आहे.याकडे रिसोड तहसीलदार काय कार्यवाही करतात याकडे संबंध तालुक्याचे लक्ष वेधून आहे

22 hrs ago
user_Ramu patil Ranjwe वार्ताहर
Ramu patil Ranjwe वार्ताहर
Farmer रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
22 hrs ago
0f176f84-39a9-469b-b7c7-f6cc0ee98786

*रिसोड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ* *रिसोड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ* रिसोड तालुका प्रतिनिधी रामेश्वर रंजवे रिसोड तहसील कार्यालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार साहेबांच्या केबिनला लागून असलेल्या शौचालया शेजारी मोठ्या प्रमाणात घाण साचली असून सर्वत्र तीव्र

c37cb43b-3db4-4e96-bec1-763c4055db5c

दुर्गंधी पसरली आहे.तालुक्यातील हजारो नागरिक आपल्या विविध तक्रारी आणि कामांसाठी दररोज तहसील कार्यालयात येत असतात. कार्यालयात जागा नसल्याने अनेक नागरिकांना बाहेर बसावे लागते, मात्र बाहेर बसल्यानंतर या घाणीचा आणि दुर्गंधीचा असह्य त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे याच ठिकाणी

a39d2226-3800-48a5-9bb3-838b673d7eb4

नागरिकांसाठी बसवण्यात आलेले आरओ पाणी फिल्टर देखील मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही.एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, मग हा निधी जातो कुठे? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा शिवव्याख्याते गोपाल भिसडे यांनी

4ceffb45-7b7c-4166-956d-97ed56dff806

उपस्थित केला आहे.शासकीय कार्यालयातच जर अशी दयनीय अवस्था असेल तर ही सर्वसामान्य नागरिकांची केलेली थट्टा आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून परिसर स्वच्छ करावा, अशी निवेदना सह मागणी गोपाल भिसडे यांनी केली आहे.याकडे रिसोड तहसीलदार काय कार्यवाही करतात याकडे संबंध तालुक्याचे लक्ष वेधून आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
    1
    पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री  नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
    1
    ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा
    1
    दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा
    user_Sambhaji Fit Wellness Studio
    Sambhaji Fit Wellness Studio
    Fitness Trainer जाफ्राबाद, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बुलढाणा :-सापाच्या विषाने नव्हे, आरोग्य यंत्रणेच्या निर्दयी दुर्लक्षाने घेतला २ जीव! रस्ता नसल्याने ३ किमी झोळीतून प्रवास, रुग्णालयात लस मिळेना; २२ वर्षीय गर्भवती मातेचा बाळासह तडफडून मृत्यू, दोषींवर कारवाई कधी?*
    1
    बुलढाणा :-सापाच्या विषाने नव्हे, आरोग्य यंत्रणेच्या निर्दयी दुर्लक्षाने घेतला २ जीव! रस्ता नसल्याने ३ किमी झोळीतून प्रवास, रुग्णालयात लस मिळेना; २२ वर्षीय गर्भवती मातेचा बाळासह तडफडून मृत्यू, दोषींवर कारवाई कधी?*
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा चिमुकली काढला लकी ड्रॉ खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती , तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, व राणा गणेश मंडळ असतात तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉ नुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असून अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघणार आहे.यामध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशन तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अशा एकूण 28 गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ,शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार मंदार पुरी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रिश अनुपकुमार छतवाणी वय 3 व आर्यन संतोष श्रीनाथ वय या लहान मूल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी ने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली.
    4
    खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा चिमुकली काढला लकी ड्रॉ


खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती , तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, व राणा गणेश मंडळ असतात तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉ नुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असून अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघणार आहे.यामध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशन तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अशा एकूण 28 गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ,शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार मंदार पुरी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रिश अनुपकुमार छतवाणी वय  3 व आर्यन संतोष श्रीनाथ वय या लहान मूल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी ने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!.. शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!.. अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!.. शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!.. तीन नोटिसा, तरीही चौकशीचा अहवाल नाही! अल्लामा इक्बाल शाळेच्या प्रकरणात जिल्हा परिषदेसमोर उपोषण.. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नगरसेवक इमरान अमानुल्ला खान यांचे उपोषण स्थगित.. जालना : जुना जालना येथील अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कथित शिक्षक भरतीतील गैरप्रकार तसेच मुख्याध्यापक व व्यवस्थापनाच्या कथित गैरकारभाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जमियत उल मुस्लिमीन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य इम्रान खान अमानुल्ला खान यांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी यापूर्वी 19 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद जालना यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. शाळेतील शिक्षकांची कथित बेकायदेशीर भरती तसेच इतर प्रशासकीय अनियमिततेबाबत पुरावे व माहितीही सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    1
    अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!..

शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!..


अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!..
शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!..
तीन नोटिसा, तरीही चौकशीचा अहवाल नाही! अल्लामा इक्बाल शाळेच्या प्रकरणात जिल्हा परिषदेसमोर उपोषण..
शिक्षण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नगरसेवक इमरान अमानुल्ला खान यांचे उपोषण स्थगित..
जालना : जुना जालना येथील अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कथित शिक्षक भरतीतील गैरप्रकार तसेच मुख्याध्यापक व व्यवस्थापनाच्या कथित गैरकारभाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जमियत उल मुस्लिमीन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य इम्रान खान अमानुल्ला खान यांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या प्रकरणी यापूर्वी 19 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद जालना यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. शाळेतील शिक्षकांची कथित बेकायदेशीर भरती तसेच इतर प्रशासकीय अनियमिततेबाबत पुरावे व माहितीही सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार? सेनगाव/विश्वनाथ देशमुख निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. "कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!" — लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)
    1
    पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
"कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!"
— लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • चिखली:-धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत कवठळच्या महिलांची महादेवाला आर्त हाक; दीड महिन्यांचा दुष्काळ अन् विजेच्या लपंडावाने पिके करपली, तातडीने भरघोस मदतीची मागणी
    1
    चिखली:-धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत कवठळच्या महिलांची महादेवाला आर्त हाक; दीड महिन्यांचा दुष्काळ अन् विजेच्या लपंडावाने पिके करपली, तातडीने भरघोस मदतीची मागणी
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला... जालना जिल्हाभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मोठा उत्साह... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढलीय. यावेळी लेझिम सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
    1
    जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...

देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...


जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...
देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...
जालना जिल्हाभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मोठा उत्साह...
आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढलीय. यावेळी लेझिम सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.