logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिरोली पुलाची येथील विलासनगर-माळवाडी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांचा छापा शिरोली पुलाची येथील विलासनगर-माळवाडी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले.या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ५० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर शिरोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज बुधवार दिनांक25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलिसातून मिळाली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,विलासनगर-माळवाडी येथील हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत काही जण ‘तीन पानी’ हा जुगार प्रकार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक छापा टाकला.या छाप्यात कैलास भीमराव नवले (वय ४४), नितीन प्रभाकर भोसले (वय ३८), राजेंद्र अशोक इंगळे (वय ४३), विश्वास भारत गुडे (वय ४०), बाळू शंकर भालेकर (वय ४५) आणि राहुल प्रभाकर भोसले (वय ४२, सर्व रा. विलासनगर, माळवाडी, शिरोली पुलाची) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख ७,४२० रुपये, अंदाजे ४३ हजार रुपयांचे मोबाईल फोन तसेच जुगार साहित्य असा एकूण ५० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोहेकॉ रामचंद्र कोळी, महेश आंबी, विश्वास चिलले, तुकाराम कुंभार, होमगार्ड सनंद चव्हाण आणि इमान महालदार यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ पाखरे करत आहेत.या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

23 hrs ago
user_आमची मराठी.com
आमची मराठी.com
शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
23 hrs ago

शिरोली पुलाची येथील विलासनगर-माळवाडी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांचा छापा शिरोली पुलाची येथील विलासनगर-माळवाडी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले.या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ५० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर शिरोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज बुधवार दिनांक25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलिसातून मिळाली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,विलासनगर-माळवाडी येथील हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत काही जण ‘तीन पानी’ हा जुगार प्रकार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक छापा टाकला.या छाप्यात कैलास भीमराव नवले (वय ४४), नितीन प्रभाकर भोसले (वय ३८), राजेंद्र अशोक इंगळे (वय ४३), विश्वास भारत गुडे (वय ४०), बाळू शंकर भालेकर (वय ४५) आणि राहुल प्रभाकर भोसले (वय ४२, सर्व रा. विलासनगर, माळवाडी, शिरोली पुलाची) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख ७,४२० रुपये, अंदाजे ४३ हजार रुपयांचे मोबाईल फोन तसेच जुगार साहित्य असा एकूण ५० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोहेकॉ रामचंद्र कोळी, महेश आंबी, विश्वास चिलले, तुकाराम कुंभार, होमगार्ड सनंद चव्हाण आणि इमान महालदार यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ पाखरे करत आहेत.या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंदगड / प्रतिनिधी चंदगड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने अधूनमधून हजेरी लावली असून मंगळवारी (दि.२४) सायंकाळी अचानक झालेल्या गारपिटीने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास चंदगड शहरासह जांबरे धरण परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. जवळपास अर्धा ते एक तास गारांचा पाऊस कोसळत होता.दुपारपर्यंत कडक ऊन आणि उकाडा जाणवत असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि वाऱ्यासह गारपीट सुरू झाली. मोठ्या प्रमाणात पडलेल्या गारांमुळे रस्त्यांवर पांढरी चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ काही काळासाठी निर्मनुष्य झाली होती. नागरिकांनी दुकाने बंद करून आसरा घेतला.चंदगड शहरासह नाव्हेली, हिंडगाव, देसाईवाडी, आडुरे, कोकरे, किरमटेवाडी, उमगाव आदी गावांनाही अवकाळीचा फटका बसला. रविवारी माणगाव परिसरातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती, तर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंगळवारी सकाळी कडक उन्हानंतर सायंकाळी पुन्हा अवकाळी कोसळल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.गारपिटीमुळे भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळीमुळे वातावरणात लक्षणीय गारठा निर्माण झाला असून रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    1
    चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने अधूनमधून हजेरी लावली असून मंगळवारी (दि.२४) सायंकाळी अचानक झालेल्या गारपिटीने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास चंदगड शहरासह जांबरे धरण परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. जवळपास अर्धा ते एक तास गारांचा पाऊस कोसळत होता.दुपारपर्यंत कडक ऊन आणि उकाडा जाणवत असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि वाऱ्यासह गारपीट सुरू झाली. मोठ्या प्रमाणात पडलेल्या गारांमुळे रस्त्यांवर पांढरी चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ काही काळासाठी निर्मनुष्य झाली होती. नागरिकांनी दुकाने बंद करून आसरा घेतला.चंदगड शहरासह नाव्हेली, हिंडगाव, देसाईवाडी, आडुरे, कोकरे, किरमटेवाडी, उमगाव आदी गावांनाही अवकाळीचा फटका बसला. रविवारी माणगाव परिसरातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती, तर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंगळवारी सकाळी कडक उन्हानंतर सायंकाळी पुन्हा अवकाळी कोसळल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.गारपिटीमुळे भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळीमुळे वातावरणात लक्षणीय गारठा निर्माण झाला असून रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    user_आमची मराठी.com
    आमची मराठी.com
    शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • “स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार” शहीद मेजर शामकांत केळकर यांच्या पत्नींना प्रदान
    1
    “स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार” शहीद मेजर शामकांत केळकर यांच्या पत्नींना प्रदान
    user_SAGAR THANEKAR
    SAGAR THANEKAR
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कृष्णात पाटील सांगली जिल्हा प्रतिनिधी कनेगांव (ता. वाळवा) में झुके हुए बिजली के खंभे से हादसे का खतरा सांगली जिले के वाळवा तालुका अंतर्गत कनेगांव गांव में पिछले कई वर्षों से एक बिजली का खंभा झुकी हुई अवस्था में खड़ा है। वर्ष 2021 में आई बाढ़ के दौरान यह खंभा और अधिक झुक गया था। इस संबंध में ग्रामीणों ने महावितरण विभाग में कई बार शिकायत दर्ज कराई है, लेकिन संबंधित अधिकारियों द्वारा इस ओर लगातार अनदेखी की जा रही है, ऐसा आरोप ग्रामस्थों ने लगाया है। बाढ़ के बाद अधिकारी निरीक्षण के लिए आकर आश्वासन देकर चले जाते हैं, परंतु आज तक इस खतरनाक खंभे के संबंध में कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। इस मार्ग से छोटे बच्चे स्कूल आने-जाने के लिए गुजरते हैं तथा महिलाएं और पुरुष सुबह-शाम टहलने के लिए भी इसी रास्ते का उपयोग करते हैं। विशेषकर बारिश के मौसम में तेज हवा के कारण यह झुका हुआ खंभा गिरने की आशंका है, जिससे जान-माल का गंभीर खतरा उत्पन्न हो सकता है। इसलिए ग्राम पंचायत और ग्रामीणों ने संबंधित विभाग से मांग की है कि इस झुके हुए बिजली के खंभे को तत्काल ठीक किया जाए या बदला जाए। —
    4
    कृष्णात पाटील 
सांगली जिल्हा प्रतिनिधी 
कनेगांव (ता. वाळवा) में झुके हुए बिजली के खंभे से हादसे का खतरा
सांगली जिले के वाळवा तालुका अंतर्गत कनेगांव गांव में पिछले कई वर्षों से एक बिजली का खंभा झुकी हुई अवस्था में खड़ा है। वर्ष 2021 में आई बाढ़ के दौरान यह खंभा और अधिक झुक गया था। इस संबंध में ग्रामीणों ने महावितरण विभाग में कई बार शिकायत दर्ज कराई है, लेकिन संबंधित अधिकारियों द्वारा इस ओर लगातार अनदेखी की जा रही है, ऐसा आरोप ग्रामस्थों ने लगाया है।
बाढ़ के बाद अधिकारी निरीक्षण के लिए आकर आश्वासन देकर चले जाते हैं, परंतु आज तक इस खतरनाक खंभे के संबंध में कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। इस मार्ग से छोटे बच्चे स्कूल आने-जाने के लिए गुजरते हैं तथा महिलाएं और पुरुष सुबह-शाम टहलने के लिए भी इसी रास्ते का उपयोग करते हैं।
विशेषकर बारिश के मौसम में तेज हवा के कारण यह झुका हुआ खंभा गिरने की आशंका है, जिससे जान-माल का गंभीर खतरा उत्पन्न हो सकता है। इसलिए ग्राम पंचायत और ग्रामीणों ने संबंधित विभाग से मांग की है कि इस झुके हुए बिजली के खंभे को तत्काल ठीक किया जाए या बदला जाए।
—
    user_कृष्णात पाटील
    कृष्णात पाटील
    वाळवा, सांगली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लाडकी बहीण योजना आणली पण त्याच बहिणींची सुरक्षा द्यायची राहिली
    1
    लाडकी बहीण योजना आणली पण त्याच बहिणींची सुरक्षा द्यायची राहिली
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कोल्हापूर : रविराज कांबळे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या बालशस्त्रक्रिया विभागाने नुकत्याच बाल व नवजात बाळांवर काही अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.१२ वर्षांखालील वयोगटातील एकूण ५९ बालरुग्णांवर उपचार करण्यात आले असून, काही रुग्ण पूर्णपणे बरे होऊन कोणताही त्रास न होता घरी डिस्चार्ज झाले आहेत. तर काही रुग्ण सध्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सीपीआर रुग्णालयाच्या या कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पालकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    2
    कोल्हापूर : रविराज कांबळे 
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या बालशस्त्रक्रिया विभागाने नुकत्याच बाल व नवजात बाळांवर काही अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.१२ वर्षांखालील वयोगटातील एकूण ५९ बालरुग्णांवर उपचार करण्यात आले असून, काही रुग्ण पूर्णपणे बरे होऊन कोणताही त्रास न होता घरी डिस्चार्ज झाले आहेत. तर काही रुग्ण सध्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सीपीआर रुग्णालयाच्या या कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पालकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील कोल्हापूर (प्रतिनिधी अविनाश शेलार यांचे कडून) पाचगाव येथे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यु’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या मातीत मिसळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली ही सामाजिक बांधिलकी भविष्यात सुसंस्कृत समाज घडवेल व त्यातूनच समृध्द गावाचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन पाचगावच्या सरपंच सौ. प्रियांका संग्राम पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट आणि मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पाचगाव येथे हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. सरपंच पाटील म्हणाल्या, केवळ वर्गातील चार भिंतीमध्ये शिक्षण पूर्ण होत नाही. समाजातील अडीअडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे हेच खरे शिक्षण आहे. या शिबिरातील स्वच्छता अभियान आणि ग्रामसंवादातून विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे महत्त्व ओळखले आहे. 'युवकांचा ध्यास - ग्राम शहर विकास' हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी पाचगावचे ग्रामस्थ आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी खांद्याला खांदा लावून काम करतील . विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले म्हणाले, विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी समाजसेवेला आपले आद्य कर्तव्य मानतात. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी हे तरुण राष्ट्रसेवक म्हणून सदैव तत्पर राहतील. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा म्हणाले, ग्रामविकासासोबतच आरोग्य साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती, स्वच्छतेबाबतच ग्रामस्थांचे प्रबोधन करून एक 'आरोग्यसंपन्न गाव' घडवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल टाकले आहे. स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले. या विशेष शिबिरामध्ये श्रमसंस्कार, ग्रामविकास व सामाजिक बांधिलकी यांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम, ग्रामसंवाद तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये राबवले. यावेळी उपसरपंच दिपाली प्रकाश गाडगीळ, केंद्र शाळा मुख्याध्यापक अशोक पाटील, विद्यामंदिर शांतीनगरच्या मुख्याध्यापिका मंगल देवठाणेकर, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. अद्वैत राठोड, मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. जगन्नाथ शेटे, सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
    2
    तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल
समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी अविनाश शेलार यांचे कडून) 
पाचगाव येथे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न  
विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यु’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या मातीत मिसळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली ही सामाजिक बांधिलकी भविष्यात सुसंस्कृत समाज घडवेल व त्यातूनच समृध्द गावाचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन पाचगावच्या सरपंच सौ. प्रियांका संग्राम पाटील यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट आणि मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पाचगाव येथे हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
सरपंच पाटील म्हणाल्या, केवळ वर्गातील चार भिंतीमध्ये शिक्षण पूर्ण होत नाही. समाजातील अडीअडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे हेच खरे शिक्षण आहे. या शिबिरातील स्वच्छता अभियान आणि ग्रामसंवादातून विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे महत्त्व ओळखले आहे. 'युवकांचा ध्यास - ग्राम शहर विकास' हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी पाचगावचे ग्रामस्थ आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी खांद्याला खांदा लावून काम करतील
.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले म्हणाले,  विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी समाजसेवेला आपले आद्य कर्तव्य मानतात. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी हे तरुण राष्ट्रसेवक म्हणून सदैव तत्पर राहतील. 
मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा म्हणाले, ग्रामविकासासोबतच आरोग्य साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती, स्वच्छतेबाबतच ग्रामस्थांचे प्रबोधन करून एक 'आरोग्यसंपन्न गाव' घडवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल टाकले आहे. 
स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले.
या विशेष शिबिरामध्ये श्रमसंस्कार, ग्रामविकास व सामाजिक बांधिलकी यांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम, ग्रामसंवाद तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये राबवले.
यावेळी उपसरपंच दिपाली प्रकाश गाडगीळ, केंद्र शाळा मुख्याध्यापक अशोक पाटील, विद्यामंदिर शांतीनगरच्या मुख्याध्यापिका मंगल देवठाणेकर, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. अद्वैत राठोड,  मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. जगन्नाथ शेटे, सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
    user_अविनाश शेलार Shelar
    अविनाश शेलार Shelar
    Ajra, Kolhapur•
    21 hrs ago
  • पंढरपूर : राज्यातील मराठा व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सारथी, बार्टी व महाज्योती या संस्थांच्या निधीवाटपाबाबत तसेच शिष्यवृत्ती योजनांच्या भवितव्याबाबत विधानसभेत आमदार अभिजीत पाटील यांनी ठाम व आक्रमक भूमिका मांडली. आमदार पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांसाठी प्रत्येकी किमान एक हजार कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३०० कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या पत्राला २१ मे २०२५ रोजी उत्तर मिळाले असून अर्थसंकल्पात ३०० कोटींची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र मंत्री महोदयांच्या लेखी उत्तरानुसार त्यापैकी आतापर्यंत केवळ ९० कोटी रुपयांचेच वितरण झाल्याचे वास्तव समोर आले असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणले.
    1
    पंढरपूर : राज्यातील मराठा व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सारथी, बार्टी व महाज्योती या संस्थांच्या निधीवाटपाबाबत तसेच शिष्यवृत्ती योजनांच्या भवितव्याबाबत विधानसभेत आमदार अभिजीत पाटील यांनी ठाम व आक्रमक भूमिका मांडली.
आमदार पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांसाठी प्रत्येकी किमान एक हजार कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३०० कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या पत्राला २१ मे २०२५ रोजी उत्तर मिळाले असून अर्थसंकल्पात ३०० कोटींची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र मंत्री महोदयांच्या लेखी उत्तरानुसार त्यापैकी आतापर्यंत केवळ ९० कोटी रुपयांचेच वितरण झाल्याचे वास्तव समोर आले असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणले.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शिरोली पुलाची येथील विलासनगर-माळवाडी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले.या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ५० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर शिरोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज बुधवार दिनांक25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलिसातून मिळाली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,विलासनगर-माळवाडी येथील हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत काही जण ‘तीन पानी’ हा जुगार प्रकार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक छापा टाकला.या छाप्यात कैलास भीमराव नवले (वय ४४), नितीन प्रभाकर भोसले (वय ३८), राजेंद्र अशोक इंगळे (वय ४३), विश्वास भारत गुडे (वय ४०), बाळू शंकर भालेकर (वय ४५) आणि राहुल प्रभाकर भोसले (वय ४२, सर्व रा. विलासनगर, माळवाडी, शिरोली पुलाची) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख ७,४२० रुपये, अंदाजे ४३ हजार रुपयांचे मोबाईल फोन तसेच जुगार साहित्य असा एकूण ५० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोहेकॉ रामचंद्र कोळी, महेश आंबी, विश्वास चिलले, तुकाराम कुंभार, होमगार्ड सनंद चव्हाण आणि इमान महालदार यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ पाखरे करत आहेत.या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    शिरोली पुलाची येथील विलासनगर-माळवाडी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले.या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ५० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर शिरोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज बुधवार दिनांक25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलिसातून मिळाली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,विलासनगर-माळवाडी येथील हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत काही जण ‘तीन पानी’ हा जुगार प्रकार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक छापा टाकला.या छाप्यात कैलास भीमराव नवले (वय ४४), नितीन प्रभाकर भोसले (वय ३८), राजेंद्र अशोक इंगळे (वय ४३), विश्वास भारत गुडे (वय ४०), बाळू शंकर भालेकर (वय ४५) आणि राहुल प्रभाकर भोसले (वय ४२, सर्व रा. विलासनगर, माळवाडी, शिरोली पुलाची) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख ७,४२० रुपये, अंदाजे ४३ हजार रुपयांचे मोबाईल फोन तसेच जुगार साहित्य असा एकूण ५० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोहेकॉ रामचंद्र कोळी, महेश आंबी, विश्वास चिलले, तुकाराम कुंभार, होमगार्ड सनंद चव्हाण आणि इमान महालदार यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ पाखरे करत आहेत.या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_आमची मराठी.com
    आमची मराठी.com
    शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.