ज्यांनी दिले दाम त्यांचे झाले काम पंचायत समिती प्रशासनाचा अजब कारभार *ज्यांनी दिले दाम त्यांचेच झाले पंचायत समिती प्रशासनाकडून काम* *अतिवृष्टीत पडझड झालेल्या विहिरीचे अनुदान खऱ्या लाभार्थ्यांना न मिळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.?* मानोरा प्रतिनिधी *मानोरा :* तालुक्यात गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत सिंचन विहिरींचे प्रचंड नुकसान झाले. पडझड झालेल्या विहिरींना शासनाकडून नुकसानभरपाई अनुदान देण्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार शेकडो शेतकऱ्यांना काही हजार रुपये नुकसानभरपाई तालुका प्रशासनाच्या मध्यस्थीने देण्यात आली. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी खरोखर खचल्या आहेत आणि ज्यांचे पंचनामे झाले आहेत अशा असंख्य शेतकऱ्यांना डावलण्यात आल्याने ज्यांनी हात ओले केले त्यांनाच तालुका पं.स.प्रशासनाकडून प्राधान्य दिले गेले, अशी बोंब वंचित शेतकऱ्यांकडून आता मारली जात आहे. गेल्या पावसाळ्यात सलग तीन ते चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मानोरा तालुक्यातील ३० ते ३५ गावांमधील शेकडोहून अधिक सिंचन विहिरींचे संरक्षक भिंती खचल्या. काही विहिरींच्या भिंती कोसळून त्यामध्ये माती व गाळ साचला. यामुळे रब्बी हंगामासाठी पाण्याचा स्त्रोतच बंद झाला. पं.स., तहसील व कृषी विभागा मार्फत त्यावेळी पंचनामे करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवताना मात्र शेवटच्या क्षणाला ज्यांच्याकडून आर्थिक हीत सबंध जपले गेले अशांनाच पंचायत समिती कार्यालयातील काही महाभागांकडून प्राधान्य दिल्या गेल्याचे प्राप्त झालेल्या अनुदानावरून समोर येत आहे. शासनाने प्रति विहीर ३० ते ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र ज्या विहिरींना प्रत्यक्ष नुकसान झालेले नाही किंवा ज्यांचे पंचनामे झाले नाहीत अशा काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. *"आमच्या विहिरीची भिंत पूर्णपणे खचली आहे. तलाठ्याने पंचनामा केला, फोटो काढले तरीही आमचे नाव यादीत नाही. पण काही शेतकऱ्यांची विहीर शाबूत असतानाही त्यांना पैसे मिळाले,"* अशी खंत वाई गौळ येथील शेतकरी ओमकार श्रीराम राठोड शेतकऱ्याने व्यक्त केली. नुकसानग्रस्त विहिरींचा स्वतंत्रपणे फेरपंचनामा करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करावी. शासनाने जाहीर केलेली पूर्ण रक्कम ३० ते ५० हजार रुपये तातडीने द्यावी. लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करून आक्षेप व हरकतीसाठी मुदत द्यावी. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी. महसूल कृषी आणि पंचायत प्रशासनाकडून संयुक्त पंचनामे करून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत पंचायत प्रशासनातील रोजगार सेवक, संबंधित अभियंता, तलाठी यांनी आर्थिक हितसंबंध जपत पात्र शेतकऱ्यांनी प्रस्तावाला सातबारा जोडला नाही असे न पटणारे कारण सांगत वंचित ठेवल्याचा आरोप यानिमित्ताने केला जात आहे. विहीर हीच रब्बी हंगामातील सिंचनाची एकमेव सोय असते. विहीर खचल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाला पाणी देऊ शकले नाही. आता दुरुस्तीसाठी ८० ते १ लाख रुपये खर्च येत आहे. शासनाची मदत वेळेत न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. जर प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा अथवा आंदोलन करण्याचा इशारा वंचित शेतकऱ्यांनी दिला आहे.

- Post by Sharad Dayedar1
- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Ahem Raza1
- Post by Amravati News Update1
- अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे. वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.1
- Post by Purn borse1
- Post by M B B1
- अकोला: अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अंधाराचे साम्राज्य महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.1